दोन दिवसांनी मुलीचे वडील येणार होते तेव्हा काय तो 'निकाल' लागणार होता. माझ्या मनात विचारांचे वादळ घोंगावत होते. ती मला पसंत करेल काय? (आहे काय तुझ्यात?) वगैरे वगैरे विचार करून माझ्या मेंदूचा पार भुगा होऊन गेला. माझ्यात आणि तिच्यातल्या तुलनेत ती सर्वाथाने 'भारी’ होती. शारीरिक(वजन ६५-७०किलो सहज असावे आणि माझे मोजून ५२किलो), शैक्षणिक (बी. एस्सी, डीएड, डिप्लोमा इन काँप्युटर सॉफ्टवेअर आणि माझे एस.एस.सी.+आय.टी.आय. (इलेक्ट्रॉनिक्स)). त्यामुळे सर्व बाजूने उत्तर येत होते' नकार'. मला नकाराची एरवी भीती वाटली नसती पण मी केव्हांच तिचा (तिच्या आणि माझ्याही नकळत) होऊन बसलो होतो त्यामुळे तो नकार मला परवडणारा नव्हता. वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय (नाही तरी इतकी वर्षे; मोजून जवळ जवळ ३५ वर्षे केले तरी काय? ) नव्हता. पाहू गं किती वाऽऽऽट!
शेवटी निकालाचा दिवस उजाडला. मुलीचे वडील येऊन आसनस्थ झाले. इकडच्या तिकडच्या गप्पा-चहापाणी झाले (मी आपला अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होतो) आणि त्यांच्या मुख्य बोलण्याची वाट बघून शेवटी माझ्या वडिलांनी त्यांचा होकार गृहीत धरून आमचा होकार सांगितला. त्यानंतर देखिल ते गृहस्थ स्वस्थच बसून होते. काहीच बोलेनात. मग वडिलांनी स्पष्टच विचारले, "आपला काय निर्णय?"
ते म्हणाले,"कसला निर्णय?"
"अहो तुमच्या मुलीचा 'होकार-नकार' ह्याबद्दल काही तरी बोला."
तर म्हणाले, "आम्ही आमच्या मुलीला अजून काही विचारलेच नाही."
"तुमचा स्वतःचा काय निर्णय?"
"आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही."
"मग इथे येण्याचे प्रयोजन?"
"मुलाचा निर्णय ऐकण्यासाठी."
त्यांच्या ह्या उडवाउडवीच्या उत्तरांनी आम्ही सगळेच हैराण झालो होतो. मी रागातच विचारले,"मुलीची पसंती-नापसंती विचारल्याशिवाय इथे येण्यात काय अर्थ होता? तुम्ही इथे आलात त्याचा अर्थ कोणीही असेच गृहीत धरेल की तुमच्याकडून पसंती आहे; आणि तसे नसेल तर समोरच्याच्या पसंती-नापसंतीचा प्रश्नच कुठे येतो?"
थंडपणे ते म्हणाले,"आम्ही दोन दिवसात आमचा निर्णय कळवतो."
"वडील म्हणाले, "जाऊ द्या! तुमच्या मुलीला कशाला उगीच त्रास? त्यापेक्षा आपण इथेच थांबू! तुमचा नकार गृहीत धरून आपण एकमेकांना मोकळे करू या."
ही मात्रा लागू पडली आणि मग त्या गृहस्थांनी जे सांगितले ते खरोखरच विचार करण्यासारखे होते. ते म्हणाले, "अहो दरवेळी नकार ऐकून मुलगी कुढत बसते. आम्ही किती समजावणार तिला? म्हणून आता ठरवलंय की मुलाकडून होकार आल्याशिवाय मुलीशी बोलायचेच नाही. तेव्हा आज तिच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला कळवतो."
मी अधीरतेने म्हणालो, "मी स्वतः येऊन तिला विचारतो (काय पण धैर्य!!). कारण,तुम्ही कदाचित तिच्यावर दबाव टाकाल आणि अशा निर्णयाच्या मी विरोधात आहे. काय तो सोक्षमोक्ष लागू दे. मी उद्या तुमच्याकडे येतो." (त्यांना बोलायलाच दिले नाही)
त्यांनी मान डोलवली आणि आमचा निरोप घेऊन ते रवाना झाले.
माझ्या आगाऊपणावर आई खूप चिडली. ती म्हणाली, "तू जाऊन तुझा भाव कमी करतो आहेस. अरे अजून दोन दिवस थांबला असतास तर काय आभाळ कोसळणार होते तुझ्या डोक्यावर?"
मी आपला शांतपणे सगळे ऐकून घेत होतो (मनातल्या मनात माझा संवाद 'ती' च्याशी चालला होता).
मी म्हणालो खरा की मी स्वतः येऊन बोलतो पण खरे सांगायचे तर मी तिच्याशी काय आणि कसे बोलणार होतो ते मलाच माहीत नव्हते. आजपर्यंत मी आईचाच पदर पकडून चाललो होतो. आई, मोठी बहीण, शाळेतील शिक्षिका, अशा आणि एव्हढ्याच स्त्रियांशी माझा संबंध आला होता. वर्गात मुली होत्या पण आम्ही एकमेकांशी कधीच बोलत नसल्यामुळे, कोणत्याही मुलीशी, त्यातून एका अनोळखी मुलीशी मी एव्हढ्या नाजुक विषयावर कसे काय बोलू शकेन ह्या शंकेनेच मला घाम फुटला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा