माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ डिसेंबर, २०११

हृदय तोड दे!

मुटेसाहेबांनी एका गाजलेल्या हिंदी सिने-गीताचा भावानुवाद केलेला आहे(जालरंग प्रकाशनाच्या ’शब्दगाऽऽरवा २०११’ह्या हिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)...ते भावानुवादित गाणे मी मूळ गाण्याच्या रूळासोबत गाऊन आपल्यासमोर पेश करत आहे...ऐकून सांगा..प्रयत्न कितपत जमलाय/फसलाय!


चित्रपट -  पुरब और पश्चिम
गीत - इंदिवर
संगीत -  कल्याणजी आनंदजी
गायक - मुकेश

कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे...ह्या हिंदी गाण्याचा भावानुवाद!



हे ध्वनीचित्रमुद्रण मुटेसाहेबांनी तयार केलंय.

३० डिसेंबर, २०११

मेरी भिगी भिगी सी!

अनामिका ह्या हिंदी सिनेमातलं,किशोर कुमारच्या आवाजातलं हे गाणं आपण ऐकलेलं असणारच....अनायासे ह्या गाण्याचा रूळ मला मिळाला आणि मी ते माझ्या आवाजात गाऊन इथे पेश करतोय....ऐकून सांगा...कितपत जमलंय/फसलंय ते.

२८ डिसेंबर, २०११

नको देवराया अंत आता पाहू!

प्रभाकर जोग ह्यांच्या गाणार्‍या वायोलिनचा रूळ बनवून मी हे गाणं माझ्या आवाजात ध्वमु केलंय..ऐका.

प्रिया आज माझी नसे साथ द्याया!

प्रभाकर जोग ह्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेले ’प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ हे गाणं मिळालं आणि मी त्याचाच रूळ म्हणून वापर करून माझ्या आवाजात हे गाणं गायचा प्रयत्न केलाय...ऐका आणि सांगा..कितपत जमलाय/फसलाय हा प्रयत्न.

सखि मंद झाल्या तारका!

संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेल्या ’सखि मंद झाल्या तारका’ ह्या गीताचा रूळ बनवून मी ते माझ्या आवाजात गायलंय...त्यांनी पहिलं आणि शेवटचं कडवं वाजवलंय..तस्मात मीही तेच गायलोय....ऐकून सांगा जमलंय की फसलंय?



पुन्हा एकदा गायलंय...आता सांगा..कोणतं जास्त नेमकं आहे की दोन्हीही प्रयत्न फसलेत?




प्रभाकर जोग ह्यांच्या गाणारे वायोलिनचा रूळ बनवून आता हे गाणं पूर्णपणे गायलंय...कसं वाटतंय ते ऐकून सांगा.

अशी पाखरे येती!

संजय देशपांडेकृत सतारीवर वाजवलेले ’अशी पाखरे येती’ हे गाजलेले गाणे  ऐकले आणि मग त्याचाच रूळ म्हणून वापर करून मी त्यावर माझी गाण्याची हौस भागवून घेतली....ऐका आणि सांगा..कितपत जमलंय/फसलंय.

२७ डिसेंबर, २०११

मानसीचा चित्रकार तो!

संजय देशपांडेकृत सतारीवर वाजवलेले ’मानसीचा चित्रकार तो’ हे गाणे मिळाले..मग त्याचाच रूळ म्हणून वापर करून मीही आपलं नरडं जरा साफ करून घेतलं..ऐका आणि सांगा कितपत जमलंय/फसलंय ते!