माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
जालीय अंक उद्घोषणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जालीय अंक उद्घोषणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३१ मार्च, २०१२

आता थांबूया!

जालरंग! जालरंग ह्या नावाने आपण एक आभासी प्रकाशन संस्था  स्थापन  केली आणि पाहता पाहता तिच्या नावाने आजवर १२ अंक प्रकाशित केले की! विश्वास नाही बसत ना! पण हे ढळढळीत वास्तव आहे.



आजवर जालरंगने केलेली वाटचाल पाहता काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात...सुरुवात मी एकट्याने केली होती पण लगेच खूप मदतीचे हात आले आणि एकाचे अनेक हात झाले आणि मग प्रस्ताव आला की हे अंक आपण एखाद्या विशिष्ट नावाने प्रकाशित केले तर? प्रस्ताव मान्य झाला..मग अनेकजणांनी अनेक नावं सुचवली आणि निवडणूक प्रक्रियेतून ’जालरंग प्रकाशन’ हे नाव निश्चित झालं....त्यानंतर मग ह्या प्रकाशनाचं एखादं ओळखचिन्ह असावं असा प्रस्ताव आला...अनेकांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे ओळखचिन्ह बनवली...इथेही निवडणूक प्रक्रियेने ओळखचिन्ह ठरवण्यात आलं ते आपलाच एक सहकारी विशाल कुलकर्णीने बनवलेलं होतं...आणि मग लोक उत्साहाने अंक बनवण्यासाठी मदत करू लागले.... ही मदत लेखन स्वरूपातली होती जी अतिशय आवश्यक होती...ज्यामध्ये महाजालावरील प्रथितयश लेखकांनीही आपला सहभाग नोंदवला...पडद्याच्या मागे तांत्रिक मदतीसाठी मात्र फारसे लोक सहभागी होऊ शकले नाहीत...सुरुवातीला जे तीन चार जण होते त्यातले बहुतेक लोक वैयक्तिक व्यस्ततेमुळे पुढे सक्रिय राहू शकले नाहीत...आणि केवळ राहिली ती म्हणजे श्रेया रत्नपारखी...ती अगदी आपल्या ’हास्यगाऽऽरवा २०१२’ ह्या शेवटच्या अंकापर्यंत...आता तिनेही तिच्या वैयक्तिक जबाबदार्‍या वाढल्यामुळे ह्यापुढे काम करण्यास असमर्थता प्रकट केलेय....एकूणात पुन्हा मी एकटाच उरलोय...जिथून सुरुवात केली तिथेच परत आलो..एक वर्तुळ पूर्ण झाले...तेव्हा आता ठरवले..बस्स! इथेच थांबायचे!

अंक काढून काय मिळवलं? ह्याची बरीच उत्तरे आहेत...ज्यातली काही आवडणारी तर काही नावडणारी आहेत...
अंक काढण्यात माझा वैयक्तिक फायदा असा झाला की माझा स्वत:चा वेळ उत्तम गेला आणि अंक संपादनाच्या निमित्ताने साहित्यातील वैविध्यता पुरेपूर अनुभवता आली.
अंकाला लेखकांचा पाठिंबा भरपूर प्रमाणात मिळाला...प्रथितयश लेखकांच्या बरोबरीने नवोदित लेखकांनीही आपली हजेरी लावली हे विशेष नमूद करण्यासारखे आहे.
होळीच्या निमित्ताने निघणार्‍या खास विनोदी साहित्यासाठीच्या ’हास्यगाऽऽरवा’ अंकाला मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमी साहित्यपुरवठा झाला....बाकी एरवी इतर अंकांना भरगच्च म्हणावे इतका साहित्यपुरवठा झाला...ह्या अंकांच्या निमित्ताने आपल्यातल्याच काही लोकांना संपादकीय लिहिण्याची विनंती करण्यात आली आणि सांगायला आनंद वाटतो की सगळ्यांनी आपापले संपादकीय अतिशय उत्तम असे लिहिले...अंकांना आलेल्या प्रतिसादांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रतिसाद ह्या संपादकीयांना आहेत हीच त्याची पोचपावती समजता येईल.....
एकाही पैशाचा व्यवहार नसलेली अशी ही प्रकाशनसंस्था..बहुदा जगाच्या पाठीवरील पहिलीच असावी.  :
इथे एक गंमत सांगायला हरकत नाही.....जालरंगचे नाव वाचून एक दोघांनी ही संस्था व्यावसायिक स्वरूपाची प्रकाशन संस्था आहे असे समजून काही विचारणा केली होती....त्यातली एक विचारणा म्हणजे....एक लेखक म्हणून लेखकाचा त्याच्या लेखनावर किती अधिकार असतो, त्याला मानधन एकरकमी मिळते की काही अन्य पद्धतीने....
आणि दुसरी विचारणा....मला आपल्या अंकात जाहिरात द्यायची आहे....माझी जाहिरात अमूक अमूक इतकी लहान/मोठी आहे तर त्यासाठी किती आकार(पैशांच्या स्वरूपात) द्यावा लागेल?
आता ह्यांना मी काय उत्तर देणार?
मी जेव्हा सांगितले की,"अहो ही आमची आभासी संस्था आहे...आम्ही कुणाला मानधन देत नाही आणि कुणाकडूनही मानधन घेत नाही....जाहिराती वगैरे आम्ही छापत नाही.आमच्या संस्थेत एकाही पैशाचा व्यवहार होत नाही"...तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना!
ही झाली काही आवडणारी उत्तरं...

आता काही नावडणारी..पण वास्तववादी उत्तरं....
अंकाला जितका साहित्यिकांचा भरपूर पाठिंबा मिळाला त्या मानाने वाचकांचा..विशेष करून प्रतिसादकांचा  मिळालेला प्रतिसाद अतिशय असमाधानकारक आहे.
आपल्या साहित्यिकांमध्ये महाजालावर अतिशय लोकप्रिय असे जे जालनिशीकार आहेत त्यांचा सहभाग असूनही...त्या त्या जालनिशीकारांच्या वैयक्तिक वाचक/चाहत्यांना जालरंगकडे आकर्षित करू शकलो नाही...थोडक्यात ह्या लेखकांना ना जालरंगाचा फायदा झाला ना जालरंगाला त्यांच्या लोकप्रियतेचा....एकूण काय तर आपल्या अंकात नामवंत लेखकांचे साहित्य असूनही वाचकांनी आपल्याला दिलेला अत्यल्प प्रतिसाद हा नाऊमेद करणारा आहे...जालरंगने अंकांमध्येही वैविध्य ठेवले होते...ध्वनीमुद्रित स्वरूपाचा ’जालवाणी’सारखा अंक देऊनही आपण रसिक वाचकांना आपल्याकडे आकर्षित करू शकलो नाही....ह्या आघाडीवर आपण कधीच प्रगती करू शकलो नाही....ह्याची कारणमीमांसा कशी करावी हे आजवर मला तरी समजलेलं नाही...माझ्या दृष्टीने हे न सुटलेले एक कोडेच आहे.

गंमतीने असे म्हणावेसे वाटते की....शस्त्रक्रिया यशस्वी झाली....पण रूग्ण वाचू शकला नाही. :)
तसंच काहीसं जालरंगचं झालं. 

म्हणूनच म्हणतो आता इथेच थांबूया!

७ मार्च, २०१२

होळीविशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’चे प्रकाशन!

मंडळी ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहात होता तो आपला होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’ आज होळीच्या दिवशी आम्ही प्रकाशित करत आहोत. विनोदी लेखन ...त्यातूनही ठरवून विनोदी लिहायचे म्हटले की भलीभली सिद्धहस्त मंडळी माघार घेतात ह्याचा अनुभव ह्यावर्षीही आम्हाला आलाय. त्यामुळे हा अंक तसा अगदीच छोटेखानी झालाय ह्याची आम्हाला कल्पना आहे...तरीही हे निश्चित की जे काही आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत त्यामुळे आपले निखळ मनोरंजन होईल ही खात्री आहे...तेव्हा करा सुरुवात वाचायला...आणि जमल्यास प्रतिसादही द्या.
अंकाचा दुवा:
http://holivisheshank2012.blogspot.in/2012/03/blog-post_05.html

७ फेब्रुवारी, २०१२

होळी विशेषांक २०१२ संबंधीचे निवेदन!

मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक अर्थातच विनोदी साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं/विनोदी स्वरूपाचं अभिवाचन/प्रहसन वगैरे पद्धतीचे लेखन/ध्वनीमुद्रण अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.एखाद्याने पाठवलेल्या साहित्यात काही आक्षेपार्ह/संदर्भहीन मजकूर असल्यास त्याच्याशी वैयक्तिक संपर्क साधून साहित्यात योग्य तो बदल करून देण्याची विनंती करण्यात येईल.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही बदल करण्यास नकार दिल्यास नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... ४ मार्च २०१२ (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता  jaalarangaprakaashana@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले साहित्य.
खास आकर्षण: ह्या अंकाचे संपादकीय आपले सगळ्यांचे मित्र श्री हेरंब ओक हे लिहिणार आहेत.

२९ नोव्हेंबर, २०११

हिवाळी अंक २०११ संबंधीचे निवेदन!

दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या अंकासाठी आपले उत्तमोतम साहित्य पाठवावे असे आम्ही आपणास आवाहन करत आहोत...
साहित्य कोणते असावे?
साहित्याला  विषयाचे/प्रकाराचे कोणतेही बंधन नाही ... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/विनोदी/प्रवासवर्णन/चरित्र/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि कोणत्याही विषयावरील लेखन चालेल.. त्याच बरोबर ध्वनीमुद्रण(अभिवाचन.. कविता अथवा लेखाचे),ध्वनीचित्रमुद्रण,छायाचित्रण आणि व्यंगचित्र अशा प्रकारचं  साहित्यही ह्या अंकासाठी आपण पाठवू शकता.

काही अटी आणि नियम:
  केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन अंकात प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही. जरूर तिथे संबंधित साहित्यिकाशी बोलून निर्णय घेतला जाईल.

अहो, आम्हालाही ह्या अंकात भाग घ्यायचाय, पण खरंच सांगतो/सांगते नवीन लिहायला अजिबात वेळ नाहीये हो..जुनं अजिबात चालणार नाही का?

नवीन लिहायला वेळ नाही...हरकत नाही...मग आपले जुने लेखनही चालेल.
अरेच्चा,वर तर म्हणताय की केवळ नवे आणि ताजे लेखन हवंय आणि इथे म्हणता जुनेही चालेल...नीट काय ते सांगा ना!
थांबा,थांबा मंडळी! असे एकदम अंगावर येऊ नका....सांगतो...नीट वाचा.  :)
जुने लेखनही चालेल, पण, त्याचे स्वरूप बदलून,बरं का...म्हणजे कसे? सांगतो....आपल्याच कोणत्याही जुन्या लेखाचे/कवितेचे अभिवाचन/गायन करून आपण ते आम्हाला पाठवू शकता...पाठवतांना कृपया तसा उल्लेख मात्र करावा.



साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.


ह्या अंकाबाबत आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
jaalarangaprakaashana@gmail.com

साहित्य पाठवताना हिवाळी अंक २०११साठी असे लिहून पाठवावे.
आपले साहित्य आमच्याकडे पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे २१ डिसेंबर २०११

चला तर मग आता लागा तयारीला आणि आपले साहित्य आमच्याकडे ठरलेल्या मुदतीत पाठवायला विसरू नका.

१८ मार्च, २०११

हास्यगाऽऽरवा २०११ चे प्रकाशन!

नमस्कार मंडळी! ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होता तो जालरंग प्रकाशनाचा होळी विशेषांक हास्यगाऽऽरवा आता आम्ही आपल्या हाती देत आहोत. ह्या अंकातील विविध प्रकारच्या साहित्यामुळे आपल्या आयुष्यातले चार क्षण जरी हसरे व्यतीत झाले तरी आम्ही केलेल्या प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो असे समजू.

ह्या अंकाचं संपादकीय लिहिलंय आंतरजालावरील एक कसलेले लेखक श्री. जयंत कुलकर्णी ह्यांनी. अंक सजावट श्रेया रत्नपारखी हीने नेहमीप्रमाणेच नेटकी केलेली आहे.
ह्या अंकात सहभाग घेतलेले रथी-महारथी आहेत महेंद्र कुलकर्णी, हेरंब ओक, विद्याधर भिसे, विनायक पंडित, चेतन गुगळे, संकेत पारधी, गंगाधर मुटे, प्रभाकर फडणीस, क्रांति साडेकर, विशाल कुलकर्णी, अपर्णा संखे-पालवे, जयबाला परूळेकर, सुहास झेले, निशिकांत देशपांडे, आनंद घारे, देवदत्त गाणार, श्रेया रत्नपारखी आणि स्वत: जयंत कुलकर्णी.

चला तर मग, करा सुरुवात वाचायला....आणि हो, आपला चांगला /वाईट जो काही प्रतिसाद असेल तो जरूर नोंदवा बरंका!
हा आहे अंकाचा दुवा. http://holivisheshank2o11.blogspot.com/

कळावे,
आपला स्नेहांकित
प्रमोद देव

५ फेब्रुवारी, २०११

होळी विशेषांक २०११ संबंधीचे निवेदन!

मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे दुसरा होळी विशेषांक २०११.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं/विनोदी स्वरूपाचं अभिवाचन/प्रहसन वगैरे पद्धतीचे लेखन/ध्वनीमुद्रण अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.एखाद्याने पाठवलेल्या साहित्यात काही आक्षेपार्ह/संदर्भहीन मजकूर असल्यास त्याच्याशी वैयक्तिक संपर्क साधून साहित्यात योग्य तो बदल करून देण्याची विनंती करण्यात येईल.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही बदल करण्यास नकार दिल्यास नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... १२ मार्च २०११ (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता attyanand@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले साहित्य.
खास आकर्षण:ह्या अंकाचं संपादकीय आपले सगळ्यांचे मित्र श्री जयंत कुलकर्णी हे लिहिणार आहेत.

२० डिसेंबर, २०१०

शब्दगाऽऽरवा २०१० चे प्रकाशन!

मंडळी, शब्दगाऽऽरवा २०१०चे आज आम्ही प्रकाशन करत आहोत. ह्या अंकासाठी सर्वस्वी मेहनत घेणार्‍या श्रेया रत्नपारखीचे विशेष कौतुक आहे. प्रत्येकवेळी काही तरी नवं द्यायचं ह्या तिच्या ध्यासापायी अंकाचं दर्शनी स्वरूप दिवसेंदिवस आकर्षक होत चाललंय. पडद्याआडून तांत्रिक मदत देणार्‍या कांचन कराई,देवदत्त गाणार आणि दीपक शिंदे ह्यांचेही खास आभार .

ह्या अंकापासून आम्ही एक नवा पायंडा राबवत आहोत...संपादकीय, हे आमच्या अंकातील एखाद्या लेखकानेच लिहावे अशा हेतूने ह्यावेळी आम्ही संपादकीय कोण लिहीणार असे आवाहन केले होते त्याला चेतन गुगळे ह्याने संमती दिली आणि मला सांगायला आनंद होतोय की त्याने ही जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पार पाडलेली आहे.

ह्या वेळचा अंक आपल्या लेखन/वाचन इत्यादिंनी साकारणारी मंडळी आहेत.... अपर्णा लळिंगकर,अपर्णा संखे-पालवे,
अलका काटदरे,आनंद काळे,कामिनी फडणीस-केंभावी (श्यामली),क्रान्ति साडेकर,गंगाधर मुटे,चेतन गुगळे,जयंत कुलकर्णी,
जयंत खानझोडे,जयबाला परूळेकर,जीवनिका कोष्टी,देवदत्त गाणार,देवेंद्र चुरी,नरेंद्र गोळे,पाषाणभेद (दगडफोड्या),
प्रभाकर फडणीस,प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,मंदार जोशी,महेंद्र कुलकर्णी,मीनल गद्रे,राहुल पाटणकर (राघव),विद्याधर भिसे,
विनायक पंडित,विनायक रानडे,विशाल कुलकर्णी,समीर नाईक,सुधीर कांदळकर,सुरेश पेठे,सोमेश बारटक्के,हेरंब ओक .

तर मंडळी आता व्हा तयार ह्या अंकाची लज्जत चाखायला.त्यासाठी http://hivaliank2010.blogspot.com/ ह्या दुव्यावर टिचकी मारा.

२२ नोव्हेंबर, २०१०

हिवाळी अंक २०१० संबंधीचे निवेदन!

दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष आहे.

लेखनाचे विषय असे असतील... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/प्रवासवर्णन/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि . त्याच बरोबर ध्वनीमुद्रण(अभिवाचन.. कविता अथवा लेखाचे),ध्वनीचित्रमुद्रण,छायाचित्रण आणि व्यंगचित्र अशा प्रकारचं साहित्यही ह्या अंकात समाविष्ट केलं जाईल.

लेखन पाठवण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१० अशी आहे. लेखनासोबत छापण्यासाठी आपले छायचित्रही जरूर पाठवावे. नाताळच्या आसपास हा अंक प्रसिद्ध करण्याचा मनसुबा आहे.
केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन इथे प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही.


साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.


ह्या अंकाबाबत काही सुचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
attyaanand@gmail.com
लेखन पाठवताना हिवाळी अंक २०१० असे लिहून पाठवावे.

चला तर मग आता लागा कळफलक बडवायला. कथा,कविता,लेख वगैरे जे हवे ते लिहा आणि पाठवा.

२१ ऑक्टोबर, २०१०

दिवाळी अंक प्रकाशन!

जालरंग प्रकाशनाचा दीपज्योती हा अंक प्रकाशित करतांना मी आज खूप खूश आहे. हा अंक बनवणे म्हणजे एक आव्हान होते आणि ते मी पेलू शकलो ते निव्वळ श्रेया रत्नपारखी आणि कांचन कराई ह्या दोघींच्या भरवश्यावर...अंकाचे हे जे काही सुंदर स्वरूप आपल्याला दिसत आहे ती त्या दोघींची कमाल आहे...मी केवळ नामधारी आहे.

हा आहे दुवा...  

http://diwaaliank.blogspot.com/

असो. आता वाचकांना नम्र आवाहन आहे की त्यांनी हा अंक जरूर वाचावा आणि त्यांच्या बर्‍या/वाईट प्रतिक्रिया नोंदवाव्यात...जेणेकरून आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळेल.

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतांना हा अंक प्रकाशित झाला असे मी जाहीर करतो.

धन्यवाद.

२० ऑगस्ट, २०१०

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !

मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. दिवाळीचे स्वागत आपणही करूया साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी.
तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता.

आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये. लेख,कविता,निबंध,कथा(लघुकथा,दीर्घकथा),विनोद,विडंबन, प्रवासवर्णन,व्यक्तीचित्र,आत्मकथन-अनुभव इत्यादि लेखनप्रकार आणि छायाचित्रण,व्यंगचित्र,ध्वनीमुद्रण,ध्वनीचित्रमुद्रण वगैरे पद्धतींचा अवलंब करूनही आपण साहित्य पाठवू शकता.

साहित्य कोणते हवे?
१)दिवाळी अंकासाठी ताजे आणि आत्तापर्यंत अप्रकाशित साहित्यच हवे.
२) आपला दिवाळी अंक प्रकाशित होईपर्यंत आपण इथे पाठवलेले साहित्य कोणत्याही परिस्थितीत कुठेही...अगदी आपल्या जालनिशी/ब्लॉगवरही प्रकाशित करायचे नाही.


साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.
साहित्य पाठवण्याचा पत्ता... attyanand@gmail.com असा आहे.
साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आहे १५ ऑक्टोबर २०१०


दिवाळी अंक प्रकाशनाची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल.

१४ ऑगस्ट, २०१०

’जालवाणी’ ह्या ध्वनीमुद्रित अंकाचे प्रकाशन!

मंडळी आज मला हे जाहीर करायला आनंद होतोय की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि साक्षीने जालवाणी हा पहिला-वहिला ध्वनीमुद्रित अंक प्रकाशित होत आहे. ह्या अंकात आपल्याला गद्य आणि पद्य अभिवाचन ऐकायला मिळणार आहे.

जालवाणीचा दुवा सगळ्यांसाठी... http://jaalavaani.blogspot.com/


ह्या अंकाचे मानकरी आहेत...संकेताप्रमाणे आधी स्त्रियांची नावं देतो.
१)मीनल गद्रे, २) कांचन कराई ३) श्रेया रत्नपारखी, ४)अपर्णा लळिंगकर, ५)अनुजा पडसलगीकर, ६)अनुजा मुळे उर्फ झुंबर, आणि ७) तन्वी देवडे

आता ह्यानंतर पाळी आहे पुरूष मानकर्‍यांची...
१)विनायक रानडे, २) महेंद्र कुलकर्णी, ३) नरेंद्र गोळे, ४)सुधीर काळे, ५)गंगाधर मुटे, ६)हेरंब ओक, ७) विद्याधर भिसे,८)सोमेश बारटक्के, ९)चेतन गुगळे,१०) अमोघ वाघ, ११)दिनेश कोयंडे,१२)विशाल कुलकर्णी,१३)रोहन चौधरी आणि १४) प्रमोद देव


मित्रांनो आणि मैत्रिणीनोही...
हा अंक तसा काही फार देखणा वगैरे नाहीये. जालनिशीच्या एकाच पानावर एकाच ठिकाणी सगळी ध्वनीमुद्रण ऐकण्यासाठी केलेली एक सोय....इतकेच ह्याचे दर्शनी स्वरूप आहे. तेव्हा पहिल्या प्रथम कदाचित आपला भ्रमनिरास झाला असे वाटू शकेल. :)
पण मंडळी, विश्वास ठेवा..जेव्हा आपण एकेक अभिवाचन ऐकू लागाल, तेव्हा आपले आधीचे मत नक्कीच बदललेले असेल...आपण निश्चितच तृप्त झालेले असाल...ह्याची मला खात्री आहे.

ह्या अंकाच्या निमित्ताने काही तांत्रिक गोष्टी मला शिकायला मिळाल्या हा माझ्यासाठीचा एक वैयक्तिक फायदा. ह्यापुढेही अशाच प्रकारचे अंक आम्ही काढत राहू, तंत्रज्ञान जेवढे आम्ही आत्मसात करू तेवढी त्यात अजून जास्त सफाई, देखणेपणा, आकर्षकपणा इत्यादि येईल ह्याबाबत माझ्या मनात शंका नाही.

जाता जाता एक सांगतो की अंकाला मिळणारा लेखक-अभिवाचकांचा प्रतिसाद सुरुवातीला अतिशय क्षीण असा होता...आणि नंतर हळूहळू वाढत आत्ता शेवटच्या क्षणी मात्र तो अचानक ढगफुटी व्हावा तसा येऊन आदळला. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की पुढच्या अंकाच्या वेळी कृपया असे होऊ देऊ नका. शेवटी आलेली अनेक ध्वनीमुद्रणं वेळेअभावी मी ह्यात समाविष्ट करू शकलेलो नाहीये ह्याबद्दल क्षमस्व...मात्र ही ध्वनीमुद्रण पुढच्या अंकात जरूर प्रकाशित होतील ह्याची खात्री बाळगा.

अजून एक जाता जाता सांगतो की...आमच्या दिवाळी अंकाच्या घोषणेकडे लक्ष ठेवून असा....लवकरच त्याबाबतचे निवेदन निघणार आहे.

मीनल गद्रे, कांचन कराई,विद्याधर भिसे ह्यांचे विशेष आभार एवढ्याचसाठी की त्यांनी...इतरांनाही आपला आवाज दिला.

संपादनाच्या छोट्यामोठ्या गोष्टीत साहाय्य केल्याबद्दल श्रेया रत्नपारखी ह्यांचेही विशेष आभार.

कळावे,

आता भेटूया...दिवाळी अंकासोबत.

१७ जून, २०१०

पावसाळी विशेषांक प्रकाशन !

मंडळी, आज  १७ जून. आपल्या हाती हा पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा देतांना मला विशेष आनंद होत आहे. सद्द्या पावसाने चांगलाच जोर धरलाय आणि अशा कुंद-फुंद वातावरणात कॉफी अथवा मसालेदार चहाचे(आपापल्या आवडीप्रमाणे) घुटके घेता घेता आमचा हा अंक वाचतांना आपला आनंद द्विगुणित होईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे.  ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे....तेव्हा आता करा सुरुवात वाचायला....आणि हो...अंक आवडला/नावडला तरी कृपया तुमची प्रतिक्रिया टंकायला विसरू नका बरं का.

कळावे आपला
स्नेहांकित
प्रमोद देव

१७ मे, २०१०

पावसाळी विशेषांक!

मंडळी...हिवाळी विशेषांक  आणि होळी विशेषांक  ह्या दोघांनंतर आता आपण काढत आहोत पावसाळी विशेषांक.
ह्या अंकासाठी आपण खास असा कोणताही विषय ठेवत नाही आहोत...मात्र "पाऊस आणि पावसाळी" अशा काही ओलेचिंब आठवणी आपल्याला सादर करायच्या असतील तर त्यासाठी आपण एक वेगळे सदर जरूर ठेवूया.
ह्या अंकासाठी आपण कथा.कविता,आठवणी,ललित,व्यंगचित्र,खास छायाचित्रं...इत्यादी कोणत्याही प्रकारचे साहित्य पाठवू शकता....मात्र अट एकच आहे....जे काही पाठवाल ते ताजे हवे...पूर्वप्रकाशित नको आणि आपला अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य इतरत्र कुठेही प्रकाशित होणार नाही ह्याची काळजी घ्या...

आपले साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आहे १५जून २०१० . अंक प्रकाशित करण्याची तारीख त्यानंतर जाहीर करण्यात येईल.
विशेष सूचना: ह्या अंकासाठी येणारे प्रत्येक लेखन प्रकाशित करण्याचा आमचा मनोदय आहे. येणार्‍या साहित्यात कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत...मात्र तशीच जरूर भासली तर संबंधित व्यक्तीशी चर्चा करूनच त्याप्रमाणे बदल केला जाईल....आलेल्या साहित्यात फक्त टंकलेखन  ,शुद्धलेखन इत्यादिमध्ये काही चूक आढळली तर तेवढेच संपादन त्यात केले जाईल.

आपले लिखित साहित्य कोणत्याही परिस्थितीत पीडीएफ  मध्ये पाठवू नका. एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवू शकता.  साहित्य पाठवण्याचा पत्ता आहे...
attyanand@gmail.com

तर मग लागा तयारीला...

२५ फेब्रुवारी, २०१०

होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा ’ प्रकाशन !(सुधारित निवेदन)

मंडळी नियोजित वेळेआधी म्हणजे २८ फेब्रुवारी ऐवजी आम्ही आमचा होळी विशेषांक  ’हास्यगाऽऽरवा ’ आज,आत्ताच (दिनांक २४/०२/२०१० ..वेळ दुपारी. २.२५ ) पीडीएफ स्वरूपात स्क्रिब्डवर प्रकाशित करत आहोत.ज्यांना हा अंक उतरवून घ्यायचा आहे ते तो इथून उतरवून घेऊ शकतात.

तेव्हा,वाचा आणि मजा लुटा होळीची. आणि हो प्रतिसाद द्यायलाही विसरू नका.
ज्यांना  स्क्रिब्डवर हा अंक वाचता येत नसेल अथवा तिथे प्रतिक्रिया देता येत नसतील  त्यांना हास्यगाऽऽरवा  वाचण्यासाठी इथेही उपलब्ध आहे . इथेच प्रतिक्रिया देण्याचीही सोय केलेली आहे.



हास्यगाSSरवा, होळी विशेषांक २०१०

३० जानेवारी, २०१०

होळी विशेषांक!

मित्र-मैत्रिणींनो लक्ष देवून वाचा.
शद्बगाऽऽऽरवा ह्या हिवाळी विशेषांकानंतर आम्ही आणत आहोत होळी विशेषांक.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं वगैरे पद्धतीचे लेखन अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... १९फेब्रुवारी २०१० (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता attyanand@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले सहित्य.

२ डिसेंबर, २००९

हिवाळी अंक प्रकाशन!

मित्रहो, महिन्यापूर्वी "महाजालीय शारदीय अंक" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं. त्याच वेळी हा अंक साधारण नाताळच्या आसपास प्रसिद्ध करावा असंही मनात योजलेलं होतं; मात्र ह्या कल्पनेला आलेला उदंड प्रतिसाद आणि प्रकाशन कधी होणार? अशी सातत्याने होणारी विचारणा लक्षात घेऊन, वाचकांची उत्सुकता जास्त ताणून न .. धरता आम्ही हा अंक आजच प्रकाशित करत आहोत.

शारदीय अंक...हे खरं तर ह्या अंकाचं नाव नव्हतंच...तर तो एक अंकाचा प्रकार होता....जसा दिवाळी अंक.
आवाहना दरम्यानच्या चर्चेत ह्या अंकाचे नाव काय असावे....ह्याबद्दलही एकदोन सुचवण्या आलेल्या होत्या. प्रशांत मनोहरने....प्रकाशनाच्या दरम्यान शिशिर ऋतू असणार म्हणून त्याला ’शैशिरिय’ म्हणावे...असे मत मांडले, तर क्रान्तिने ’शब्दगारवा’ हे नाव सुचवले.

बराच विचार केल्यावर आम्ही असे ठरवले की..... अंक हिवाळ्यात प्रसिद्ध होतोय म्हणून.....हिवाळी अंक.. आणि म्हणूनच त्याला साजेसे क्रान्तिने सुचवलेले शब्दगाऽऽरवा हेच नाव आम्ही ह्या अंकासाठी निश्चित केलंय.

ह्या अंकात आपल्याला जुन्या-नव्या अशा सर्वांचे लिखाण वाचायला मिळणार आहे. ह्या अंकातील मान्यवर असे आहेत......
क्रान्ति, मदनबाण, माझी दुनिया, स्नेहाराणी, मनीषा भिडे, विनायक रानडे, कै. गीता जोगदंड,शशिकांत ओक, वैशाली हसमनीस, जयश्री अंबासकर, सुधीर काळे, अवलिया, नरेंद्र प्रभू, नरेंद्र गोळे , सुधीर कांदळकर, जयबाला परूळेकर आऽऽऽणि कांचन कराई(आदिती).

ह्या अंकाच्या संपादनात विनायक रानडे, माझी दुनिया आणि मदनबाण ह्यांनी मोलाचे साह्य केलेले आहे.
ह्या अंकातील सजावट आणि अंकाच्या मुखपृष्ठाचे काम विनायक रानडे ह्यांनी खूपच सुंदर पद्धतीने केलंय.

तेव्हा हा अंक आपल्यासारख्या दर्दी रसिकांच्या हवाली करत आहोत. वाचा आणि सांगा....कसा वाटला अंक.

कळावे,
आपला स्नेहांकित
प्रमोद देव

६ नोव्हेंबर, २००९

महाजालीय शारदीय अंक!

मंडळी,माझ्या मनात एक आयडियाची कल्पना आलेय. महाजालीय दिवाळी अंकासारखाच एक महाजालीय शारदीय अंक काढावा...ज्यासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण.
ह्या अंकासाठी लेखनाचा विषय कोणताही चालेल. तरीहीलोकांनी विचारणा केल्यामुळे अजून सविस्तर लिहितोय.
लेखनाचे विषय राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/प्रवासवर्णन/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन इत्यादि कोणतेही चालतील.

लेखन पाठवण्याची शेवटची तारीख ३०नोव्हेंबर २००९ अशी आहे. लेखनासोबत छापण्यासाठी आपले छायचित्रही जरूर पाठवावे. नाताळच्या आसपास हा अंक प्रसिद्ध करण्याचा मनसुबा आहे.
केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन इथे प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही.

ह्या अंकाचे स्वरूप ब्लॉग पद्धतीचेच राहील...कारण मला स्वत:ला तांत्रिक गोष्टीत फारसे गम्य नाही. तरीही काही उत्साही आणि जाणकार मंडळी मदतीला मिळाली तर ह्या अंकाचे स्वरूप अधिक आकर्षक करता येईल.

तरी ह्या अंकाबाबत काही सुचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
attyaanand@gmail.com
लेखन पाठवताना.....शारदीय अंकासाठी....असे लिहून पाठवावे.....म्हणजे माझ्या वैयक्तिक पत्रव्यवहारापेक्षा वेगळे म्हणून लगेच लक्षात येईल.
चला तर मग आता लागा कळफलक बडवायला. कथा,कविता,लेख वगैरे जे हवे ते लिहा आणि पाठवा.
तथास्तु!!!