माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ नोव्हेंबर, २०११

हिवाळी अंक २०११ संबंधीचे निवेदन!

दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या अंकासाठी आपले उत्तमोतम साहित्य पाठवावे असे आम्ही आपणास आवाहन करत आहोत...
साहित्य कोणते असावे?
साहित्याला  विषयाचे/प्रकाराचे कोणतेही बंधन नाही ... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/विनोदी/प्रवासवर्णन/चरित्र/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि कोणत्याही विषयावरील लेखन चालेल.. त्याच बरोबर ध्वनीमुद्रण(अभिवाचन.. कविता अथवा लेखाचे),ध्वनीचित्रमुद्रण,छायाचित्रण आणि व्यंगचित्र अशा प्रकारचं  साहित्यही ह्या अंकासाठी आपण पाठवू शकता.

काही अटी आणि नियम:
  केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन अंकात प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही. जरूर तिथे संबंधित साहित्यिकाशी बोलून निर्णय घेतला जाईल.

अहो, आम्हालाही ह्या अंकात भाग घ्यायचाय, पण खरंच सांगतो/सांगते नवीन लिहायला अजिबात वेळ नाहीये हो..जुनं अजिबात चालणार नाही का?

नवीन लिहायला वेळ नाही...हरकत नाही...मग आपले जुने लेखनही चालेल.
अरेच्चा,वर तर म्हणताय की केवळ नवे आणि ताजे लेखन हवंय आणि इथे म्हणता जुनेही चालेल...नीट काय ते सांगा ना!
थांबा,थांबा मंडळी! असे एकदम अंगावर येऊ नका....सांगतो...नीट वाचा.  :)
जुने लेखनही चालेल, पण, त्याचे स्वरूप बदलून,बरं का...म्हणजे कसे? सांगतो....आपल्याच कोणत्याही जुन्या लेखाचे/कवितेचे अभिवाचन/गायन करून आपण ते आम्हाला पाठवू शकता...पाठवतांना कृपया तसा उल्लेख मात्र करावा.



साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.


ह्या अंकाबाबत आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
jaalarangaprakaashana@gmail.com

साहित्य पाठवताना हिवाळी अंक २०११साठी असे लिहून पाठवावे.
आपले साहित्य आमच्याकडे पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे २१ डिसेंबर २०११

चला तर मग आता लागा तयारीला आणि आपले साहित्य आमच्याकडे ठरलेल्या मुदतीत पाठवायला विसरू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: