किशोरदाच्या धीरगंभीर आवाजातलं हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे...इतके दिवस मला नीट शब्दही माहीत नव्हते...फक्त चालच डोक्यात होती...आज शब्दासकट चाल लक्षात आली....नेहमीप्रमाणेच ह्याचाही रूळ मिळाला आणि मी माझी गाण्याची हौस भागवून घेतली...ऐका आणि ठरवा...जमलंय की फसलंय ते.
माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
रूळ-गायन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रूळ-गायन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२८ जानेवारी, २०१२
२७ जानेवारी, २०१२
क्या से क्या हो गया...
मोहम्मद रफीच्या आवाजातले हे जुने अवीट गोडीचे गाणे...माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकीच एक...त्याचा रूळ मिळाला मग मीही जरा घसा साफ करून घेतला....ऐका आणि ठरवा जमलंय की फसलंय ते.
२६ जानेवारी, २०१२
मेरे नैना सावन भादों....
किशोरकुमारच्या आवाजातलं हे अजून एक सुंदर गाणं...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक...
माझ्या आवाजात रूळासंगे ऐका....जमलंय/फसलंय ते तुम्हीच सांगा.
२५ जानेवारी, २०१२
जाने कहॉं गये वो दिन...
मेरा नाम जोकर ह्या सिनेमातील मुकेशने गायलेले हे सदाबहार गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकीचे एक...आज तेच गाणं गाण्याचा योग आलाय...एक वाद्यसंगीताचा रूळ मिळाला म्हणून..ऐकून सांगा कितपत जमलंय/फसलंय!
२४ जानेवारी, २०१२
ज्योती कलश छलके...
भाभीकी चुडियॉं ह्या जुन्या सिनेमातील ह्या गीताला सुश्राव्य संगीत दिलंय सुधीर फडके ह्यांनी आणि अर्थातच गाणारा स्वर्गीय आवाज आहे लतादिदींचा...असं हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकीच असणं हे ओघानेच आलं...प्रभाकर जोग ह्यांनी हेच गाणं वायोलिनवर अतिशय सुरेल असं वाजवलंय..मी त्याचाच रूळ म्हणून वापर करून माझी गाण्याची हौस भागवून घेतलेय....गाणं जमलंय का फसलंय हे जरूर सांगा...मात्र मूळ गाण्याशी..विशेषत: लतादिदींच्या आवाजाशी आणि गाण्याशी ह्याची तुलना करू नये(ती तशी होणेही नाही) ही विनंती.
२३ जानेवारी, २०१२
आनेवाला पल जानेवाला है...
किशोरदाच्या आवाजातलं हे मस्त गाणं आपण नेहमीच ऐकत आलोय...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक...आज त्याचा रूळ मिळाला आणि मग मीही प्रयत्न करून पाहिला...पाहा किती जमलाय/फसलाय ते तुम्ही ऐकून ठरवा.
१८ जानेवारी, २०१२
खोया खोया चांद, खुला आसमान...
रफीसाहेबांनी गायलेलं हे अजून एक सदाबहार गीत....काला बाजार सिनेमातलं आहे....माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक...त्याचा रूळ मिळाला आणि मीही आपलं नरडं साफ करून घेतलं...फक्त दोनच कडवी म्हणण्याइतका रूळ आहे त्यामुळे तेवढीच गायलेत....ऐका आणि सांगा हा प्रयत्न जमलाय की फसलाय?
१७ जानेवारी, २०१२
देव देव्हार्यात नाही....
’झाला महार पंढरीनाथ’ ह्या चित्रपटातील गदिमा रचित हे एक सुंदर गीत...ह्याची संगीतरचना केलेय सुधीर फडके आणि गायलंयलही त्यांनीच....माझ्या आवडत्या गीतांपैकी हे एक....प्रभाकर जोग ह्यांनी त्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेले हे गीत मी ऐकले आणि मग त्याचाच रूळ बनवून मीही माझा घसा साफ करून घेतला...ऐका आणि सांगा..हा प्रयत्न किती जमलाय/फसलाय?
१४ जानेवारी, २०१२
कोई सागर दिलको बहलाता नही...
शकील बदायुनी ह्यांची ही रचना, नौशादसाहेबांचे संगीत, रफीसाहेबांच्या आवाजातली ही एक अतिशय सुंदर आणि दर्दभरी गझल...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हेही एक...जालावर ह्याचा रूळ सापडला आणि मग मलाही मोह आवरला नाही आपलं नरडं साफ करण्याचा....ऐका आणि तुम्हीच ठरवा...जमलाय की फसलाय हा प्रयत्न.
पुन्हा एकदा केलाय प्रयत्न...ऐकून सांगा...जमलाय की फसलाय?
शब्दावाचून कळले सारे......
कविवर्य मंगेश पाडगांवकरांचं गीत,पुलंचं संगीत आणि पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी गायलेले हे गीत माझ्या आवडत्या गीतांमधलं एक आहे....संजय देशपांडे ह्यांनी हेच गीत सतारीवर वाजवलंय....त्यांनीही अतिशय छान वाजवलंय ते...मूळ चाल न बदलता तरीही स्वत:चं असं काही तरी...त्यामुळे ते डोक्यात चटकन बसत नव्हतं...आमचं काय हो...आम्ही अभिषेकीबुवांनी जसं गायलंय तसंच गाण्याचा प्रयत्न करत असतो...त्यामुळे डोक्यात तेच सूर,त्याच जागा दिसत असतात...त्यामुळे ह्या सतारीवर वाजवलेल्या गीताचा रूळ बनवून गाण्याचा माझा प्रयत्न म्हणावा तेवढा यशस्वी होत नव्हता...त्यातून ते ठाय लयीत होतं...मग काय थोडी लय वाढवली आणि केला प्रयत्न....डोक्यात अभिषेकी आणि प्रत्यक्ष सतारीबरोबर...म्हटलं तर अगदी साधंच गायचंय...तेव्हा थोडाफार गोंधळ नक्कीच उडालाय..तरी आवडेल आपल्याला हा प्रयत्न असं वाटतंय...ऐका आणि आपणच ठरवा काय ते.
१३ जानेवारी, २०१२
दिवाना हुआ बादल...
काश्मीर की कली ह्या चित्रपटातील रफीसाहेब आणि आशाताईंनी गायलेलं हे सुंदर गीत...रफीसाहेबांचा मधाळ, अवखळ आणि नखरेल स्वर तर आशाताईंचा मधाळ आणि लाडिक आवाज..दोन्हीही एकमेकांना अतिशय पुरक असेच आहेत...आता हे गीत मी गायचे म्हणजे पीडाच की हो...माझ्या दृष्टीने नव्हे... मी काय वाट्टेल ते गाऊ शकतो. ;)
ते मी तुम्हा श्रोत्यांच्या भूमिकेतून म्हणालोय मी. :ड
पण काय करणार अशोक वायगणकरसाहेबांनी मेंडोलिनवर वाजवलेलं हे मस्त गाणं मिळालं...मग बनवला त्याचाच रूळ आणि धावडवली माझी गाण्याची एक्स्प्रेस..त्यावरून...अगदी सुसाट...
आता इथे आलाच आहात तर ऐका हो... :)
ये है मुंबई, मेरी जान!
मंडळी खरं तर हे गाणं असं आहे...अय दिल है मुश्किल जीना यहॉं, जरा हटके , जरा बचके, मेरी बॉम्बे, मेरी जान! ... मोहम्मद रफी आणि गीता दत्तने गायलेलं आणि अतिशय गाजलेलं...लहानपणापासूनच माझंही आवडतं गाणं आहे हे...अशोक वायगणकरने माऊथ ऑर्गन आणि मेंडोलिनचा वापर करून हे गाणं मस्त वाजवलंय...मग मी त्याचाच रूळ बनवून माझी गाण्याची हौस भागवून घेतली....एक मात्र आहे...त्या बॉम्बेचे आता मुंबई असं अधिकृत नामकरण झालेलं असल्यामुळे मी ते ’मुंबई’ असंच सगळीकडे गायलंय...म्हणून शीर्षकही...ये है मुंबई, मेरी जान’ असंच दिलंय...गाणं ऐका आणि ठरवा कितपत जमलंय/फसलंय ते.
१२ जानेवारी, २०१२
है अपना दिल तो आवारा...
हेमंतकुमारच्या आवाजात गाजलेलं हे माझ्या लहानपणचं गीत...आज ते मला अशोक वायगणकरांनी माऊथ ऑर्गनवर वाजवलेलं मिळालं..मग काय त्याचाच रूळ बनवून मीही माझी हौस भागवून घेतली....ऐका आणि सांगा..जमलंय की फसलंय ते.
११ जानेवारी, २०१२
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई...
माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असा हा संत तुकारामांचा अभंग श्रीनिवास खळेसाहेबांनी संगीतबद्ध केलाय आणि लतादिदींच्या सुरेल आवाजात आपण नेहमीच ऐकत असतो...प्रभाकर जोग ह्यांनी तो त्यांच्या गाणार्या वायोलिनवर वाजवलाय...मी आपला मग नेहमीप्रमाणेच त्याचा रूळ बनवून माझ्या गाण्याची हौस भागवून घेतली...आता कितपत जमलाय/फसलाय हे तुम्हीच ठरवा...ऐकून.
या डोळ्यांची दोन पाखरे
पाठलाग ह्या जुन्या चित्रपटातील आशाताईंच्या आवाजातील हे एक गाजलेले गाणे...संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेले मला मिळाले..मग काय त्यालाच रूळ बनवून मीही केला गाण्याचा प्रयत्न!
१० जानेवारी, २०१२
जे वेड मजला लागले...
सुधीर फडके आणि आशा भोसले ह्यांच्या आवाजातलं हे सुरेल युगुलगीत खरं तर मी एकटा कसा गाणार? पण ह्यात आशाताईंचा सहभाग अगदी कमी आहे(तरीही अतिशय मोहक असाच आहे)...तरीही मी तो भाग नाईलाज म्हणून वाद्यासाठीच सोडून दिला...
संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेल्या ह्या गीताचा रूळ बनवून मी हे गीत गायलंय...ऐकून सांगा जमलंय/फसलंय का?
संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेल्या ह्या गीताचा रूळ बनवून मी हे गीत गायलंय...ऐकून सांगा जमलंय/फसलंय का?
६ जानेवारी, २०१२
चौदवीका चांद हो...
माझ्या बालपणात बिनाका-मालावर लागणार्या त्या काळच्या सुप्रसिद्ध आणि अवीट गोडीच्या गाण्यांपैकी एक हे...चौदवीका चांद हो...मोहम्मद रफीने काय नखरेलपणे हे गाणे गायलंय...आज इतक्या वर्षांनी मला ह्या गाण्याचा रूळ सापडला आणि मग मीही माझं नरडं साफ करून घेतलं...मंडळी..एक सांगायचंच राहिलंय..मी तसा तालात मुळातच कच्चा आहे त्यामुळे ह्या गाण्याबरोबरच इतर गाण्यातही बरेचसे ’हलेडुले’ झाले असण्याची दाट शक्यता आहे..तेव्हा विनंती आहे की ज्यांना ताल कळतो त्यांनी इथे मी गायलेल्या गाण्यातल्या त्या चुका अगदी बिनधास्तपणे सांगाव्यात...नेमक्या जागा सांगितल्या तर अजूनच मदत होईल मला...असो,आता गाणं ऐका.
आधीच्या गाण्यात थोडी सुधारणा केली आहे...खरंच तशी ती झालेय का? ऐकून सांगा.
चांद सी मेहबुबा हो मेरी!
हिमालयकी गोदमे ह्या जुन्या चित्रपटातील मुकेश ह्यांच्या आवाजातले हे गीत त्याकाळी अतिशय लोकप्रिय असे होते...आज त्याचा रूळ सापडला आणि मीही त्यावर गायचा प्रयत्न केलाय...
४ जानेवारी, २०१२
एक धागा सुखाचा!
जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील ग.दि. माडगुळकर लिखित ,गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्या आवाजातील
’एक धागा सुखाचा’ हे गीत माझे अनेक आवडत्या गीतांपैकी एक आहे. संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेले हे गीत मिळताच मी त्याचा रूळ बनवून त्यावर आपलं नरडं साफ करून घेतलंय...ऐका आणि सांगा कितपत जमलंय/फसलंय.
३ जानेवारी, २०१२
सुहानी रात ढल चुकी!
’सुहानी रात ढल चुकी’ हे मोहम्मद रफी ह्यांनी गायलेले गाणे माझे खूप आवडते आहे...कैक दिवसांपासून ते माझ्या नरड्यातून हवे तसे निघत नव्हते...अनायासे जालावर त्याचा रूळ मिळाला मग काय केला प्रयत्न...आज शेवटी एकदाचे बर्यापैकी जमलंय असं वाटतंय...ऐकून कसे ते आपणच ठरवा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)