जी.के.के.नायर! असे लांबलचक नाव धारण करणारी एक व्यक्ती आमच्या कार्यालयात दिल्लीहून मुंबईला बदलीवर आली.साधारण पन्नाशी गाठलेल्या ह्या व्यक्तीचे प्रथम दर्शनी रूप निश्चितच कुणावरही छाप टाकण्याइतके प्रभावी होतं. मध्यम उंची,तसाच मध्यम बांधा,नाकी-डोळी नीटस, भरपूर तेल लावून आणि मधल्या भांगाचे अगदी चापून चोपून बसवलेले काळे कुळकुळीत केस, डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चश्मा, अंगावर आकाशी रंगाचा सफारी पोशाख आणि हातात ऍरिस्टोक्रॅटची ब्रीफकेस अशा रुपातल्या जीकेकेला पाहिले आणि पहिल्या भेटीतच आमची मैत्री जमली.
ह्या जी.के.के आद्याक्षरांचे कोडे काय होते हे त्याने एकदा उलगडून दाखवले पण अगदी खरं सांगायचं तर तेवढ्यापुरतेच काय ते मला कळले. त्यानंतर मात्र मी ते पार विसरूनही गेलो. ह्या जीकेकेची एक खास अशी लकब होती. तो जेव्हा कामात मग्न असायचा तेव्हा त्याची मान एका विशिष्ट लयीत हलायची...कशी? जरा डोळ्यासमोर श्रीराम लागूंना आणा. संवाद म्हणतांना त्यांची मान कशी हलायची....आपलं कंप पावायची....अगदी तसेच. जीकेकेच्या ह्या लकबीमुळेच दादा पाटीलने...आमच्या कार्यालयातील ’दादा कोंडक्यानी’ जीकेके नायरचे नामकरण केले होते.....जी.कथकली नायर!
कथकली नाच करताना मानेच्या ज्या काही खास हालचाली असतात...तसे काहीसे नायरचे व्हायचे. त्या कथकलीचे नंतर एका बंगाल्याने ’कोथोकोली’ केले. :) तेव्हापासून जीकेके नायर म्हणजे जी.कोथोकोली नायर असे सुधारित नामकरण झाले आणि ते सर्वानुमते मान्य झाले. :)
जीकेके हा सैन्यदलातून आलेला म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर एक्स-सर्विसमन होता. कोणत्याही सैनिकाप्रमाणे तो त्याच्या कामात तरबेज होताच पण सैन्यात तो एक उकृष्ट कराटेपटू(खेळाडू) म्हणून गणला जायचा. अर्थात ही माहिती माझ्यासारख्या त्याच्याशी मैत्री असणार्या लोकांव्यतिरिक्त कुणालाही नव्हती. जीकेके वागायला इतका साधा होता की त्याने आपल्याकडे अशी काही विद्या आहे म्हणून मुद्दाम कधी कुणाची कळ काढलेय किंवा उगाचच कुणाला दम दिलाय असं माझ्या पाहण्यात आलं नाही. आपण आणि आपलं काम....बाकी काही नाही. कुणाच्या अध्यात ना मध्यात.
जीकेकेसारखीच सैन्यदलातून आमच्या कार्यालयात आलेली आणि आपल्या नोकरीतील दुसरी कारकीर्द चालवणारी ही बहुतेक माणसं ’ऑपरेटर’ सदरातील असायची. त्यामुळे जिथे कुठे मशीनमध्ये काही तांत्रिक दोष आला तर त्यांना माझ्यासारख्याची म्हणजे ’मेंटेनन्स’ वाल्याची जरूर लागायची. कदाचित ह्यामुळेच माझी आणि ह्या समस्त फौजी लोकांची वेव्ह-लेंग्थ जुळली असावी. ह्या सर्व माजी सैनिकांना सवलतीच्या दरात वस्तुखरेदीची जी सवलत असायची त्याचा फायदा एखादा अपवाद वगळता बहुतेक सर्वजण आमच्या सारख्या सिव्हिलियन्सना देत असत. जीकेकेही तशातलाच. त्याच्याकडे केव्हाही आपण काही मागणी नोंदवावी की पुढच्या वेळी जेव्हा तो कॅंटीन डिपार्टमेंट स्टोअरला जाईल तेव्हा आठवणीने तो ती गोष्ट घेऊन यायचा.
जीकेके अधनं मधनं आमच्यामध्ये हास्य-विनोद करायलाही सामील होत असे. त्याच्या कथकली ते कोथोकली ह्या नामकरणावरही त्याने हसून दाद दिलेली होती. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात तो तसा लोकप्रिय होता. कधीही कुणावर रागावलेला,रुसलेला असे मी त्याला पाहिलेले नव्हते....एक वेळचा अपवाद सोडला तर....
त्याचे काय झाले...आमच्याच कार्यालयात एक लेस्ली नावाचा गोव्याचा रोमन कॅथलिक तरूण होता. तरूणाईचा जोश म्हणा किंवा स्वभाव जात्याच खोडकर म्हणा...तो ज्याला त्याला उगाचंच छेडत असायचा. आमच्या कार्यालयात भर्ती झाला तेव्हा अगदी शेलाट्या बांध्याचा असणारा लेस्ली बघता बघता वर्ष-दोन वर्षात एकदम धष्टपुष्ट झाला. बहुदा मुंबईची हवा आणि खाणं-पिणं त्याला मानवलं असावं. ह्यामुळे की काय त्याचा व्रात्यपणा अजूनच वाढला...म्हणजे आधी तो लोकांशी फक्त शाब्दिक छेडाछेडी करायचा..पण आता वेळप्रसंगी शारिरीक मारहाण करण्या इतपतही त्याची मजल जायला लागली. आमच्या कार्यालयात तो फक्त दोघांना घाबरून असायचा.. त्यात एक म्हणजे दादा पाटील आणि दुसरा चिंटू उर्फ लुडविग...असाच दुसरा रोमन कॅथलीक..जो सराईत मुष्टीयोद्धा होता...तर ह्या दोघांपासून तो चार हात दूर असायचा.
लेस्लीला एकदा कधी नव्हे ती जीकेकेची कळ काढण्याची हुक्की आली. जीकेके ह्या आद्याक्षरांवरून,त्याच्या नायर ह्या जातीवरून आणि एकूणच त्याच्या मल्याळी भाषेबद्दल चेष्टा करायला सुरुवात केली. आधी जीकेकेने त्याच्याकडे साफ दूर्लक्ष केलं. तरीही लेस्ली गप्प बसेना...म्हणून मग जीकेकेने त्याला सडेतोड शाब्दिक उत्तर दिले. जीकेकेचे उत्तर ऐकल्यावर लेस्ली जाम भडकला आणि जीकेकेच्या अंगावर धावून गेला. मी लेस्लीला अडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण लेस्लीने मला झटकून टाकले आणि जीकेकेच्या सफारीची कॉलर धरली. तरीही जीकेके शांत होता. तो लेस्लीला समजावण्याचा प्रयत्न करत होता,शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण त्यामुळे लेस्ली अजूनच पेटत होता. जीकेके समजावणीच्या भाषेत बोलतोय म्हणजे आपल्याला तो घाबरलाय असे लेस्लीला वाटत होते त्यामुळे लेस्लीने इंग्लीशमधल्या त्याला येत असतील-नसतील त्या शिव्या द्यायला सुरुवात केली. तरीही जीकेके शांत होता. जीकेकेचा शांतपणा असह्य होऊन शेवटी लेस्लीने त्याला मारण्यासाठी आपला उजवा हात उगारला...तरीही जीकेके शांत होता.
इतक्यात तिथे साहेब येताहेत अशी कुणकुण लागली आणि लेस्ली तिथून पळाला. लेस्लीने शारिरीक पातळीवर हल्ला करूनही जीकेकेसारखा कराटेपटू गप्प का बसला...असा प्रश्न मला सतावत होता. इथे मी जीकेकेच्या जागी असतो तर... असो.
ह्या प्रसंगानंतरही जीकेकेच्या मनात लेस्लीबद्दल कोणतीही अढी निर्माण झाली नाही...उलट,बच्चा आहे अजून,डोकं गरम आहे..वय वाढेल तसा होईल शांत...असं जीकेके म्हणायचा. मात्र लेस्लीने जीकेकेच्या शांतपणाचा चुकीचा अर्थ लावला. जीकेके मला घाबरतो...असे तो सर्वांना सांगत सुटला.
ह्या प्रसंगानंतर पुन्हा एकदा लेस्लीने संधी साधून जीकेकेची छेड काढली पण जीकेकेच्या थंड प्रतिसादामुळे तो शांत होण्याऐवजी अजूनच पेटत गेला आणि शेवटी त्याने पुन्हा जीकेकेची कॉलर पकडली. कॉलर सोड...असे वारंवार सांगूनही लेस्ली ऐकेना. उलट त्याने जीकेकेला एकदोन फटकेही लगावले. आपल्या बापाच्या वयाच्या व्यक्तीवर विनाकारण हात उचलताना लेस्लीला जरासुद्धा लाज वाटत नव्हती आणि जीकेकेच्या शांतपणाचा तो गैर अर्थ काढून त्याच्यावर शारिरीक हल्ला करण्यात धन्यता मानत होता.
लेस्लीला समजावण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि आता तो हाताबाहेर जातोय हे लक्षात आल्यावर जीकेकेने त्याला दरडावणीच्या स्वरात इशारा दिला आणि झटक्यात दूर ढकलून दिले. ह्यावरून खरं तर लेस्लीला काय ते समजायला हवे होते पण उलट तो मोठ्या त्वेषाने जीकेकेवर धावून गेला. आता पुढे काय होतंय...ह्याची मी उत्कंठेने वाट पाहत होतो...आणि..
मी पाहिले की लेस्ली एकाच जागी ठाणबद्ध झालेला होता. जीकेकेने त्याच्या गळ्यात दोन बोटं खुपसली होती आणि लेस्ली त्याच्यापासून एका हाताच्या अंतरावर अक्षरश: सुटकेसाठी तडफडत होता. काही क्षण तशाच अवस्थेत लेस्लीला लटकत ठेवून मग शांतपणे जीकेकेने आपली बोटं तिथून काढून घेतली आणि लेस्ली धाडकन् जमिनीवर कोसळला. काही क्षण तो निपचित पडलेला पाहून मला खूप भिती वाटली ...वाटलं की लेस्ली बहुदा मेला की काय?
हुश्शऽऽ! पण थोड्याच वेळात तो शुद्धीवर आला आणि त्याला वास्तवाचे भान आले. आता मात्र त्याच्या डोळ्यात भिती दिसत होती. त्या तशाच पडलेल्या अवस्थेत त्याने हात जोडून जीकेकेकडे अभय मागितले. जीकेकेने खाली वाकून त्याला दोन्ही हाताने आधार देत उठवले,खुर्चीवर बसवले आणि पाणी प्यायला दिले.
त्या दिवसापासून लेस्लीची मस्ती अर्ध्याने कमी झाली. त्यानंतर त्याने कुणावरही शारिरीक हल्ला करायचा प्रयत्न केला नाही. म्हणतात ना ’समझनेवालोंको इशारा काफी होता है.’
लेस्लीसारख्यांकडे पाहून त्या म्हणीची आठवण येते...उथळ पाण्याला खळखळाट फार.
आणि जीकेकेसारख्यांकडे पाहून म्हणावेसे वाटते...फलभाराने वृक्षही नम्र होतात.
माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
व्यक्तीचित्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

२६ सप्टेंबर, २००९
८ फेब्रुवारी, २००९
शंकरराव! २
बापूशेठ आणि गोविंदराव ह्या दोघांना आमच्या कार्यालयात चहा बनवायला ठेवल्यामुळे साहजिकच चंदूशेठकडचा आमचा चहा पिणे बंद झाले. त्यामुळे शंकररावाचे आमच्या इथे येणे कमी झाले. पण अचानक एक संधी अशी आली की शंकरराव आमच्या कार्यालयात कायमचा चिकटला.
त्याचे असे झाले. आमच्याकडच्या झाडूवाल्याने कायमची नोकरी सोडून गाव गाठला. मग आयत्या वेळी त्याची जागा कोण घेणार? बापूशेठने शंकरमामाचे नाव सुचवले. आम्ही त्याला विचारले तर म्हणाला.... झव,मी कुनबी हाय! मी नाय झाडू मारन्यासारखी हलकी कामं करनार!(कोणत्याही वाक्याची सुरुवात...झव...ह्या शब्दाने होत असे. त्या शब्दाला काही अर्थ मात्र नव्हता.)
मग बापूशेठ म्हणाला.... मामा,उगाच नाटक करू नुको. ही नोकरी पर्मनंट हाय. चंदूशेठकडं मिलतो त्येच्यापेक्षा रगड पगार मिलेल,सुट्टीबी मिलेल. तवा आता नाय म्हनू नुको. आपन आपल्या घरात झाडू मारतो का नाय? तसा हिथं मारायचा. हाय काय आनि नाय काय?
तरी शंकरराव तयार होईना. पण आम्ही ह्यावेळी त्याला सोडायचेच नाही असे ठरवले होते. त्याची मुख्य हरकत होती ती संडास साफ करण्यासाठी. त्याबद्दल त्याची खात्री करून दिली की त्याच्या कामात संडास सफाई येत नाही. त्यासाठी एक वेगळा माणूस नेमलाय वगैरे. तेव्हा कुठे शंकरराव एकदाचा तयार झाला.
शंकरराव अशिक्षित होता पण त्याने काढलेला मुद्दा बिनतोड होता. कारण खरे तर झाडूवाला(स्वीपर) च्या कामात संडास सफाई देखिल येत असे. पण ह्यातली गोम अशी होती की झाडूवाला(स्वीपर) आणि फरशी साफ करणारा(फराश) अशी दोन पदं आमच्या कार्यालयात होती तरी सर्वप्रथम ती जेव्हा भरली गेली होती तेव्हा तत्कालीन कारकुनाने त्याच्या भाषिक अज्ञानामुळे पार उलटापालट केलेली होती. दोन्ही पदांसाठी पगार जरी तेवढाच होता तरी कामाचे स्वरूप मात्र वेगवेगळे होते. पण झाले काय की आता फराशला संडास सफाई करावी लागत होती आणि झाडूवाल्याला फक्त कार्यालयीन साफसफाई करावी लागत होती. पूर्वापार चालत आलेली ही चुकीची प्रथा कुणीही मोडायची तोशीस घेतली नाही आणि ती आजही तशीच सुरु आहे.
शंकररावाची खात्री झाली आणि त्याने पदभार स्वीकारला. शंकरराव कामाला एकदम वाघ निघाला. एका आठवड्यातच त्याने कार्यालयाचे स्वरूपच पालटून टाकले. साफसफाई इतकी की आमचे साहेबही त्याच्या कामावर खूश झाले. जेवणाची सुट्टी सोडली तर शंकरराव सदोदित कामात असायचा. आमचा आधीचा झाडूवाला सकाळी आल्या आल्या एकदा कार्यालय झाडून घ्यायचा,मग लादी पुसायचा आणि मग दिवसभर गप्पा ठोकत बसायचा. पण शंकरराव मात्र सतत कार्यमग्न असायचा. तासातासाने कचर्यासाठी ठेवलेल्या बादल्या साफ करत बसायचा (त्यात कचरा असो नसो). कुठे टेबल साफ कर,कुठे पंखा साफ कर तर कुणाला पाणी आणून दे, बाहेरून कुणासाठी विडी-काडी,पोस्टाची कार्ड-पाकिटे आण,हॉटेलातून जेवण आणुन दे असली सगळी कामं हसतमुखाने करायचा. त्याची विश्रांती म्हणजे जेवल्यावर जेमतेम दहा मिनिटाची बसल्या बसल्या काढलेली डुलकी. त्या दहा मिनिटात तो गाढ झोपायचा आणि चक्क घोरायचाही. पण त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला तयार असायचा.
साधारण सव्वा पाच फूट उंची,काटक बांधा,गालफडं बसलेली आणि खपाटीला गेलेले पोट अशा शंकररावाच्या पोटाची भूक मात्र जबरी होती. कोंकणी असल्यामुळे बसल्या बैठकीला ढीगभर भात सहज हादडत असे. वर चपात्या-भाजी, दोनचार केळी असली तर मग तो अजून खूश असायचा. घरून चपाती-भाजीचा डबा बरोबर आणायचा. कुणाच्यातले काही खाणे नाही आणि कुणाला काही देणे नाही. शंकरराव जात-पात मानणारा असल्यामुळे एखाद्याने कितीही आग्रह केला तरी सुरुवातीला त्याच्याकडचे खाणे अजिबात घेत नसे. पण पुढे पुढे जसजशी ओळख वाढत गेली आणि अमूक एक आपल्या किंवा आपल्यापेक्षा उच्च जातीचा आहे हे कळल्यावर मग त्याच्याकडचे खाणे खाऊ लागला होता. शंकररावाच्या भूकेची आणि जबरदस्त पचनशक्तीची एकदा आम्हाला योगायोगाने प्रचिती आली त्याचा एक किस्सा आहे.
आमच्या कॅंटीनमध्ये हल्ली चहा-कॉफी बरोबरच मधल्या वेळचे जेवणही बनवायला सुरुवात झालेली होती.असाच एके दिवशी शंकररावाने घरून डबा आणलेला नव्हता. त्या दिवशी कॅंटीनमध्ये डाळ-भाताचा बेत होता. शंकररावाची भूक जबरदस्त असल्यामुळे त्याने चांगला चार मुदी भात खाल्ला(थाळीत फक्त दोन मोठ्या मुदी आणि वाडगाभर डाळ मिळत असे).हात धूवून शंकरराव विश्रांतीसाठी खुर्चीवर टेकला नाही तोच तिथे आमचे सुरक्षारक्षक साबळे हवालदार त्यांचा भला मोठा डबा घेऊन जेवायला आले. हा गडी अंगा-पिंडाने मजबूत होता. सहा फूट उंची आणि भरदार देहयष्टीच्या त्या माणसाने आपला डबा उघडला आणि त्याने आणलेल्या कालवणाने शंकररावाच्या तोंडाला पाणी सुटले; पण तो नुसते डोळे मिटून बसला. साबळे हवालदारांनी औपचारिकपणे शंकररावाला..या जेवायला.. असे म्हटले. त्यावरचे शंकररावाचे उत्तर ऐकून साबळे हवालदार पार उडालेच.
शंकरराव म्हणाला.. झव,मी खाल्लं तर तुम्हाला काय उरणार नाय.
अरे शंकर्या, चांगल्या बारा चपात्या आहेत. तू खा. मला काय कमी नाय पडणार. तू खाणार आहेस काय ह्या सगळ्या चपात्या?
खाईन की! पर,तुमी उपाशी र्हाल त्याचं काय?
एक य:कश्चित कोंकण्या एका घाट्याला, तेही साबळ्यांसारख्या बलदंडाला आव्हान देतोय? साबळेंना हे सहन होणारे नव्हते.
ते म्हणाले...तू माझी काळजी करू नकोस. पण एक अट आहे, ह्या सगळ्या चपात्या खायच्या. काहीही उरवायचे नाय. कबूल असेल तर बोल.
अवो पण तुमी उपाशी र्हाल ना...
तुला एकदा सांगितले ना की माझी काळजी करू नकोस म्हणून. हिंमत असेल तर बोल.
ह्या गोष्टीची कुणकुण मला लागली. मी तिथे गेलो. माझ्या समोर आताच शंकरराव जेवलेले होते. मी शंकररावांना म्हटलं..
आत्ता तर तुम्ही पोटभर जेवलात आणि पुन्हा ह्या १२ चपात्या खाणार?(खरे तर त्यांना रोट म्हटले पाहिजे इतक्या त्या जाड होत्या. मी तर रिकाम्या पोटी फारतर दोन खाऊ शकलो असतो.)काय वेड-बिड लागलंय काय?
झव,त्यात काय हाय? मी पंधरा मिनिटात खाईन ह्ये सगलं!
बघ हं शंकर्या, पंधरा मिनिटात कशाला? हवे तर २५ मिनिटे घे.पण सगळे खायला हवे....आता साबळेही इरेला पेटले होते.
शंकररावही इरेला पेटला होता. मग काय मी शिरलो पंचाच्या भूमिकेत आणि सुरु झाली खाद्य-स्पर्धा.
इथे घड्याळाचा काटा सरकत होता आणि शंकररावाचे रवंथही सुरु होते. साबळे सारखे शंकररावाला वेळेची जाणीव देत होते पण तो अतिशय चवीचवीने खात होता. सुरुवातीला त्याचा वेग जास्त होता तरी हळूहळू तो कमी होत गेला. तरीही मोजून साडे चवदाव्या मिनिटाला त्याने शेवटचा घास घेतला आणि मग वर पाण्याचा घोट घेऊनच तो थांबला.
साबळे आश्चर्याने पाहातच राहिले. शंकररावाला आता काही त्रास तर नाही ना होणार ही मला काळजी.पण शंकरराव शांतपणे उठला, हात-तोंड धूवून आला आणि साबळेंना म्हणाला...झव,कालवन मस्त होतं तुमचं. पुना कवा आनाल तेव्हा मला सांगा.
साबळेंचा ’आ’ अजून वासलेलाच होता. त्यांनी शंकररावापुढे केळी ठेवली. अर्धा डझनातली तीन केळी शंकररावाने मुखशुद्धी म्हणून खाल्ली आणि मग एक मोठी ढेकर दिली. बाकीची तीन साबळेंना देऊन म्हणाला...आता तुमीच खावा.तुम्हाला बी भूका लागल्या असतील.
आणि शांतपणाने तो आपल्या कामाला निघून गेला.

१ ऑक्टोबर, २००८
शंकरराव! १
नाव काय तुमचं?
शंकर!
चहा घेऊन आलेला पोर्या नवीनच दिसत होता. चंदूशेठ चहावाल्या कडे आजवर कितीतरी मुलं काम करून गेली होती. ती बहुतेक सगळीच त्याच्या गावची असायची. शंकरही त्यातलाच.
किती शिकलात?
नाय! काय बी नाय शिकलो.
मग गावात इतकी वर्ष काय करत होता?
म्हशी चर्याला नेयाचा. सकाली भाकरी बांधून घेयाची आनि म्हशींना घेऊन चर्याला जायाचे.
वय किती तुमचे?
काय म्हाईत!
अहो तुमची जन्मतारीख कोणती?
जनमतारीक?त्ये काय आस्ते?
कमाल आहे. तुम्हाला जन्मतारीख माहीत नाही? बरं मला अंदाजाने सांगा तुमचं वय किती असेल?
माला काय म्हाईत? तुमीच समजून घ्या आता.
अहो, पण तुमचा जन्म कधी झाला हे मला माहीत नाही तर तु्मचे वय तरी मी कसे ओळखणार?
त्ये आमच्या अप्पाच्या म्हैशीला वासरु झालं व्हतं नाय का?
मग त्याचं काय ?
त्येला लई वर्स झाली. त्येच्या दुसर्या दिवशी मी जलमलो..आसं माजी आय सांगायची.
कधी झालं त्ये वासरू सांगु शकाल काय? म्हणजे साधारण किती वर्षांपूर्वी झालं?
वासरू ना? माझ्या जलमाच्या आदी एक दिस झालं.
मी कपाळाला हात लावला. ह्या माणसाशी ह्या विषयावर जास्त बोलण्यात अर्थ नव्हता. तेवढ्यात तिथे बापूशेठ आला. हा बापू चंदूशेठकडे बर्याच वर्षांपासून कामाला होता.
मामा,अरे किती येल हिथंच बसला हाईस? जा. चंदूशेठ बलावतोय.
अच्छा. म्हणजे हा शंकर बापूचा मामा तर...मी स्वत:शीच बोललो.
ओ बापूशेठ, इकडे या जरा. हा शंकर तुमचा खराच मामा आहे काय?
व्हय. माझ्या दुसर्या आईचा चुलत भाव हाय त्यो. म्हंजी मामाच न्हवं काय?
बरोबर,मामाच आहे तुमचा. पण ही दुसरी आई काय भानगड आहे?
माझ्या बापाची पहीली बायकु ..म्हंजी माजी सक्की आय. माजा बाप लई जंक्शान मानूस. एका बायकुने भागंना म्हनून बापाने पाट लावला त्यो ह्या शंकर मामाच्या भैनीशी.
अच्छा. म्हणजे ही तुझी सावत्र आई आहे तर आणि हा मामाही सावत्रच आहे ना?
बरोबर. पन माज्या सक्क्या आयपेक्षा हीच आय माज्यावर जास्त प्रेम करते आनि हा मामा बी लई भोळा हाई.
बरं मला सांगा हा तुमचा शंकरमामा किती वर्षांचा असेल?
मामा ना? ३०वर्सांचा तरी आसेल. मीच आता २५ वर्सांचा हाय. माज्या पेक्षा मोटा हाय त्यो.
ही माझी आणि शंकरची पहिली भेट.
आमच्या कार्यालयात चहा बनवण्यासाठी दोनजणांना भरती करायचे होते असे कळले. कुणी ओळखीतले असतील तर या घेऊन..असे साहेबांनी मला सांगितले. सर्वात आधी मी चंदूशेठ आणि त्याचा धाकटा भाऊ नामदेवलाच विचारले. पण ते दोघे नाही म्हणाले. इथे मी ’चंदूशेठ’ असा उच्चार करतोय म्हणून असे समजू नका की चंदू हा खरोखरीचाच शेठ होता म्हणून. चहाची टपरी चालवून कसेबसे आपले आणि आपल्या कुटुंबाचे तो पोट भरत होता इतकेच. मला कुणालाही एकेरी हाक मारणे सहजासहजी जमत नाही म्हणून मी चंदूला चंदूशेठ म्हणत असे आणि माझे ऐकून हळूहळू सगळेच त्याला चंदूशेठ म्हणायला लागले. नामदेवाला मी नामदेवराव आणि बापूला बापूशेठ म्हणायचो.
नंतर मी बापूशेठ आणि शंकरमामाला विचारले. त्यात बापूशेठनी तयारी दाखवली आणि शंकरमामानी शेपटी घातली म्हणून मग त्याच वेळी आमच्याकडे हंगामी सफाई कामगार म्हणून काम करणार्या गोंविंदाला पुढे केले आणि त्या चहावाल्याच्य़ा दोन जागा भरल्या गेल्या. सरकारी पगार आणि चंदूशेठकडे मिळणारा पगार ह्यात जमीन अस्मानाचे अंतर होते. चंदूशेठ पोरांना एकवेळचे जेवण आणि दिवसातून दोन चहा व्यतिरिक्त फक्त ५००रूपये पगार देत असे. अर्थात तो त्याच्यासाठी जास्तच होता म्हणा. पण इथे आमच्या कार्यालयात पोरं भरती झाली तीच मुळी २०००+पगारावर. त्यामुळे बापूशेठ तर मला अन्नदाताच समजायला लागला. शंकरमामाला नंतर जेव्हा बापूशेठला मिळणारा पगार कळला तेव्हा त्याला खूपच चुटपुट लागून राहीली. पण हातची संधी केव्हाच गेली होती.

७ सप्टेंबर, २००८
जयहिंद राव!
"देवसाहेब! हे बघा कोण आलेत!"
कार्यालयात प्रवेश करताक्षणीच आमच्या सुरक्षा रक्षकांनी माझे लक्ष वेधले. खरं तर मी साहेब वगैरे काही नाही; पण त्या अर्धशिक्षित सुरक्षारक्षकांपेक्षा जरा दोन बुकं जास्त शिकलेलो असल्यामुळे मला ते साहेब म्हणतात इतकेच. तर सांगायचा मुद्दा इतकाच की त्यांनी माझे लक्ष वेधले तेव्हा त्यांच्या जवळ एक मध्यमवयीन व्यक्ती बसलेली दिसली. मी माझ्या नेहमीच्या सवयीने "वंदे मातरम्" असे त्याला म्हणून अभिवादन केले.त्यावर लगेच त्याने "जयहिंद" असे म्हणून मला प्रतिसाद दिला. :)
त्याची चौकशी केल्यावर जी माहीती कळली ती अशी.... त्याचे नाव ’ जे.एच.राव’ असे होते आणि आधी तो एकवायुदल अधिकारी होता. आता तिथून सेवानिवृत्ती घेऊन आमच्या कार्यालयात एक अधिकारी म्हणून दाखल झालेला आहे. सुरुवातीची दोन वर्ष त्याने दिल्लीत काढल्यावर तो आता मुंबईत बदलीवर आलाय. मी त्याचे यथोचित स्वागत केले आणि त्याला आमच्या वरीष्ठांकडे घेऊन गेलो. ही आमची पहिली मुलाखत!
राव माझ्यापेक्षा वरचा अधिकारी होता हे त्याला नंतर माझ्या वरीष्ठांकडून कळले पण तरीही त्याच्या वागण्यात तसे काहीच आढळले नाही. वागण्यात तो अतिशय सरळ होता आणि कोणत्याही व्यक्तीशी बोलताना तो प्रत्येकाला अहो-जाहो करत असायचा.राव जसजसा रुळत गेला तसतसे हळूहळू त्या अहो-जाहोचे एकेरी संबोधनात रुपांतर झाले. आम्ही त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकाराने लहान लोकंही मित्रत्वाच्या अधिकारात त्याला अरे-तुरे करू लागलो. बघता बघता तो आमच्यातलाच एक झाला.आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तो नेहमी ’जयहिंद’ असे म्हणून समोरच्याला अभिवादन करायचा. त्यामुळे त्याचे नाव आपोआपच ’जयहिंद राव’ असेच झाले.(त्याच्या नावातली आद्याक्षरं देखिल योगायोगाने जे.एच अशीच होती. पण त्याचे पूर्ण रूप वेगळे होते.)
साधारण साडेपाच फूट उंची,काळा-सावळा वर्ण,तेल चोपडलेले चपचपीत केस आणि त्यांचा व्यवस्थित पाडलेला भांग, दिसायला नाकी-डोळी नीटस असे काहीसे रावचे रुपडे होते. बोलताना नेहमी प्रत्येक वाक्याची सुरुवात ’भ’काराने सुरु होणार्या शिवीने आणि वाक्याचा शेवट ’म’काराने सुरु होणार्या शिवीने होत असे. सुरुवातीला आम्हाला ते जरा विचित्र वाटले पण नंतर नंतर त्याचे काहीच वाटेनासे झाले कारण एरवी रावचे बोलणे अतिशय सभ्य असेच होते.
राव हा माजी सैनिक असल्यामुळे त्याला मिलिटरी कॅंटीनमधून सवलतीच्या दरात सगळ्या जीवनावश्यक वस्तू मिळत. आमच्या कडे रावसारखेच इतरही काही माजी सैनिक होते. पण केवळ राव हाच सर्वांना त्याच्या कार्डावर अशा वस्तु एकही जास्तीचा पैसा न घेता आणून देत असे. अशा वेळी समोरचा माणूस झाडूवाला आहे की आपला वरीष्ठ आहे हे तो बघत नसे. सगळ्यांना आपल्याला मिळणार्या सोयी-सवलतींचा लाभ देत असे.मात्र एक गोष्ट तो कुणालाही कधीच देत नसे आणि ती म्हणजे ’दारू!’
महिन्याला एका विशिष्ठ प्रमाणातच त्याला ती मिळत असे आणि ती त्याला स्वत:लाच कमी पडायची. जे इतर माजी सैनिक स्वत: पीत नसत ते, ही अशा तर्हेने त्यांना मिळणारी दारू चक्क बाजार भावाने विकत आणि राव ती त्यांच्याकडून बाजारभावाने विकत घेत असे.
राव त्याच्या कामात हुशार होताच पण त्या व्यतिरिक्त तो बहुश्रुतही होता. रावची आणि माझी विशेष मैत्री जमली ती कशी? हे मलाही तसे एक कोडेच आहे.कारण एक माणूस म्हणून राव जरी लाख माणूस होता तरी रावचे दारू आणि सिगरेटचे व्यसनही मला माहित होते आणि मी एरवी अशा लोकांपासून चार हात दूरच राहातो. रावच्या लेखी मात्र मी एक सच्चा माणूस होतो आणि दिलेल्या शब्दाला जागणारा होतो..हे मला त्याच्याचकडून कळले होते.ह्या गोष्टीचे कारण असे की मी रावला वेळोवेळी उसने पैसे देत असे. आश्चर्य वाटले ना? अहो वाटणारच! कारण माझ्यापेक्षा जास्त पगार त्याला होता. मग अशा रावला मी कशी मदत करत असे आणि का?....
त्याचे काय आहे की आमच्या कार्यालयात आधी गजा नावाचा एक सहकारी ’फंड’ चालवायचा. दर महिन्याला अमूक एक रक्कम प्रत्येकाकडून त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे गोळा करून ती गरजवंताला/ना मासिक दोन रूपये व्याजाने देऊ केली जायची.
ह्यातून मिळणारे व्याज वर्षाच्या शेवटी सर्व सभासदांना त्यांच्या त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वाटले जाई. ह्या योजनेमुळे बर्याच जणांची सोय होत असे.पण गजा फंड बंद करून अचानक नोकरी सोडून गेला आणि अशा गरजवंतांना पैशाची चणचण जाणवू लागली. गजानंतर एक दोघांनी पुढाकार घेऊन हे फंड प्रकरण हाताळायचा प्रयत्न केला पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण हे लोक ते पैसे गरजवंतांना देण्याऐवजी स्वत:च वापरू लागले. ह्यातून जी गरज निर्माण झाली ती एका प्रामाणिक व्यवस्थापकाची जी इतरांच्या मते मी पूर्ण करू शकत होतो आणि म्हणून सगळ्यांनी मला गळ घातली फंड सुरु करण्याची.मला खरे तर ह्या भानगडीत पडायची अजिबात इच्छा नव्हती. विशेष करून लोकांकडून पैसे मागण्याच्या बाबतीत माझा भिडस्तपणा मला त्रासदायक व्हायचा. कैक वेळेला कर्जाऊ दिलेले माझेच पैसे मी परत मागताना मलाच अजिजी करायला लागायची. माझे पैसे गेले तरी ते नुकसान एक वेळ मी सोसू शकत होतो पण सार्वजनिक पैशाबाबत असे करून चालणार नव्हते. तिथे माझ्या सचोटीबद्दल शंका निर्माण होऊ शकली असती आणि ते मला कधीच आवडले नसते त्यामुळे मी आधी नकारच दिला. पण माझ्या जवळच्या मित्रांपैकी ’दादा’ने देखिल गळ घातली आणि पैसे वसुलीचे माझ्यावर सोपव असे सांगून धीर दिला. दादा हा नावाप्रमाणेच दादा होता त्यामुळे मी मग जास्त आढेवेढे न घेता फंड सुरु केला.(दादाबद्दल सविस्तर ह्या लेखांमध्ये वाचा.)
ह्या फंडाचा फायदा खर्या गरजवंतांना द्यायचा असे माझे तत्व होते आणि त्याप्रमाणे मी वागत होतो. प्रत्येकाची परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन मी कर्ज देत असे.त्यामुळे कुणा एकाला अवाच्या-सवा कर्ज दिले असे होत नसे. त्यामुळे जमा रकमेपैकी पाच दहा टक्के रक्कम माझ्याकडे नेहमी शिल्लक राहात असे ज्याचा उपयोग आयत्या वेळी कुणाला पैसे लागले तर होत असे. ह्या गोष्टीचा फायदा बर्याच वेळेला रावला होत असे कारण महिन्याच्या शेवटी शेवटी त्याला पैश्यांची तंगी जाणवत असे आणि माझ्याकडून वेळेवर खसखस न करता पैसे मिळत असल्यामुळे तोही खुश असायचा.एक तारखेला पगार झाला की आठवणीने तो ते पैसे आणून देत असे. हा त्याचा गुण फारच थोड्या लोकांच्यात होता. अशा ह्या रावला मी नेहमी दारू-सिगरेट सोडण्याचा सल्ला देत असे पण त्याचा त्यावर काडीमात्रही परिणाम होत नसायचा. तो आपल्याच नशेत असायचा.त्याची ही सवय सुटावी म्हणून मी कधी कधी त्याला कर्जाऊ पैसे द्यायला नकार देखिल दिला होता पण राव माझं बारसं जेवलेला होता. तो इतर कुणाला तरी पुढे करून पैसे घ्यायचा आणि आपला शौक पुरवायचा.असो.
सुरुवातीला राव कार्यालयात आणि कार्यालयाच्या वेळेत दारू कधीच पीत नसे.पण कसे कुणास ठाऊक पण तो हळूहळू गुपचुपपणे कार्यालयातही थोडी थोडी पिऊ लागला हे माझ्या नजरेतून सुटले नाही. मी त्याला त्याबद्दल चांगलेच झाडत असे पण त्याने ते कधीच मनावर घेतले नाही.(हे मी कोणत्या अधिकारात करत असे मला माहीत नाही आणि रावने देखिल मला कधी उलट उत्तर कसे केले नाही हे कोडे देखिल कधीच उलगडले नाही)उलट वेळप्रसंगी तो मलाच आग्रह करायचा आणि माझा अपेक्षित नकार ऐकून पुन्हा आपल्या नशेत धुंद राहायचा.मग मी त्याला टाळायला लागलो. मला भिती एकाच गोष्ठीची वाटत होती की हे जर वरिष्ठांना कळले तर रावची नोकरी जाईल. एरवी चांगला असलेला एक माणूस निव्वळ ह्या दारूपायी फुकट जातोय हे मला बघवत नव्हते पण मी काहीच करू शकत नव्हतो कारण मी त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकारानेही छोटा होतो.
रावचे दारू पिणे हळूहळू वाढू लागले. आधी तो कार्यालयात असताना अतिशय मर्यादित पीत असे आणि ते फारसे कुणाच्या लक्षात येत नसे.अशा वेळी राव अतिशय शांत दिसत असे. पण जसजसे त्याचे दारुचे प्रमाण वाढायला लागले तसे त्याचे वर्तन बदलायला लागले.जसजशी दारू चढायला लागायची तसतसा तो भांडखोर व्हायला लागायचा. एरवी देवभोळा असणारा राव अशावेळी समस्त ३३कोटी देवांची यथेच्छ निंदानालस्ती करायचा. क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढवायचा.
मधल्या काळात आम्ही काही जणांनी त्याला सुधारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला.म्हणजे तो थोडाफार सुधारला देखिल. नाशिक की कुठे तरी जाऊन विपश्यना शिबिरात हजेरी लावून आला. काही दिवस छान गेले आणि एक दिवस पुन्हा रावने भर ऑफिसात राडा केला. त्या दिवशी तो अक्षरश: ’फुल्ल’ होता. त्याला स्वत:च्या देहाचीही शुद्ध नव्हती.बसल्या जागीच पॅंट ओली केली त्याने. दारूचा वास आणि त्यात त्याच्या मुताच्या वासाने एक संमिश्र वास धारण करून सगळ्यांच्या नाकातले केस जाळले. त्याच्या आसापासही कुणी जायला तयार होईना. अशात त्याने रडायला सुरुवात केली. अक्षरश: धाय मोकलून रडायला लागला तो...जणू काही त्याची कुणी प्रिय व्यक्ती मरण पावली असावी.
दारू प्यायल्यावर एरवी आक्रमक होणारा हा प्राणि आज इतका धाय मोकलून का रडतोय हे कुणालाच कळेना. लोक आपापसात तर्क लढवत होते पण कुणीच त्याला त्याबद्दल काही विचारण्यासाठी त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करत नव्हता. त्याचे कारण असे की एकदोघांनी त्याला समजवण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचे धाडस केलेही होते पण तो त्यांच्या गळ्यात पडायचा प्रयत्न करायला लागला तेव्हा तेही मागे हटले.
हा हा म्हणता ही बातमी आमच्या साहेबांपर्यंत पोचली आणि रावची खबर घ्यायला खुद्द साहेब येताहेत असे कळले तेव्हा सगळीकडे पांगापांग झाली. मनात आले, ’गेली आता रावची नोकरी!कोण वाचवणार ह्याला आता?’
आणि खरंच साहेब आले. त्यांनी रावची अवस्था पाहिली आणि ते हतबुद्धच झाले. इतका जबाबदार माणूस असे कसे वागू शकतो? पण डोकं शांत ठेवून आधी झाडूवाल्याकडून ती जागा साफ करवून घेतली आणि मग रावजवळ जाऊन त्याची विचारपूस करू लागले.
रावने साहेबांनाही मिठीत घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याला हळूच दूर केले.मग हळूहळू त्याच्याकडून माहीती करून घ्यायला लागले. मधे मधे राव खिशातली ’चपटी’ काढून साहेबाच्या देखतच आचमनं करत होता. वर साहेबालाही घेण्याचा आग्रह करत होता. तसे साहेबही ’घेणार्यातले’ होते;नाही असे नाही, पण स्थळं-काळाचं भान ठेऊन. इतकंच कशाला,राव आणि साहेब एकत्र बसूनही पीत असत...पण ते साहेबांच्या घरी. ऑफिसात कधीच नाही.... आणि इथे राव साहेबांना घ्यायचा आग्रह करत होता. साहेबांनी हळूच त्याच्या हातातून बाटली काढून घेतली आणि झाडूवाल्याकडे देऊन त्याला संडासात ओतून टाकायला सांगितली.
रावच्या असंबद्ध बडबडीतून शेवटी असे लक्षात आले ते असे.. सहा एक महिन्यापूर्वीच हैद्राबादमध्ये त्याची लग्न झालेली मोठी मुलगी एका मुलीला जन्म देऊन बाळंतपणातच वारली होती . रावचा जावई देखिल हैद्राबादेतच नोकरी करत होता आणि त्याच्या घरी त्या तान्ह्या मुलीला सांभाळणारे कुणीच नसल्याने ती जबाबदारी रावच्या बायकोवर येऊन पडली होती. ह्या गोष्टीचा परीणाम म्हणून रावला इथे मुंबईतएकटेच राहावे लागत होते. मुलीच्या अकाली निधनाचे दु:ख आणि त्यात पुन्हा पत्नी जवळ नसल्याने येणारा एकटेपणा..ह्यामुळे तो पूर्ण गांजून गेलेला. अशा अवस्थेत दारू हाच एक जवळचा मित्र असे समजून राव त्याच्या जास्तच आहारी गेला होता.
साहेबांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आणि रावला काही दिवसांची सुटी देऊन हैद्राबादला पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. पटापट सुत्र हलली आणि तिकीट वगैरेची व्यवस्था झाल्यावर साहेबांनी दादाला पाचारण केले आणि रावला हैद्राबादच्या गाडीत बसवायची आज्ञा दिली. सोबत कार्यालयाची गाडी आणि चालक देखिल दिला. दादाने रावला बाबापुता करून समजावले आणि मोठ्या मुश्किलीने हैद्राबादच्या गाडीत बसवले. त्याही अवस्थेत राव दिसेल त्याच्या गळ्यात पडायचा प्रयत्न करत होता.दादालाही सोडायला तो तयार नव्हता त्यामुळे नाईलाजाने दादादेखिल त्याच्या बाजूला बसून राहीला. शिट्टी वाजली,गाडी सुरु झाली. बाहेरून येणार्या थंडगार हवेमुळे आणि दिवसभराच्या थकव्यामुळे राव आडवा झाला आणि पाहता पाहता झोपेच्या आधीन झाला.तो शांत झोपलाय हे पाहिले आणि दादा दादरला उतरला आणि कार्यालयात त्याने दूरध्वनी करून साहेबांना हा वृत्तांत कळवला. साहेबांनी त्याला शाबासकी दिली आणि तिथूनच घरी जायची परवानगी दिली.
महिन्याभराने सुटी संपवून राव बायको आणि नातीसह मुंबईत आला.बायको महिनाभर राहून नातीसह पुन्हा हैद्राबादला गेली. बायको मुंबईत असेपर्यंत रावचे रूप पाहण्यासारखे होते. सकाळी पूजा करून,कपाळावर गंध लावून येणार्या रावचे प्रसन्न रूप पाहून खूप बरे वाटायचे. ह्या काळात सिगरेटचे सेवन खूपच मर्यादित झालेले होते आणि दारूदेखिल संपूर्णपणे बंद होती.
पण बायको गेल्यावर पुनः राव पूर्वपदावर आला. सिगरेटचे प्रमाण वाढले आणि दारुदेखिल पुन्हा सुरु झाली.
रावच्या व्यसनाची ही गोष्ट न संपणारी आहे पण शेवटी एक दिवस तिचाही शेवट झालाच.
असेच व्यसनात राहून कशीबशी नोकरी करत राव एके दिवशी सेवानिवृत्त झाला. त्या दिवशी त्याने त्याच्या पठडीतल्या लोकांना दारूने आंघोळ घातली आणि अतिशय आनंदाने तो हैद्राबादला गेला.दोनतीने महिन्यांनी राव काही वैयक्तिक कारणांसाठी मुंबईत येऊन आम्हाला भेटून गेला तेव्हाचा राव आजही नजरेसमोरून हटत नाही. तेव्हा रावच्या चेहर्यावर एक विलक्षण असे सात्विक तेज विलसत होते. त्याच्या बायकोत काय जादू होती माहीत नाही, पण तिच्या सहवासात असताना राव सर्व व्यसनं विसरायचा.रावची बायको खूपच धार्मिक होती आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा पगडा राववर पडल्यामुळे रावमध्ये होणारा सकारात्मक बदल पाहून नेहमीच असे वाटत आलंय की जर रावला पत्नीचा सहवास अखंडपणे लाभला असता तर...
आणि काही दिवसातच बातमी आली...रावची बदली झाली...त्याला वरचे बोलावणे आले....देवाज्ञा झाली.
ऐकून खूप वाईट वाटले. आत्ता कुठे त्याच्या जीवनात चांगले दिवस येत होते आणि अचानक हे असे का व्हावे?
इश्वरेच्छा बलियसी! दुसरे काय?

२७ नोव्हेंबर, २००७
श्वना!
हे व्यक्तिचित्र ह्याआधी मायबोलीच्या ’हितगुज दिवाळी २००७" च्या अंकात प्रकाशित झालेले आहे.
"झालेत?" (झेंडू मधल्या झ चा उच्चार)
"भिजवलेत?" (जवान मधला ज चा उच्चार)?
"टॅम हाय?"
निरनिराळ्या वेळी येणार्या अशा निरनिराळ्या हाकांचा मालक म्हणजे 'श्वना'! नाव ऐकून गोंधळ होतोय ना! अहो होणारच! कारण असे कुणाचे नाव मी सुद्धा अजून पर्यंत ऐकलेले नाहीये. मग हा श्वना कोण? ऐकायचंय तर ऐका!
बाणकोटचा बाल्या सरळ मुंबईत आला तो आमच्या गावात म्हणजे मालाडला(मुंबई).तो इथे आला म्हणण्यापेक्षा आणला गेला. मला काही कळायच्या आधीपासूनच तो आलेला होता म्हणजे माझ्यापेक्षा चांगलाच मोठा होता(तरीही सगळे त्याला एकारान्तीच हाक मारायचे). त्याचे लग्न झालेले होते. एकदोन मुलेही होती; पण हे सगळे कुटुंब गावीच असायचे. क्वचित प्रसंगी दोनचार दिवस मुंबईला येत तेवढेच.
आम्ही ज्या चाळीत राहात होतो त्या चाळीच्या मालकांकडे हा घरगडी म्हणून होता.पण फावल्या वेळात आणि मालकांच्या परवानगीने वाडीतल्या एकदोन घरांतील धुणी-भांडी करत असे. सकाळी त्याच्या दोन फेर्या होत असत. एक १०च्या सुमारास कपडे धुण्यासाठी.
"भिजवलेत?" ह्या त्याच्या हाकेने त्या घरातल्या गृहिणीला साद घातली जात असे. मग साधारण एक-दीडच्या सुमारास जेवणं "झालेत?" अशा तर्हेची साद असायची आणि रात्री साडेआठ-नवाच्या सुमाराला "टॅम हाय?" अशा त्याच्या साद घालण्याच्या वेळा आणि पद्धती ठरलेल्या होत्या.
जेमतेम पावणे पाच फूट उंच,काळा कुळकुळीत पण तुकतुकीत रंग,रापलेला तरीही हसमुख चेहरा, अंगमेहनतीची कामे करून झालेली पीळदार पण कृश(मांसल नसलेली) शरीरयष्टी असणार्या ह्या श्वनाचा अंगात जाळीचा बनियन आणि कमरेला निळ्या रंगाची अर्धी चड्डी असा बारा महिने तेरा काळचा गणवेश होता. त्यात क्वचित बदल असे तो खूप थंडी असेल तेव्हाच. तो म्हणजे डोक्याला मफलर बांधणे इतकाच. धुण्या-भांड्याला थोडा अवकाश आहे असे कळले की मग खिशातून विडी-काड्यापेटी काढून त्याचे अग्निहोत्र सुरु व्हायचे.
ह्याचे खरे नाव 'यशवंत' असे होते; कधी मधी तो, आधीची हाक ऐकू गेली नाही असे वाटले की "यशवंता आलाय" असे ओरडायचा. आम्हा मुलांना त्याचा उच्चार 'श्वना' असाच ऐकायला यायचा. कदाचित तो त्याच्या बोलण्यातला अथवा आमच्या ऐकण्यातला दोष असावा; पण आम्ही मुले त्याला 'श्वना' च म्हणायचो आणि त्याबद्दल त्याची कधीच तक्रार नसायची.
आमच्या चाळीच्या पुढे मोठे अंगण होते आणि त्यात एक मोठे बकुळाचे आणि चिंचेचे झाड होते. श्वना भांडी अंगणात त्या झाडांखाली बसून घासायचा. त्याचे ते भांडी घासणे पण 'खास' असायचे. मी तर त्याच्या समोर बसून त्या सगळ्या क्रिया मंत्रमुग्ध होऊन पाहात असे. मधे मधे त्याच्याशी गप्पा देखील मारत असे. माझे बघून कधी तरी वाडीतली इतर मुलेही तिथे येत. श्वना आमची थट्टा मस्करी करायचा आणि आम्हालाही ते आवडायचे.
भांडी आणि पाण्याची बादली घेऊन श्वना अंगणात आला की मी त्याच्या जवळ जायचो.एका हातात भांड्यांचा डोलारा सावरत (मारुतीने द्रोणागिरी कसा उचलला होता त्या स्टाईलीत) आणि दुसर्या हातात पाण्याने भरलेली बादली.अशा अवस्थेत श्वनाचे ते दंडाचे आणि पोटर्यांचे फुगलेले स्नायु पाहिले की मला तो साक्षात बजरंगबलीच वाटायचा. प्रथम तो सगळ्या भांड्यांवर थोडे थोडे पाणी शिंपडून ती ओली करायचा. मग त्यातलीच एखादी छोटी वाटी नीट घासून घेऊन ती एका पायाच्या टाचेखाली ठेवायचा. नंतर मग नारळाची शेंडी पाण्याने ओली करून आणि तिला माती फासून भांडी घासायला सुरुवात करायचा. त्यातही एक विशिष्ट पद्धत होती. सुरुवातीला चिल्लर चमच्या-वाट्यांपासून सुरुवात करून सर्वात शेवटी तो ताटं घासायचा. मोठी भांडी घासताना तो थोडा जोर लावत असे. तो जोर लावतेवेळी जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला त्याच्या त्या टाचेखाली वाटी ठेवण्याचे रहस्य कळले.त्यामुळे कमी जोर लावून भांडे लवकर स्वच्छ घासले जाई.
भांडी विसाळताना तो उलट्या क्रमाने विसाळायचा. म्हणजे आधी मोठी आणि पसरट ताटं,मग पातेली ,मग तांबे,पेले,वाट्या,कालथे,डावले-चमचे वगैरे. त्यामुळे व्हायचे काय की विसाळलेली भांडी एकात एक नीट रचता यायची आणि उचलून नेण्यात सहजता यायची. माझ्या त्या बालपणी स्टेनलेस स्टीलचा नुकताच जन्म झालेला होता त्यामुळे बहुसंख्य घरातून अजूनही तांब्या-पितळ आणि ऍल्युमिनियम(जर्मन असेही काही लोक म्हणत)ह्या धातुंची भांडी वापरली जात. श्वनाने घासलेली ती भांडी इतकी लखलखीत असत की आपला चेहराही त्यात मी पाहून घेई.भांडी घासण्यातही शास्त्र असते हे मी त्याच्याकडून शिकलो.
श्वना कपडे कसे धुवायचा हे कधी पाह्यला मिळाले नाही कारण तो ते मोरीत धुवायचा.अशावेळी लोकांच्या घरात जाणे शक्य नव्हते. श्वना आमच्याकडे काम करत असता तर कदाचित ते देखिल कळले असते. माझी आई स्वावलंबनाची पुरस्कर्ती असल्यामुळे तिने असल्या कामासाठी कधी गडी वापरले नाहीत; पण श्वना कपडे वाळत कसा घालायचा हे मात्र पाहायला मिळायचे. कारण अंगणातल्या दोर्यांवरच सगळ्यांचे कपडे वाळत पडायचे. धुऊन घट्ट पिळलेले कपडे बादलीत घालून श्वना अंगणात आला रे आला की मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहात असे. प्रत्येक कपडा नीट झटकून आणि उलगडूनच तो दोरीवर अगदी व्यवस्थितपणे वाळत घालत असे. अहो छोट्या कपड्यांचे ठीक आहे पण त्याकाळी बायका नऊवारी लुगडी,आणि पुरुष धोतरे देखिल नेसत. मग ती कशी तो वाळत घालत असेल हा देखिल एक प्रश्नच आहे नाही का?त्याचेही शास्त्र श्वनानेच मला शिकवले(म्हणजे निरिक्षणातूनच मी ते शिकलो). त्या बादलीतलच तो ती लुगडी आणि धोतरे एकेक करून हळूहळू उलगडत असे आणि त्यांची चौपदरी घडी घालून, नीट झटकून मगच दोरीवर वाळत घालत असे. हे करताना चुकुनही कधी लुगड्याचा अथवा धोतराचा एखादा भाग बादलीच्या बाहेर गेलाय असे होत नसे इतकी त्याच्या कामात कमालीची सफाई होती.
श्वना कोकणी बाल्या असल्यामुळे साहजिकच नारळाच्या झाडांवर चढण्यात पटाईत होता. कमरेला कोयता अडकवून अगदी खारूताईच्या सहजतेने तो बघता बघता वर पोचत असे आणि नारळ पाडून झाले की तितक्याच लीलयेने खाली येत असे. आम्हा मुलांना त्याची खूप गंमत वाटायची. त्याकाळी आमच्या आजूबाजूला इतकी झाडी होती, वनराई होती की त्यामुळे साप वगैरेंचे असणे हे नैसर्गिकच होते. अशा परिस्थितीत साप मारण्याचे काम हे मुख्यत: श्वनावरच असे. तेव्हा साप हा माणसाचा मित्र वगैरे कल्पना लोकांपर्यंत पोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे साप दिसला रे दिसला की तो मारायचा इतकेच माहित असल्यामुळे आम्ही मुलं जाऊन त्याला सांगत असू की मग तो हातात असेल ते काम सोडून हातात त्रिशुळ घेऊन यायचा(मालकांनी हा त्रिशुळ खास श्वनाच्या सांगण्यावरून बाळगला होता).त्यावेळी श्वनाचे रूप बघण्यासारखे असायचे. त्याच्या चेहर्यावर एक प्रकारचे तेज विलसत असायचे . आम्हाला तो खूप शूर वाटायचा. श्वनाचे साप मारण्यातले प्रावीण्य इतके कमालीचे होते की त्याचा वार क्वचितच फुकट जात असे. तो त्रिशुळ अशा तर्हेने चालवी की त्रिशुळाच्या मधल्या टोकाने नेमका सापाच्या डोक्याचा वेध घेतला जायचा. मग सापाला तसाच त्रिशुळाने टोचलेल्या अवस्थेत मिरवत मिरवत आम्हा मुलांसह ती मिरवणूक सबंध वाडीत फिरत असे.
मला तर सापांबद्दल जाम भिती वाटायची; पण तरीही आमच्या गप्पात सापाचा विषय हमखास यायचा. कधीतरी श्वनाकडे हा विषय काढला की मग त्याची रसवंती सुरु व्हायची. मग कोणता विषारी,कोणता बिनविषारी हे तो सांगायचा. त्यात 'नानेटी' नावाचा एक पट्टेवाला साप असतो आणि एकाला मारले की लागोपाठ सात नानेट्या कशा बाहेर येतात. त्या सगळ्यांना मारले नाही तर मग तो डुक ठेवतो आणि आपल्याला चावतो... वगैरे गोष्टी ऐकल्या की आमची सगळ्यांची पाचावर धारण बसे. आता त्या गप्पा आठवल्या की माझेच मला हसू येते.सापांबद्दल किती चित्रविचित्र कल्पना आणि गैरसमजूती आम्ही बाळगून होतो तेव्हा.
गौरी गणपतीला श्वना गावी जायचा तो मात्र दिवाळी करूनच यायचा. वर्षातली ही सुट्टी सोडली तर त्याने कधी सुटी घेतली नाही. संध्याकाळी अंगावर एक शर्ट चढवून एका विशिष्ठ ठिकाणच्या अड्डयावर थोडा वेळ समव्यवसायी गाववाल्यांबरोबर तासभर गप्पा मारल्या की त्याचा दिवसभराच्या कामाचा शीण दूर होत असे. कधीमधी देशी दारूची आचमनं देखिल चालत पण ते सगळे एका मर्यादेपर्यंतच होते.
असेच जीवन कंठता कंठता श्वना म्हातारा कधी झाला तेही कळले नाही कारण त्याच्या दृष्यरुपात कोणताच फरक पडलेला नव्हता. फरक पडलाच होता तर त्याच्या शारिरिक क्षमतेवर. नियमित विडी ओढण्यामुळे छातीचे खोके झाले होते. आताशा त्याने वाडीतील कामे देखिल सोडून दिली होती. कसेबसे मालकांचे काम तो करत होता.असाच एकदा गणपतीला तो जो गेला तो पुन्हा कधीच आला नाही. आपल्या गाववाल्यांबरोबर "आता मुंबईला पुन्हा कधी येणार नाही" असा निरोप धाडला आणि त्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळले नाही.
आज श्वना जर जीवंत असलाच तर त्याने वयाची सत्तरी नक्कीच ओलांडलेली असेल.कसा असेल तो आता? त्याला आमची आठवण येत असेल काय? कुणास ठाऊक!त्याला आठवत असेल नसेल ठाऊक नाही पण त्याने माझ्या बालपणात जे रंग भरले होते ते मी कधीच विसरणार नाही.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)