माझ्या लहानपणी मी कितीतरी प्रकारचे खेळ खेळलोय.मैदानी खेळात कुस्ती,हुतूतू,लंगडी,खो-खो,आट्या-पाट्या,डब्बा ऐसपैस,पकडापकडी,लगोरी,आबादुबी,तारघुसणी(हा खेळ फक्त पावसाळ्यातच खेळू शकतो),विटी-दांडू,भोवरेबाजी,बिल्ले,गोट्या वगैरे असे खास भारतीय खेळ तर क्रिकेट,व्हॉलीबॉल,फूटबॉल,बॅडमिंटन,टेबल-टेनिस वगैरे विदेशी खेळही भरपूर खेळलोय.त्याच प्रमाणे बैठे खेळ आठवायचे म्हटले तर प्रामुख्याने बुद्धीबळ,कॅरम,पत्ते,सापशिडी,ल्युडो,व्यापार-डाव,कवड्या,सागरगोटे,काचापाणी वगैरे अनंत खेळ आठवतील. ह्यापैकी बैठ्या खेळातल्या पत्त्यांच्या खेळाबद्दलच बोलायचे झाले तरी त्याचे कैक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी आता चटकन आठवताहेत ते म्हणजे तीन-पत्ती,रमी, सात-आठ,पाच-तीन-दोन,मुंगूस,भिक्कार-सावकार,एकपानी झब्बू,गड्डा झब्बू,गुलामचोर,बदामसत्ती,मेंडीकोट,नॉट ऍट होम,लॅडीस,गेम ऑफ पेशन्स(हा एकट्याने खेळायचा प्रकार आहे)वगैरे वगैरे. ह्यातले तीन-पत्ती आणि रमी हे सामान्यत: जुगार समजले जातात कारण हे खेळ खेळताना काही तरी पणाला लावावे लागते.एकेकाळी मी तीन-पत्तीमध्ये अतिशय निष्णात होतो.पण एक प्रसंग असा घडला की मी तो खेळ त्यानंतर कधीच खेळलो नाही(एकवेळचा अपवाद सोडून).आज त्याबद्दल ऐका.
आमच्या वाडीत मराठी,गुजराथी अशी संमिश्र वस्ती होती. ह्यातले गुजराथी लोक त्यांच्या काही विशिष्ठ सणांना सहकुटुंब जुगार खेळतात हे आधी ऐकले होते पण त्यानंतर प्रत्यक्ष पाहिले देखिल. त्या जुगारात बरंच काही जिंकता येते हे पाहून मलाही त्यात रस निर्माण झाला. पण आमच्या आईची करडी नजर चूकवून हे असले उद्योग करणे कधीच शक्य नसायचे. पण ही गुजराथ्यांची मुले एरवीही हा जुगार सर्रासपणे खेळायची. त्यात पैसे न लावता गोट्या,बिल्ले(शीतपेयांच्या बाटल्यांची पत्र्याची बुचे),सिगारेटची पाकिटे,काजू वगैरे गोष्टी पणाला लावत. हे त्यांचे खेळ आम्ही चूपचाप बसून पाहायचो पण खेळायची हिंमत नसायची. त्याचे एक कारण आईची जरब आणि दुसरे म्हणजे ही सर्व मुले त्यात पटाईत होती आणि आम्हाला त्यातले जुजबी ज्ञानच होते तेही पाहून पाहून झालेले त्यामुळे सर्वस्व हरण्याची शक्यता होती.
ह्या सर्व मुलांच्यात भानू नावाचा एक मुलगा खूपच पोचलेला होता. त्याचा गोट्या,बिल्ले वगैरे खेळातला नेम अचूक असायचा आणि त्यात तो नेहमीच जिंकायचा. तसेच ह्या तीन-पत्तीमध्येही तो चांगलाच सराईत होता. त्याचा हात धरेल असा कुणी दुसरा खेळाडू आमच्या वाडीत नव्हता.ह्या भानूच्या बाजूला बसून मी तीन-पत्तीचा खेळ नुसता बघत असे.गंमत अशी की भानू जात्याच हुशार असल्यामुळे ह्या खेळात जिंकत असे पण त्याचा असा समज असायचा की मी त्याच्या बाजूला बसतो म्हणून तो जिंकतो.कमाल आहे ना? हा खेळ खेळणार्यांच्यातली अंध:श्रद्धा तरी किती ते आठवले तरी आजही हसू येते.
समजा एखादा खेळाडू हरायला लागला तर मग त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलांना तो सांगणार की पाणी पिऊन या. ती दोन्ही मुले पाणी पिऊन येईपर्यंत खेळ तहकूब केला जाई. तसेच आपल्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलापैकी कुणी मागे हात टेकून बसला तरी त्याला तसे बसण्यापासून परावृत्त करणे.कारण काय तर नरटी लागते. कोपर मांडीवर टेकून आणि हनुवटी तळहातावर टेकून कुणी बसलेले त्या खेळाडूंना चालायचे नाही. ह्याचेही कारण ..नरटी लागते.
ज्याच्यावर पिशी असेल तो त्याच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलाला आपल्या पत्त्यांना हात लावायला सांगणार म्हणजे पानं चांगली येतात अशी धारणा असते.काय काय अंध:श्रद्धा होत्या तेव्हा. आता सगळंच आठवत नाही.
तर अशा ह्या भानूजवळ मी नेहमी प्रेक्षक म्हणून बसत असे आणि त्याचे खेळण्यातले कौशल्य जाणून घेत असे.भानू केवळ हुशारच नव्हता तर तो धुर्तदेखिल होता. हल्लीच्या भाषेत सांगायचे झाले तर अगदी बोलबच्चन होता.स्वत:ला आलेली पाने कितीही रद्दड असली तरी समोरच्याला बोलून गार करायचा आणि डावामागून डाव जिंकायचा. एखादा खेळाडू जरा जास्त वेळ टिकला की त्याच्या चेहर्यावरचे भाव जाणून घेऊन भानू तो डाव त्याला बहाल करायचा.मात्र एरवी सहजासहजी हार मानायचा नाही.पण लावायची देखिल एक भाषा होती. म्हणजे कसे? डाव सुरु होण्याआधी समजा की प्रत्येकाने दोन-दोन गोट्या मध्ये ठेवलेल्या आहेत. मग डाव सुरु झाला की कुणी म्हणेल...एक आलो...म्हणजे अजूनएक गोटी मध्ये ठेवायची. की दुसरा म्हणणार..दोन आलो.
हे ’आलो’ प्रकरण आणि गोट्यांची संख्या वाढत जायची की भानू हळूच आपली पानं बघितल्यासारखी करायचा आणि त्याच्या आधीच्याने जितक्या गोट्या आलो असे म्हटले असेल त्याच्यापेक्षा एकदम दूप्पट गोट्या आलो असे म्हणून जोरात हात आपटून त्या गोट्या मध्यभागी ठेवायचा. त्याचा तो आविर्भाव बघूनच बहुतेक लोक माघार घ्यायचे आणि त्याला डाव बहाल करायचे. ह्यात कैक वेळेला प्रतिस्पर्ध्यांकडे चांगली पाने असूनसुद्धा भानू जिंकायचा. हे सगळे मी नीट पाहात होतो आणि हळूहळू मलाही त्यात भाग घ्यावासा वाटू लागले.
एक दिवस हिंमत करून मीही त्या खेळात उतरलो पण एकदोन डाव जिंकलेले सोडले तर सरतेशेवटी खिशात असलेल्या सगळ्या गोट्या हरलो आणि चेहरा पाडून तिथेच इतरांचा खेळ पाहत बसलो.तसा मी सहजासहजी हार मानणारा नसल्यामुळे दुसर्या दिवशी थोड्या(१०) उसन्या गोट्या घेऊन पुन्हा त्या जुगारात सामील झालो आणि पुन्हा सपशेल आडवा पडलो. आज मी नुसताच हरलेलो नव्हतो तर अंगावर कर्जही झालेले होते. त्यामुळे आज अजूनही खट्टू झालो होतो. आता पुन्हा कुठून गोट्या पैदा कराव्यात ह्या विवंचनेत होतो कारण आमच्या कडे लहान मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत नव्हती मग मी गोट्या तरी कुठून आणणार?
मी मग एक शक्कल शोधली. रोजच्याप्रमाणे भानू मला त्याच्या बाजूला बसायचा आग्रह करायला लागला तेव्हा मी त्याला सरळ सांगितले....प्रत्येक जिंकलेल्या डावामागे मला तू १ गोटी बक्षीस द्यायची. कबूल असेल तर सांग.
तो कबूल झाला आणि गंमत म्हणजे योगायोगाने त्यादिवशी तो सगळे डाव जिंकला. त्याच्या विरुद्ध खेळणारे सगळे प्रतिस्पर्धी कफल्लक होऊन निघून गेले.भानूने त्याचा गल्ला मोजला तर एकूण २०० गोट्या जमलेल्या होत्या त्याच्याकडे. त्यादिवशी भानूने मला कबूल केल्याप्रमाणे जिंकलेल्या १५ डावांच्या प्रत्येकी एक अशा १५ आणि अधिक ५ खास बक्षीस अशा २० गोट्या दिल्या. मी तर एकदम मालामाल होऊन गेलो.त्या गोट्या मिळताच मी कर्जाऊ घेतलेल्या १० गोट्या परत केल्या आणि सुटकेचा श्वास घेतला आणि मनात ठरवले की ह्यापुढे कधीच कर्ज काढायचे नाही.
त्यानंतर मग मी ह्या जुगारात भाग घेताना सावधपणे खेळायचा पवित्रा घेत काही दिवस ना नफा ना तोटा ह्या तत्वावर टिकून राहिलो.प्रेक्षक म्हणून बाहेर बसून इतरांचा अंदाज घेणे आणि त्यांचाच एक प्रतिस्पर्धी बनून त्यांच्या डावपेचांचा अंदाज घेणे हा अतिशय वेगळाच अनुभव होता. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढायला लागला आणि भानूच्या खालोखाल जास्त डाव जिंकण्यात माझा क्रमांक लागायला लागला. एकदोनदा तर मी भानूलादेखिल पूरून उरलो. पण भानू हा त्यातला किडा असल्यामुळे त्याने वेळीच माझा धोका ओळखला आणि मला एकदा बाजूला घेऊन मांडवली केली. ती अशी की...दोघांनी एकाच वेळी खेळात उतरायचे नाही. जेव्हा भानू खेळत असेल तेव्हा मी फक्त त्याच्या बाजूला बसून राहायचे आणि प्रत्येक जिंकलेल्या डावासाठी त्याने मला २ गोट्या द्यायच्या. भानूच्या आधी जर मी खेळात उतरलो असेन तर मग भानूने तिथे अजिबात थांबायचे नाही...वगैरे वगैरे.
त्याप्रमाणे काही दिवस सुरळीत गेले आणि माझ्या लक्षात आले की माझ्या समोर कुणाचीच डाळ शिजेना. प्रत्येकवेळी मीच जिंकायला लागलो. एक भानू सोडला तर मला कुणीच तुल्यबळ प्रतिस्पर्धी उरलेला नव्हता आणि तो तर माझ्याशी तह करून बसलेला होता. पण माझ्या मनात भानूलाही हरवायचे होते आणि आता मी त्या दृष्टीने तयार देखिल झालो होतो. दुसरे म्हणजे भानूच्या सगळ्या क्लुप्त्या मी इतके दिवस अगदी जवळून पाहात आलेलो होतो त्यामुळे साहजिकच मी त्याला भारी पडेन ह्याची मला पूर्ण खात्री झाली होती. पण त्याच्याशी लढत जुळवून कशी आणायची?
मी एकदा भानूला सहज म्हटले देखिल...आता ह्या चिल्लर पिल्लर लोकांशी खेळण्यात मला मजा नाही वाटत. एकदा तुझ्याशी खेळायचे आहे; तर कधी बसू या आपण?
तो फक्त हसला आणि त्याने खांदे उडवले. तो विषय तात्पुरता तिथेच संपला.
त्या दिवशी देखिल मी नेहमीसारखाच जिंकत होतो. खेळ अगदी रंगात आला होता आणि इतक्यात आईची हाक आली.नेहमीप्रमाणे मी चटकन ओ दिली नाही कारण आईच्या अचानक आलेल्या हाकेने मी भांबावलो होतो.आई निवांतपणे झोपलेली आहे हे पाहून मी निश्चिंत होत्साता हळूच खेळात भाग घेतला होता. दुसरे म्हणजे आज आम्ही जिथे बसलो होतो ती जागा अगदी माझ्या घरासमोरच होती त्यामुळे आज पकडला जाईन अशी भिती होतीच. आईने दोनतीन हाका मारल्या तरी मी ओ दिली नाही तेव्हा ती घरातून अंगणात आली आणि तिने पुन्हा दोनतीन हाका मारल्या. खरे तर मी आईपासून अगदी जवळच होतो पण तिला दिसू शकत नव्हतो कारण आम्ही सगळे एका दाट झुडूपात बसून हे सगळे उपद्व्याप करत होतो.
तेवढ्यात तिथेच खेळणार्या एका लहान मुलाला आईने विचारले की..प्रमोदला कुठे पाहिलेस काय?
त्यावर त्याने त्या झुडूपाकडे बोट दाखवले आणि मग काय विचारता...आमचा खेळ पाऽऽर संपला.
जुगार खेळताना आईने मला अगदी रंगेहात पकडले आणि मग असा काही चोप दिलाय की काही विचारू नका. वर त्या दिवशी रात्रीचे जेवणही नाही दिले. हे कमी म्हणून की काय मी जिंकलेल्या जवळ १००-१५० गोट्या बाहेर अंगणात फेकून दिल्या ज्या त्या सगळ्या मुलांनी आनंदाने लुटल्या आणि मला चिडवत चिडवत एकेक जण तिथून सटकला. त्या दिवशी आईने निर्वाणीचा इशारा दिला की ...पुन्हा जर असा जुगार खेळलास तर तू माझा मुलगा नाहीस असे समजेन.
हा झटका सगळ्यात जबरी होता.त्या दिवशी मी शपथ घेतली की.. असा जुगार मी पुन्हा कधीच खेळणार नाही म्हणून.. जी आजवर पाळलेली आहे. वर म्हटल्याप्रमाणे त्याला एक वेळचा अपवाद आहे.तोही एक योगायोग म्हणून घडला. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी.
माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
बालपण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

११ सप्टेंबर, २००८
१७ जुलै, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! १४
माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला जायचा.
हा प्रसंग घडला तेव्हा मी सहावीत होतो आणि दादा आठवीत होता. धाकटा भाऊ तिसरीत होता. गंमत म्हणजे मी आणि दादा जवळपास एकाच उंचीचे म्हणजे साधाराणत: साडेचार फूट उंच होतो. अंगापिंडानेही तसे अशक्तच होतो. मात्र दादा काटक होता आणि लहान चणीचा असूनही त्याच्यापेक्षा थोराड एकदोघांना सहजपणे भारी पडायचा.त्यामुळे वाडीत त्याच्या वाटेला क्वचितच कुणी जात असे. तरीही तो गुंड वगैरे प्रवृत्तीचा नव्हता आणि स्वतःहून कधीही कुणाची खोडी काढणार्यापैकी नव्हता. मी मात्र अगदीच लेचापेचा होतो आणि दुसर्याला मार देण्यापेक्षा मार खाण्यात जास्त पटाईत होतो. आम्ही तिघे भाऊ आणि आमच्या बरोबरीचे आणखी तीन सवंगडी असे सहाजण मिळून बागेत खेळायला गेलो. बागेत आम्ही सोनसाखळीचा खेळ खेळत होतो.खेळ मस्त रंगात आलेला आणि त्याच वेळी माझ्या वर्गातला पुराणिक नावाचा एक मुलगा त्याच्या दोन मित्रांबरोबर बागेत आला. त्याने आम्हाला खेळताना पाहिले आणि स्वत:ही खेळायची इच्छा व्यक्त केली पण आमचा डाव अर्ध्यावर असल्याने आम्ही त्याला दूसरा डाव सुरु झाल्यावर खेळवू असे सांगितले. थोडा वेळ तो गप्प बसला पण आमचा डाव काही संपेचना तेव्हा त्याचा धीर खचला आणि तो आमच्या मध्ये मध्ये तडमडायला लागला. असे करताना त्याने दोनवेळा मला तोंडघशी पाडले. हे पाहून मी त्याची तक्रार दादाकडे केली. दादा लांब उभा होता त्याला मी हाक मारून म्हटले, "दादा! इकडे ये. हा बघ मला त्रास देतोय."
दादा जवळ आला आणि त्याने पुराणिकला समजावून सांगितले की असे करू नकोस म्हणून तरी पुराणिक काही ऐकेना. तो दादाला उलटून बोलला. अरे-जारेची भाषा बोलायला लागला. पुराणिक माझ्या आणि दादापेक्षा अंगापिंडाने मजबूत होता त्यामुळे तो आम्हाला मुद्दाम त्रास देत होता हे दादाच्या लक्षात आलं. समजूत घालून देखिल पुराणिक ऐकत नाही म्हटल्यावर दादा त्याला म्हणाला,"हे बघ पुराणिक! तू बर्या बोलाने ऐकणार नसशील तर मग मला तुला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल."
त्याबरोबर पुराणिक म्हणाला,"काय करणार आहेस तू? स्वत:ला दादा समजतोस काय?"
त्यावर दादा म्हणाला, "त्यात समजायचे काय आहे? आहेच मी ह्याचा दादा!"
त्यावर पुराणिकने त्याला आव्हान दिले आणि म्हटले, "हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.उगीच टूरटूर नको करूस."
तरीही दादाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि पुराणिकनेच दादाला ढकलून दिले.
इतका वेळ शांत असलेला दादा भडकला आणि त्याने पुराणिकची कॉलर पकडली आणि एका झटक्यात त्याला खाली लोळवले.पुराणिकला हे नवीनच होते. आपल्यापेक्षा लुकड्या मुलाने आपल्याला इतक्या सहजपणे खाली लोळवलेले पाहून तो चटकन उठला आणि त्वेषाने दादावर चाल करून गेला. दादा सावध होताच. दादा त्याच्या पटात घुसला आणि पुराणिकला त्याने आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि क्षणार्धात जमिनीवर आपटले. पुराणिकला जागोजागी खरचटले आणि तो अक्षरश: रडकुंडीला आला. त्याने कसेबसे आपल्याला सावरले आणि लांब पळून जाता जाता तो जोरात ओरडला," दादा! आता बघतोच तुला. थांब, मी आता माझ्या दादाला घेऊन येतो आणि तुझा समाचार घेतो." असे म्हणून बघता बघता तो दिसेनासा झाला.
आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात केली.
एक दहापंधरा मिनिटांनी पाहतो तो सात-आठ जणांची टोळी घेऊन पुराणिक खरंच हजर झालेला होता. आता मार खावा लागणार हे लक्षात घेऊन आम्ही सगळे घाबरट लोक दादाच्या मागे लपायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हढ्यात त्यांच्यातल्या एक्या टग्याने मला धरले आणि खाली वाकवून माझ्या मानेवर एक जोरदार फटका(चॉप) मारला. (हा चॉप नावाचा फटका त्या वेळी दारासिंगबरोबर फ्रीस्टाईल खेळणार्या मायटी चॅंग नावाच्या एका चिनी मल्लाच्या नावाने प्रसिद्ध होता.) त्याबरोबर मी मान धरून खालीच बसलो. असेच एकेकाचे बकोट पकडून त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. दादा मधे पडत होता आणि आम्हाला सोडवायचा प्रयत्न करत होता पण त्यात त्यालाही यश येत नव्हते. शेवटी दादा सोडला तर बाकी आम्ही सगळे धारातिर्थी पडलो हे पाहून त्यातल्या म्होरक्याने दादाला आव्हान दिले आणि म्हणाला ,"अच्छा! तूच काय तो दादा. इतका चिंट्या दिसतोस तरी ही हिंमत? माझ्या ह्या (पुराणिककडे बोट दाखवून)मित्राला तुच मारलेस ना? मग चल आता तुझी दादागिरी माझ्यासमोर दाखव."
हा जो पुराणिक टोळीचा दादा होता त्याचे नाव होते विनायक...पण सगळे त्याला विन्यादादा म्हणूनच ओळखत आणि तो खरोखरीचा दादा(गुंड) होता. मात्र माझा भाऊ ज्याचे नाव विनय...(ह्यालाही वाडीतली त्याच्यापेक्षा मोठी मुले विन्या च म्हणायची) तो केवळ मोठा भाऊ म्हणून दादा होता. तेव्हा आता सामना गुंडदादा विरुद्ध नुसताच दादा यांच्यात होता.विन्यादादा हा टक्कर मारण्यात पटाईत असा त्याचा सगळीकडे बोलबाला होता. खरं तर त्याचे नाव ऐकूनच भलेभले टरकायचे पण माझा दादा कुणाला घाबरणार्यातला नव्हता. रेडे कसे टकरा देत लढतात तशा पद्धतीच्या टकरा मारण्यात विन्या प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या डोक्याने प्रतिस्पर्ध्याच्या नाकावर टक्कर मारून त्याला नामोहरम करायचा. अशा नामचीन गुंडाबरोबर दादाचा सामना होता म्हणजे खरे पाहता सामना एकतर्फी होता. पण माझा दादा अतिशय शांत होता आणि विन्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता. बघता बघता विन्या चार पावले मागे गेला आणि क्षणार्धात त्याने पुढे येऊन दादाला टक्कर मारली. दादा सावध होता आणि त्याने टक्कर चुकवली तरीही त्याच्या नाकाला विन्याच्या डोक्याचा निसटता स्पर्श झाला आणि नाकातून रक्त वाहायला लागले. पण त्याच वेळी विन्या समोर जाऊन जमिनीवर कोसळलेला पाहून दादाने त्याला उठायला फुरसत न देता त्याच्यावर तुफान हल्ला केला. त्याला अक्षरश: लाथाबुक्यांनी तुडवले. दादा विन्याला उठायची संधीच देत नव्हता आणि विन्याचे ते इतर साथीदार हतबुद्ध होऊन हा विपरीत प्रकार पाहात होते.आजपर्यंत त्यांच्या दादाने कधी असा मार खाल्लेला नसावा बहुतेक त्यामुळे कुणीच त्याच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते हे पाहून मलाही जोर आला. मान दुखत होती तरी मी उठून पाठमोर्या पुराणिकच्या पेकाटात जोरात लाथ हाणली. माझे बघून आता आमचे इतर सवंगडीही उठले आणि त्यांनी त्या इतर साथीदारांवर जोरदार हल्ला केला. आमच्या ह्या अनपेक्षित प्रतिकाराने ते साथीदार वाट मिळेल तिथे पळत सुटले आणि आता आम्ही सगळ्यांनी मोर्चा विन्याकडे वळवला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग विन्याला अक्षरश: बुकल बुकल बुकलले. शेवटी विन्या निपचित पडला तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. मग विन्याला तिथेच सोडून आम्ही सगळे जखमी वीर आपापल्या दुखापती कुरवाळत,कधी कण्हत तर कधी आपल्याच पराक्रमावर खुश होऊन हसत वाडीत परतलो.
मार खाल्यामुळे,मारामारी केल्यामुळे एकेकाचे अवतार पाहण्यासारखे होते. अशा अवस्थेत घरी जाणे म्हणजे आईचा मार ओढवून घेणे हे आम्हाला पक्के माहीत होते म्हणून आधी आम्ही विहीरीवर गेलो. तिथे स्वच्छ हातपाय,तोंड धुतले, कपडे ठीकठाक केले आणि मगच घरी गेलो. माझी मान तर कमालीची दुखत होती पण सांगणार कुणाला आणि काय? मी आपला तसाच जेवलो आणि गुपचुप झोपलो पण झोप कसली येतेय. मग आपोआप कण्हणं सुरु झालं आणि आईच्या लक्षात आलंच. मग काय झालं म्हणून विचारलं तिने, त्यावर खेळताना पडलो मानेवर असे खोटेच सांगितले.आईने तिच्या हळुवार हाताने तेल लावून मालीश करायला सुरुवात केली आणि मी बघता बघता झोपी गेलो.

२८ जून, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!
आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.
शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. :)
मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.
अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.
रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल! ;) )होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले)

११ एप्रिल, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! १२ बायमावशी! २
चित्रपट जरी अडीच तीन तासात संपत असला तरी बायमावशींचे हे चित्रपट आख्यान चांगले आठवडाभर चालायचं. कारण त्यात इतरही उपकथानकं यायची. जमलेल्या आया-बायांच्या प्रतिक्रिया, मध्ये कुठे गाणी आली की ती म्हणण्याचा किंवा माझ्याकडून म्हणवून घेण्याचा असे कैक अन्य पदर असत.
"तुम्हाला सांगते... अमुक तमुकचे आई!" हे असेच एक पालुपद ह्या कहाणी दरम्यान यायचे. ज्या बाईने मध्येच शंका व्यक्त केली असलीच तर किंवा काही प्रतिक्रिया दिली असली तर तिला उद्देशून हे वाक्य फेकले जाई.
मोलकरीण कथा पुढे सुरू....
"तुम्हाला सांगते विद्याचे आई, तो जो लंगोटी वाला मुलगा असतो ना तो आता मोठा होतो. कालिजात जायला लागतो. तिथे त्याचे शीमा(सीमा) बरोबर प्रेम जुळते."
"एका गाण्यात ते पोर मोठे होते? लगेच कालिजात जाऊन पिरेम बी करते?"..... ह्या एक बोलण्यात फटकळ आणि मिस्किल बाई.
"अग्गो बाई! काय सांगू आता हिला? अगो,तीन तासाचा शिनेमा, त्यात काय त्या मुलाचे अख्खे बालपण दाखवणार काय? साधा संडासला जाऊन आलाय असे दाखवायचे तर धा मिन्टे जातील फुकट. बघताय ना आपल्या इथली पोरं! कुणी सरळ आपलं टीपरं उचललं आणि गेलं संडासमध्ये असे होते काय? ते टीपरं मिरवत मिरवत जातंय काय. मध्येच टीपरं बाजूला ठेवून पोरांच्यात खेळायला लागतंय काय! वगैरे वगैरे..(तिरकसपणाने बोलण्यात बायमावशींचा कुणी हात धरू शकत नसे.)
हां! तर मी काय सांगत होते?"
कुणी तरी मग ती.. रमेश देव कालिजात.... असे सुचवते.
मग कथा पुढे सुरू होते.
इतक्यात एक बाई आठवण करून देते.... "बायमावशी अहो ते प्रेम नंतर करतात. लगेच नाही काय. आधी तो डॅन्स आहे ना कोळणीचा."
लगेच बायमावशी..." अग्गोऽऽऽ बाऽऽऽई! राहिलंऽऽऽच की! नाऽय,नाऽय,नाऽऽय! थांबा थांबा हांऽऽ.(इथे सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे)आत्ता आठवलं! ते आधी सांगितलेलं ते प्रेम आता नाही हांऽऽ. ते नंतरऽऽ. तो शीन नंतर! आधी काय आऽस्ते ना की त्यांच्या कालिजात एक नाटक आस्ते."
"अहो नाटक नाही हो गॅदरिंग असते!"... दुसरी बाई.
"ते गॅद्रिंग की फॅद्रिंग काय असेल ते! असो. पण शीमा काय मस्त दिसते हो त्या कोळणीच्या वेशात! तुम्हाला सांगते शेखरच्या आई, नुस्ते बघऽऽतच बसाऽऽऽवे आसे वाट्ते.तिचा तो अंबोडा, त्यातली ती वेऽऽणी आणि मोठ्ठं कुंऽकू. आणि नाचते म्हणजे काऽऽय हो! अऽगदी बिजलीसारखी! इथे एक गाणं हाय... कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर!
अवो नुस्ती नाचते नाऽय तर गाते पण काय सुरेऽऽख! एकदम गोऽड आवाज बघा!"
"अहो ती नाही गात! आशा भोसले गाते ते गाणे!"...तीच ती मघाची
"अग्गोऽऽऽ बाऽऽऽऽई! सांगतेऽऽऽस काऽऽय! मला मेलीला वाटले की शीमाच गाते! तरी म्हटलं नाच आणि गाणं एकदम जमते कसे हिला?"
बायमावशींचे हे 'अग्गो बाई' हे उच्चार दिवसातनं अनेक वेळा उच्चारले जात असतील. पण त्यातही वैविध्य जाणवायचे. म्हणजे त्यावेळी त्यांना एखाद्या गोष्टीचे किती प्रमाणात आश्चर्य वाटले असेल त्या प्रमाणात ते उच्चार लांबत जात.
अशीच धक्के खात खात कथा पुढे जात असे. मग रदे-शीमा चे प्रेमप्रकरण, त्यावेळचे "हसले आधी कुणी" हे गाणे, मग लग्न, भटजींचा मृत्यू वगैरे थांबे घेत घेत गाडी सुलोचना मोलकरीण बनून रदे-शीमा च्या घरी येते तिथपर्यंत आली की मग शीमाचे बाळंतपण वगैरे कथानक उलगडता उलगडता एका गाण्यावर येऊन थडकत असे.
"तुम्हाला सांगते.... इथे ना एक शीन हाय. त्या शीमाच्या बाळाला झोपवायला सुलोचना एक गाणं गाते..
देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला
काऽय सांगू? इतक्या गोड आवाजात गाते ना सुलोचना..."
"अहो,सुलोचना नाही ती. आशा भोसलेच गाते हे पण गाणे!"
"अंशे! हे पण गाणे तीच बया गाते? मग दिसली कशी नाय ती शीनमध्ये?"
"अहो ती पडद्याच्या मागून गाते आणि सुलोचना नुसते तोंड हालवते."
"काऽऽऽय तरीच सांगू नकोस! तू काऽऽऽय बघायला गेली होतीसऽऽऽऽ तिला पडद्याच्या मागे? आणि मलाऽऽ सांग... ती, कोण ती, तुझी आशा की बिशा?(इथे बायमावशींचे उपरोधिक बोलणे आणि त्यातला कोकणी खवचटपणा अगदी पराकोटीचा असायचा)एका वेळी किती टाकीजात जाऊन गाणार हाय?" प्रश्न तसा बिनतोड होता.
बाय मावशींचा गैरसमज झाला होता की आशा भोसले प्रत्यक्षपणे पडद्याच्या मागे बसून गाते त्यामुळे त्यांचे हे बोलणे ऐकून काही बायका तोंडावर पदर घेऊन फिदी फिदी हसायला लागल्या. मग माझ्या आईने त्यांना त्यातली गोम समजवून सांगितली आणि ती त्यांना पटली असे दिसले तरी त्या बाईवरचा राग काही केल्या शांत होईना.
"मला शिकवतेय! आगं, मी काय आजच शिनेमा बगतेय काय?"
थोडा वेळ असाच शांततेत जातो आणि मग हळूच कुणी तरी म्हणतं.. "ओ बायमावशी! रागावू नका हो. सांगा ना पुढची गोष्ट. आणि ते गाणं पण म्हणा ना."
इथे बायमावशीही जरा सावरलेल्या असतात. मग लगेच, " नाही बाई. मला नाही जमणार ते गाणं. त्यापेक्षा पम्यालाच बोलवा. तो चांगलं म्हणतो."
झालं. पुन्हा मला फर्मान सुटतं आणि मी खेळ अर्धाच टाकून येतो. काय करणार? आईची आज्ञा शिरसावंद्य होतीच पण गाणं म्हणायचा मला कधीच कंटाळा नसायचा. मग मी सुरू केले "देव जरी मज कधी भेटला...."
"कोण देव? रमेश देव? तू ही देवच की!" तेवढ्यात बायमावशींना विनोद सुचला आणि माझ्या सकट सगळेच हसत सुटलो.
हास्याचा भर ओसरल्यावर पुन्हा गाण्याची फर्माइश झाली आणि मी ते गाणं म्हणू लागलो.
ह्या गाण्यातल्या एकेक शब्दात इतका अर्थ भरलाय आणि ते आशाताईंनी इतके सुंदर गायलेय की काही विचारू नका.मी गाणं शिकलेलो नव्हतो तरी ऐकून ऐकून हुबेहूब गाऊ शकत असे. 'न'कलाकार असल्यामुळे एक आशाताईंचा आवाज सोडला तर त्या गाण्यातल्या भावना मी श्रोत्यांपर्यंत पूरेपूर पोचवू शकलो हे जाणवले. कारण, गाणं संपले तरी बराच वेळ सगळे शांत बसून होते. जणू सगळे त्या 'शीन' मध्येच अजून गुंतलेले होते.

८ एप्रिल, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! ११ ’बायमावशी!’१
आमच्या लहानपणी चाळीय(चाळपासून चाळीय) अथवा वाडीय(वाडीपासून वाडीय) वातावरण होते. अशा ह्या वातावरणात एखादे तरी सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असते. कुणी तरी काका, मामा, मावशी, आत्याबाई, आजी-आजोबा असे लोक प्रत्येक चाळीत नक्कीच सापडतील, नव्हे तशी व्यक्तिमत्त्व सापडायची. आमच्या वाडीत असेच एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते, ते 'बायमावशी ' ह्या नावाने ओळखले जाई. लहानथोर सगळेच त्यांना बायमावशी म्हणायचे. खरे तर त्या माझ्या आईच्या वयाच्या होत्या, पण माझ्या सारख्या लहान मुला-मुलींपासून ते अगदी काठी टेकत चालणारे आजी आजोबा देखिल त्यांना बायमावशी असेच म्हणत! आहे ना गंमत!
आमच्या वाडीच्या अगदी मध्यभागी एक गोलाकार चाळ होती. त्यातल्या एका बिर्हाडात बायमावशी आणि त्यांचे यजमान राहायचे. ह्या बायमावशींच्या यजमानांना सर्व वाडकर लोक काका म्हणत. आता ते ओघानेच आले म्हणा. बायको मावशी म्हणून नवरा काका. पण इथे अजून एक गंमत आहे. आम्ही लहान मुलं ह्या काकांचा उल्लेख आपापसात करताना अथवा त्यांच्याविषयी काही बोलायचे असेल तर 'बायमावशींचे काका ' असा करत असू. :-) असो.
बायमावशी-काका ह्या जोडप्याला मूल नव्हते त्यामुळे त्यांचे घर हे आम्हा समस्त वाडीतल्या मुलांसाठी हक्काचे विश्रांतिस्थान झालेले असायचे. काका नोकरीनिमित्त पहाटे पाचला घरातून जे बाहेर पडत ते संध्याकाळी सात-साडेसातला परतत. ह्या मधल्या काळात बायमावशींच्या घरावर जवळपास सर्व वाडीतल्या लहान मुलांचा आणि त्यांच्या आयांचा कब्जा असायचा. दोन खोल्यांच्या त्यांच्या घराची रचना अशी होती की त्यातून जवळपास सगळी वाडी दिसत असे. त्यांच्या घराचे दार आणि स्वयंपाक घराची खिडकी उत्तरेला होती. तिथून आमचे मोठे अंगण, आमची चाळ(ज्यात मी राहायचो) आणि त्याच्या शेवटाला संडास होते ते दिसायचे , तर एक मोठी खिडकी पूर्वेला होती जिच्यातून इतर घरं, मालकांची,बाग, बंगला आणि वाडीचे प्रवेशद्वार दिसत असे. म्हणजे वाडीतली एकूण एक हालचाल त्यांच्या त्या घरातून दिसत असे. अंगण, त्यात खेळणारी मुले, वाळत घातलेले कपडे, धान्य, पापड आणि वाडीतून आत-बाहेर करणारी माणसे, झाडं,पशू-पक्षी वगैरे सगळे हे असे एका नजरेत दिसत असे. त्यामुळे बायमावशींकडे सगळ्या वाडीची खबर असायची.
बायमावशी बोलायला,वागायला मिठ्ठास होत्या. तशा त्या मूळच्या गोव्याच्या. त्यामुळे बोलण्यात एक प्रकारचा हेऽऽल आणि गोडवा असायचा.
नवर्याला काहीही सांगायचे झाले की म्हणायच्या, "ऐकलाऽऽऽत!"
इतके म्हटले की पुरे असायचे. कारण काका तसे त्यांना घाबरून असत. काका बायमावशींसमोर कधीच बोलत नसत. त्या म्हणतील ती पूर्व असायची. त्यामुळे त्यांनी नुसते, "ऐकलाऽऽऽत" म्हटले की काका धडपडत त्यांच्याजवळ जाऊन अगदी आज्ञाधारक मुलासारखे उभे राहायचे. काका फारसे कधी बोलत नसत. क्वचित प्रसंगी बोलले तर लक्षात येत असे तो त्यांचा अतिशय धीरगंभीर आणि घुमणारा खर्जातला आवाज! बायमावशी घरात नसल्या तर (बाजारहाट वगैरे साठी बाहेर जात) ते आम्हा मुलांशी बोलण्याची आणि त्यातल्याच एखाद्याची थट्टा करण्याची संधी साधत असत. पण क्वचितच बोलण्याचा प्रसंग येत असल्यामुळे ते बोलताना खूप अडखळत असत. मग त्यांनी आमची थट्टा करण्याऐवजी आम्हीच त्यांच्या त्या अडखळत बोलण्याला हसत असू.
तसे काका हट्टी होते. त्यांना सिगारेट प्यायची सवय होती पण तीही त्यांना बायमावशींच्या समोर ओढण्याची हिंमत नसायची. मग त्या घरात नाही असे पाहून ते मला हळूच शुक-शुक करून बोलवायचे आणि सिगारेट आणायला पाठवायचे. येताना त्यातल्याच उरलेल्या पैशाच्या गोळ्या आणायची मला सूट असायची. खरे तर त्यांचे काम करावे म्हणून ही लालूच असायची, म्हणून आम्ही मुलेही बायमावशींची, घरातून बाहेर जाण्याची वाट पाहत असायचो.
बायमावशींच्या समोर दबकून वागण्याच्या ह्या काकांच्या स्वभावामुळे त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू होता. काकांनी कमावून आणायचे आणि बायमावशींनी त्यात अगदी व्यवस्थित भागवायचे असा जणू अलिखित करारच त्या दोघांच्यात असावा. तशी काकांची नोकरी खास नव्हती आणि त्यांना पगारही जेमतेमच होता. पण बायमावशींच्या कुशल व्यवस्थापनामुळे त्यातही त्यांचे भागत असे. कधी कुणाकडे त्यांनी हात पसरलेले मी तरी पाहिले नाही.
बायमावशींच्या बोलण्यातले खास शब्द सांगायचे तर, " गो बाय माऽऽझे!, अग्गोऽऽ बाऽऽऽई, मेल्यांऽऽऽनो, सांगता काऽऽऽऽयऽऽ, अंऽऽशेऽऽ!" वगैरे वगैरे. हे शब्द प्रत्येक संभाषणात येणारच. ह्या शब्दांबरोबरच चेहर्यावरचे भावही अगदी पाहण्यासारखे असत. तशा त्या काही खास सुंदर म्हणाव्या अशा नव्हत्या पण कुरुपही नव्हत्या. पण चेहरा विलक्षण बोलका होता. जेमतेम पाच फुटापर्यंतची उंची, काळा-सावळा वर्ण, नाकी-डोळी नीटस, थोडेसे कुरळे केस, केसांचा छोटासा अंबाडा आणि त्यात कधी अबोली किंवा मोगर्याची वेणी तर कधी गुलाबाचे फूल तर कधी घसघशीत गजरा असा साधारण त्यांचा रुबाब असायचा.
दिवसभर आम्ही लहान मुलं त्यांच्या घरात आत-बाहेर करत असायचो. त्या मोकळ्या असायच्या तेव्हा मग आमच्याशी त्यांचा संवाद चालायचा. त्यात, आज घरी जेवायला काय होते पासून ते आज शाळेत काय शिकवले, झालंच तर, एकमेकांच्या चहाड्या सांगणे, अशा नानाविध गोष्टी आम्ही त्यांना सांगायचो आणि त्याही तितक्याच औत्सुक्याने त्या ऐकून आम्हाला प्रतिसाद देत. मग त्यांना आपली गोष्ट सांगण्यात आमच्यात अहमहमिका लागायची. पण त्याही, एकावेळी सगळ्यांचे ऐकून घेताना कधी रागावल्याचे, चिडल्याचे आम्हाला दिसले नाही. फारच कालवा झाला तर त्या सगळ्यांना शांत करत, हातावर काही तरी खाऊ देत आणि मग एकेकाला त्याची गोष्ट सांगायला सांगत. इथे आमची तोंडे खाण्यात गुंतलेली असल्यामुळे ज्याला विचारलेय तोच बोलायचा आणि त्यामुळे प्रत्येकाला बोलायची संधी मिळायची.
दुपारची जेवणं-खाणं आटोपली की मग त्यांच्या घरात बायकांचा दरबार भरायचा. आम्हा मुलांच्या आया ताटात तांदूळ,गहू किंवा जे काही निवडायचे असेल ते घेऊन तिथे हजर व्हायच्या आणि मग त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. कुणी भरतकाम, विणकाम किंवा काही शिवणकाम घेऊन येऊन बसायच्या. आता बायकांच्या गप्पांचे विषय काय हे सांगायची जरूर आहे काय? एकातून एक असे विषय बदलत चहाच्या वेळेपर्यंत ह्या गप्पा चालत. ह्या गप्पांव्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम इथे अधून मधून चालायचा तो म्हणजे आपण पाहिलेल्या, नवीन चित्रपटाची कहाणी सांगणे. एकीने सांगायचे आणि इतरांनी त्यावर भाष्य करत करत ऐकायचे असा सगळा मामला असायचा. पण ह्या चित्रपट कहाणी कथनामध्ये बायमावशींचा कुणीच हात धरू शकत नसे. त्यांचे त्यावेळचे हावभाव,शब्दोच्चार आणि कहाणी सांगण्याची धाटणी ही एखाद्या तरबेज कीर्तनकाराइतकी आकर्षक होती.
बायमावशी कथा सांगायच्या त्याची ही एक छोटीशी झलक पाहा..... उदाहरण म्हणून आपण मोलकरीण चित्रपटाची कथा घेऊ या.
"हां! तर काय माहीतेय काऽऽय? ती आपली... कोण ती हो? हां! आठवलं बघा! सुलोचना! काय वो ती दिसते? खरंच! अगदी सोज्वळ बाई बघा! आणि तिचा तो नवरा! काऽऽऽय बरंऽऽऽऽ त्याचं नाऽऽऽऽऽव? जाऊ द्या. आता आठवत नाय! मग आठवलं की सांगते हां.
हां, तर, तो नवरा देवळातला भटजी असतो. कीर्तन तर इतके मस्त करतोऽऽऽऽ की काय सांगू? बाय माऽऽऽऽझे! अवो लोकं नुसती डोलतात त्याच्या कीर्तनात. तर पैला शीन देवळाचा हाय(बायमावशींची भाषा म्हणजे अर्धी कोकणी अर्धी मराठी. त्यामुळे हाय,नाय सारखे उच्चार भरपूर). तर ते भटजी रामायणातली कथा सांगताहेत हां. राम वनवासाला गेलाय आणि इथे दशरथ त्याची आठवण काढून काढून रडतोय. इथे बघा एक गाणं हाये... (बायमावशी गुणगुणून दाखवतात). हे श्रीरामा,हे श्रीरामा, एक आऽऽस मज एक विसाऽऽवा, एक वाऽऽर तरी राऽऽम दिसाऽऽऽवा... तुम्हाला सांगते विद्याचे आई(माझ्या आईला उद्देशून), अवो तो भटजीचा लहान मुल्गा, ढुंगणाला लंगोटी लावलेला(मोठा झाल्यावर हाच रमेश देव होतो हां ), हे गाणं म्हणत म्हणत येतो.
ओ विद्याचे आई! तुमच्या पम्याला(म्हणजे मला) बोलवा की. त्याला येते हे गाणे. त्या पोरासारखेच रंगून म्हणतो. ते गाणं किती हो करुण आहे नाही? किती आर्ततेने गायलंय त्या पोराने. तुम्हाला सांगते.... मी तर नुस्ती पदराने डोळे पुसत होते,नाकाने नुस्ते.. सूं सूं चालले होते."
इथे सगळ्या बायकां आपापले डोळे पदराला पुसत असतात. थोडा वेळ सूं सूं आणि नाकं शिंकरण्याचे आवाज येत असतात.
माझी आई उठून बाहेर येते आणि मला बोलावते. मी आपला खेळ सोडून नाईलाजाने तिथे जातो. मग बायमावशी आपली फर्माइश करतात.
"अरे पम्या ! (मला पम्या म्हणणार्या तीनच व्यक्ती... एक माझी आई,दुसरी माझी मोठी बहीण आणि तिसर्या ह्या बायमावशी..... बाकी माझी नावे अनंत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधी तरी) म्हण की ते रामाचे गाणे. "
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मग आई मला आठवण करून द्यायची आणि मग मी ते गाणे अगदी आरंभ संगीतापासून शेवटपर्यंत गात असे. मला स्वत:लाही हे गाणे खूप आवडायचे, त्यातली आर्तता हृदयात कालवाकालव करायची, त्यामुळेच कदाचित मी ते गाणे खूपच प्रभावीपणे गायचो. गाणे ऐकताना इथे सगळ्या बायकांचे पदर पुन्हा डोळ्याला लागलेले असायचे. माझ्या बरोबर खेळणारी मुलेही ओट्यावर येऊन माझं गाणं संपण्याची वाट पाहत थांबलेली असायची. गाणं संपताच मी पुन्हा खेळायला जायचो.

५ एप्रिल, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! १०
इमारतीचे काम जोरात सुरू झाले. कामगारांचा राबता वाढला. तसे आमचे तिथले खेळणे कमी होऊ लागले. बघता बघता इमारतीचा पाया तयार झाला आणि काही कारणाने पुढचे काम थांबले. थांबले कसले ठप्पच झाले. तसाही पावसाळा तोंडावर आलेला होताच. त्यामुळे काम थंडावणार होतेच; पण ते अजिबात बंदच पडले ते का हे काही कळले नाही.आम्हा मुलांना ह्या गोष्टीचा खरे तर फायदाच झाला. त्या तयार कोब्यावर(पाया) आमचे पकडापकडीचे खेळ रंगू लागले. ह्या ठिकाणी खेळताना एका गोष्टीची मात्र आम्हाला काळजी घ्यावी लागत होती, ती म्हणजे तिथे असलेली उघडी विहीर.सिंध्याने ही जाणीवपूर्वक बुजवलेली नव्हती. कारण त्या विहिरीचे पाणी त्याला बांधकामासाठी हवे तसे वापरता येत होते आणि इमारतीच्या बांधकामातच ती सामावली गेलेली होती. तिच्या वरूनच इमारतीचा जिना वर चढणार होता. तेव्हा इमारत पूर्ण झाल्यावर त्यावर तो झाकण बसवणार होता. तशी ती विहीर फार मोठी नव्हती पण सदोदित भरलेली मात्र असायची. वाडीतली धीट मुले त्यात पोहत देखिल. अर्थात त्यात मी नव्हतोच. मला पहिल्यापासूनच पाण्याची भिती वाटायची आणि मी त्यापासून नेहमीच चार हात दूर असायचो. आमच्या घरात नळ येण्याआधी मात्र आम्ही ह्याच विहिरीचे पाणी वापरत असू. तेव्हा विहिरीतून पाणी उपसणे,बादल्या भरून आणून घरातले पाण्याचे पिंप भरणे ही कामे आम्ही तिघेही भाऊ नित्यनेमाने करत असू. पण पोहण्या वगैरेचे मात्र कधी नाव नाही काढले.
तसे आम्ही जवळपास दिवसाचा बहुतेक वेळ (शाळा,अभ्यास,जेवणा-खाण्याचा वगळून) खेळण्यातच घालवत असू. दिवसभर खेळून झाले की मग जेवण होण्याआधी रात्री चांदण्यात त्या कोब्यावर बसून आमच्यात शिळोप्याच्या गप्पा सुरू होत. त्यातले विषय मात्र सतत बदलत असत. कधी सिनेमा तर कधी नवीन आलेली गाणी. कधी मारामार्यांविषयी तर कधी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या.कधी कुणी गोष्ट सांगे तर कधी कुणाला आलेला एखादा भन्नाट अनुभव. असे अनेक विषय चघळता चघळता गाडी एका विषयावर हटकून येत असे आणि तो विषय म्हणजे भूत आणि भुतांविषयीचे अनुभव.अगदी खरं सांगायचे तर आमच्यापैकी कुणीही भूत पाहिलेले नव्हते किंवा कुणाला तसला काही अनुभवही नव्हता. पण एकाने काही सांगितले की आपणही काही कमी नाही हे दाखवण्यासाठी दुसरा अहम-अहमिकेने काही तरी रचून सांगायचा आणि मग ह्या अशाच गजाली रंगत जायच्या. काही मोठी मुले (दादा आणि त्याच्यासारखी काही)सोडली तर आम्ही चिल्लर-पिल्लर अत्यंत घाबरटच होतो. मी तर अंधारालाही घाबरायचो. आमच्या चाळीसमोरच तर ही इमारत तयार होत होती. ह्या दोन्हीत जेमतेम तीस-एक फुटाचेच अंतर होते. कोब्यावर बसल्यावर समोर आमच्या चाळीतील सगळ्या खोल्या , त्यातली माणसे दिसत असत. त्या खोल्यांमधल्या प्रकाशाची तिरीपही आम्ही जिथे बसायचो तिथपर्यंत आलेली असायची. पण अशा भुताच्या गोष्टी सुरू झाल्यावर त्या ऐकताना कितीही भिती वाटली आणि तिथून निघून जावेसे वाटले तरी माझी एकट्याने घरी जाण्याची हिंमत होत नसे. कारण? आमच्या चाळीच्या आणि ह्या होणार्या नव्या इमारतीच्या वाटेत(म्हणजे आमच्याच अंगणात) दोन मोठी झाडे होती. त्यातले एक झाड होते बकुळीचे आणि दुसरे चिंचेचे.चिंचेच्या झाडावर भुते असतात असे कुणी तरी केव्हा तरी बोललेले ऐकले होते आणि तेव्हापासून अंधार झाल्यावर एकट्याने त्या झाडाजवळ जायची माझी कधीच हिंमत व्हायची नाही. खरे सांगायचे तर हे चिंचेचे झाड आमच्याच 'नत्र आणि युरिया'वर पोसलेले होते. रोज रात्री झोपायच्या आधी आम्ही आमचा जलभार ह्याच्याच मुळाशी हलका करायचो तरीही त्या झाडाची मनातली भिती मात्र कधी कमी नाही झाली. रात्री चंद्राच्या प्रकाशात त्या झाडाच्या फांद्यांच्या असंख्य हलणार्या सावल्या पाहिल्या की पोटात भितीने ढवळून येत असे. ह्या दोन्ही झाडांच्या सहवासातच रात्रीची शतपावली मी वडिलांच्या सह करत असे तेव्हा मात्र ही भिती जाणवत नसे. पण एकट्याने तिथे जाणे सोडाच पण अगदी घराच्या ओट्यावर बसून त्या चिंचेच्या झाडाकडे पाहणेही मला भितीदायक वाटायचे.
शतपावली करताना वडील आमच्याकडून पाढे म्हणवून घेत. मग स्तोत्रांची उजळणी होई. हे सगळे झाल्यावर मग आम्ही भाऊंना(माझे वडील) त्यांच्या लष्करी जीवनातल्या अनुभवांबद्दल(माझे वडील दुसर्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या सैन्यात होते आणि त्यांना ब्रह्मदेशात पाठवलेले होते)विचारायचो. त्यांचे ते अनुभव ऐकतांना माझ्यात अगदी वीरश्री संचारायची.सैनिकांची कवायत घेताना कशा आज्ञा देतात त्या वडील अगदी साभिनय दाखवायचे आणि आमच्याकडून त्याप्रमाणे करून घ्यायचे.
त्यांचा आवाज इतका दणदणीत होता की तेव्हा आजूबाजूचे लोकही(अगदी सुरुवातीला)आपापल्या घरातही दचकत असत. घरातून बाहेर येत... काय झालं म्हणून बघायला. पण मग नंतर त्यांनाही त्याची सवय झाली. त्यांच्या आवाजात त्या सगळ्या आज्ञा ऐकताना खूप मजा यायची आणि हे सगळे पाहायला आणि अनुभवायला आमच्या वाडीतील यच्चयावत वानरसेना हजर असायची. अशा वेळी माझी टीचभर छातीही गर्वाने फुगलेली असायची. हा सगळा कार्यक्रम आटोपून झोपायला जाण्याची वेळ झाली की मग आमचे 'नित्यकर्म' उरकायला एकट्याने त्या चिंचेच्या झाडाखाली जाताना माझा आधीचा आवेश पार गळपटलेला असायचा.मी आपला सगळा धीर एकवटून कसाबसा तिथे जाऊन ते उरकून तसाच सुसाट घरी येत असे. घरात शिरल्यावर मात्र पुन्हा जीवात जीव यायचा.
त्या दिवशी दुपारचे जेवण आटोपून मी बाहेर ओट्यावर येऊन पुस्तक वाचत बसलो होतो. अंगणात काही जण खेळत होते. एव्हढ्यात हसल्याच्या आईचा आवाज आला. ती हसल्याला शोधत होती. खेळणार्या त्या मुलांना विचारत होती की त्यांच्यापैकी कुणी हसल्याला पाहिलेय काय. बहुतेकांनी नाही असेच उत्तर दिले. मग ती आपली वाडीभर शोधत फिरली पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. आमच्या वाडीत शिरण्याचे दोन मार्ग होते. एक मालकांच्या घरासमोरून येणारा(हमरस्ता) आणि एक आमच्या चाळीच्या संडासाजवळून दुसर्या वाडीत जाणारा रस्ता... तोही पुढे फिरून हमरस्त्याकडेच येत असे. त्यामुळे आम्ही मुले पकडापकडी खेळताना ह्या दोन्ही रस्त्यांचा वापर करत असू. हे सगळे माहीत असल्यामुळे त्याच्या आईने आजूबाजूलाही शोध घेतला पण हसल्याचा कुठेच पत्ता नव्हता.
मग तिने चिमण्याला पाठवले त्याला शोधायला. तोही शोधून दमला. हा हा म्हणता ही बातमी वाडीभर पसरली. मग सगळेच जण त्याला शोधायला लागले. शोधता शोधता असे लक्षात आले की त्याचे कपडे आणि विहिरीतून पाणी काढायचा दोरी बांधलेला डबा विहिरीपाशी आहे. मग काय विचारता? एकाहून एक शंका-कुशंका डोक्यात यायला लागल्या. त्याची आई रडायला लागली. आपला मुलगा विहिरीत पडला असावा अशी तिला दाट शंका येत होती. वस्तुनिष्ठ पुरावा पाहिल्यानंतर बर्याच जणांचे तसेच मत बनले. जसजसा वेळ जायला लागला तसतसे वातावरण गंभीर व्हायला लागले. वाडीतली वडीलधारी पुरुष माणसे कामानिमित्त बाहेर गेलेली होती. अशा अवस्थेत काय करायचे ? कुणालाच काही कळेना. मग मालकांच्या गड्याला, श्वना ला (ह्याचे खरे नाव यशवंत होतेपण आम्ही मुले त्याचा श्वनाच म्हणत असू.) बोलावले. तो आला. त्याच्या बरोबर अजून काही वाडीतली गडी मंडळी आली. त्यांनी सगळ्यांनी धडाधड विहिरीत उड्या मारल्या. अगदी तळापर्यंत शोध घेतला पण काहीच सुगावा लागेना. सगळी मंडळी हताश झाली. एव्हाना संध्याकाळचे चार वाजायला आले होते. शेवटचा एक प्रयत्न म्हणून श्वनाने पुन्हा एकदा पाण्यात बुडी मारली. साधारण एक मिनिटाने तो बाहेर आला आणि मग खरा उलगडा झाला.... हसला विहिरीतच पडलेला आहे आणि तो विहिरीच्या तळाला असलेल्या एका कपारीत अडकलाय!!!
आता मात्र समस्त महिला वर्गाचा आणि आम्हा चिल्ल्या-पिल्ल्यांचा संयम सुटला आणि हळूहळू स्फुंदता-स्फुंदता त्याचे मोठ्या आक्रोशात रुपांतर झाले. हसल्याच्या आईचा तर शोक पाहवेनासा झाला होता. तिला सावरायला पुढे सरसावलेल्या बायकांनाही ती आवरेनाशी झाली होती. त्यांच्या ताब्यातून सुटून विहिरीकडे धाव घ्यायचा सतत प्रयत्न करत होती. कसे बसे तिला धरून घरी नेले. इथे मग ही बातमी सैरावैरा सगळ्या भागात पसरली. कुणीतरी पोलिसांना ती कळवली. मग त्यांनी बंब वाल्यांना कळवली आणि अर्ध्या एक तासातच बंब जोरजोरात घंटा वाजवत आमच्या वाडीत दाखल झाले. आधी त्यांनी वरूनच गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला पण बराच वेळ तो प्रयत्न अपेशी ठरला. मग शेवटी त्यांच्यातलाच एक पट्टीचा पोहोणारा खाली उतरला आणि मोठ्या मेहनतीने त्याने तो गळ हसल्याच्या कपड्यात अडकवून त्याचे कलेवर विहिरीबाहेर आणण्यात यश मिळवले.
विहिरीबाहेर आणलेल्या त्याच्या त्या टम्म फुगलेल्या कलेवराकडे पाहून पुन्हा मोठा कालवा झाला. त्याच्या शरीरातले पाणी काढून टाकण्यात आले पण आता खूप उशीर झालेला होता. हसला आता कायमचाच आमच्यातून निघून गेला होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो विहिरीवर अंघोळीला गेला होता आणि तेव्हाच तो बहुधा पाय घसरून पडला असावा. दुर्दैवाने कुणाच्याही वेळीच लक्षात न आल्याने तो प्राणाला मुकला होता.
भुतांच्या गोष्टी ऐकून घाबरणारा मी, मला आता नव्याने घाबरण्यासाठी कारण मिळाले. त्यानंतर कैक महिने मी त्या विहिरीच्या आसपास रात्री तर सोडाच दिवसाही कधी फिरकलो नाही.वाडीतली लोकं आणि त्यांचे ऐकून आमच्यातलीच काही मुले "हसला काल रात्री तिथे विहिरीवर बसून अंघोळ करत होता" असले काहीबाही सांगू लागली आणि हे ऐकून आपली तर बुवा टरकली. तेव्हापासून , रात्री जेवायला बोलावल्याशिवाय घरात न परतणारा मी सूर्यास्ता आधीच घरी जाऊन हातपाय धुऊन चुपचाप अभ्यास करत बसायला लागलो.

२ एप्रिल, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! ९
इमारतीच्या कामासाठी सामान येऊन पडायला लागले. सिमेंट,रेती,सळया,दगड,खडी वगैरेचे ढीग उभे राहिले.आम्हा मुलांना त्यातल्या रेतीत खेळायला मजा यायची.त्यात आम्ही कधी किल्ले बनवायचो, कधी त्याच रेतीत घसरगुंडी आणि उड्या मारण्याचा खेळ खेळायचो. पण सर्वात मजा यायची ती कुस्त्या खेळायला.तासंतास आम्ही तिथे एकमेकांशी कुस्त्या खेळायचो.त्याच सुमारास मुंबईतल्या वल्लभभाई पटेल स्टेडियमवर 'फ्री-स्टाइल'(हल्ली डब्ल्युडब्ल्युएफ आहे ना तसेच) कुस्त्या चालायच्या. त्यात किंगकॉंग-दारासिंग ही मुख्य जोडी होती. ह्यांच्यातले सामने तुफान रंगायचे.त्या शिवाय रंधावा(दारासिंगचा धाकटा भाऊ),मायटी चॅंग...हा जिलेटीन चॉप मास्टर,टायगर जोगिंदर आणि असे किती तरी देश-विदेशातले मल्ल येऊन एकमेकांना आव्हानं देऊन कुस्त्या खेळत असत. वृत्तपत्रात त्यासंबंधीच्या मोठमोठ्या जाहिराती येत. त्यात कुणी दारासिंगला आव्हान दिलेले असे. मग त्याखाली दारासिंगचे ते सुप्रसिद्ध वाक्य लिहिले असे...."पहले रंधावा से लडो,उससे हराओगे तो ही मुझसे लडो!"
हे वाक्य वाचले की आम्ही मुलेही जाम खूश होत असू.मग आपापसात आमचे ज्यावर एकमत होत असे ते वाक्य म्हणजे, "दारासिंग म्हणजे वाटले काय तुम्हाला महाराजा? असा कुठल्या तरी फालतू चिरकुटाशी थोडीच लढणार? पहिल्यांदा आपली लायकी तर त्या चिरकुटाला सिद्ध करू द्या,चिल्लर पिल्लरना हरवू द्या,मग रंधावाला हरवू द्या आणि मग या दारासिंग समोर.आमच्या दृष्टीने दारासिंग म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.
ह्या कुस्त्या खरे तर लुटूपुटीच्या असत.पण हे कळण्याचे आमचे ते वय नव्हते. दुस्र्या दिवशी वृत्तपत्रात येणार्या कुस्त्यांच्या वर्णनावर आणि निकालावर आम्ही अक्षरश: तुटून पडत असू. ज्याच्या हातात पहिल्यांदा वृत्तपत्र यायचे तोही मग जरा भाव खाऊन घ्यायचा. मग इतरांच्यावर मेहरबानी करतोय असे दाखवत त्या बातमीचे मोठ्याने वाचन करून त्यांची दुधाची तहान ताकावर भागवायची, असले प्रकार चालत. त्यात दारासिंगने कोणत्या डावावर कुस्ती मारली हे देखिल आम्हाला पुढे पुढे पाठ झाले. 'इंडियन डेथ लॉक' हा दारासिंगचा रामबाण डाव होता तर 'किंग कोब्रा' हा रंधावाचा रामबाण डाव होता. नेमके हे काय प्रकरण होते हे आम्हाला माहीत नव्हते पण वृत्तपत्रातल्या वर्णनावरून आमचे आम्हीच काही ठरवले होते ... जसे की प्रतिस्पर्ध्याला खाली पाडून त्याच्या नरड्यावर पाय रोवून उभे राहणे म्हणजे 'इंडियन डेथ लॉक' आणि आपले दोन्ही हात एका बाजूला घेऊन प्रतिस्पर्ध्याची मानगुट त्या हाताच्या कात्रीत पकडायची म्हणजे 'किंग कोब्रा'.. हे चूक की बरोबर? कुणाला ठाऊक? आणि त्याने फरक तो काय पडणार होता आमच्या सारख्यांना. आम्ही हे सगळे डावपेच आमच्या रेतीतल्या कुस्तीत वापरायचो. एकमेकांवर वार-प्रतिवार करायचो.
आम्हा तिघा भावात माझा मोठा भाऊ.... दादा हा माझ्यासारखाच चणीने छोटासाच होता पण त्याच्यात विलक्षण ताकद होती. त्याच्यापेक्षाही वयाने आणि आकाराने मोठ्या मुलांना तो भारी पडायचा. म्हणून तो आमच्यातला दारासिंग होता. तो कधीच हरायचा नाही. म्हणजे निदान आमच्या वाडीत तरी त्याला कुणी हरवणारे नव्हते. त्यामुळे मी आपोआप रंधवा झालो..... अहो हसताय काय? खरंच सांगतो. तसा मी लेचापेचा होतो; माझ्यात शक्ती कमी होती पण युक्ती मात्र भरपूर होती.मग आमच्या कुस्त्या सुरू व्हायच्या. माझ्या बरोबरीच्या(ताकतीने) मुलांना मी सहज हरवत असे पण थोडी वजनाने भारी असलेली मुले मला पार चेचून टाकत. मग शेवटी दादाला उतरावे लागे मैदानात.
दादा उतरला की मग आम्ही सगळे जोरजोरात टाळ्या,शिट्ट्या वाजवायचो. खूप आरडाओरडा करायचो. हे सगळे वातावरण निर्मितीसाठी असायचे. एकदा का कुस्ती सुरू झाली की मग आमची पांगापांग व्हायची. कारण दादा आणि त्याचा प्रतिस्पर्धी(जो कोणी असेल तो) हे म्हणजे दोन मदोन्मत्त रेडेच झुंज खेळताहेत अशा तर्हेने कधी एकमेकांना टकरा मारत किंवा रेटारेटी करत इथेतिथे फिरत असत. त्यामुळे ते मैदान सोडून कैक वेळेला बाहेर यायचे आणि मग आम्हा प्रेक्षकांची नुसती धावपळ व्हायची. हो! अहो, चूकून त्या दोघा रेड्यांची टक्कर आम्हाला लागली तर मग आमची काही खैर नव्हती.
कुस्त्या कितीही अटीतटीच्या झाल्या तरी शेवटी विजय दादाचाच व्हायचा. कारण दादा शक्तिमान होता तसाच चपळ आणि युक्तिवानही होता. त्यामुळे आपल्यापेक्षा भारी प्रतिस्पर्ध्याला तो नेहमी हुलकावण्या देत दमवत असे आणि मग अचानक असा काही वेगात पटात घुसायचा की त्या हादर्याने प्रतिस्पर्धी नामोहरम व्हायचा.
आमच्या वाडीत त्या काळी इतकी मुले होती की ह्या कुस्त्या संपायचे नाव नसे. आम्हा तिघा भावांसारखेच अजूनही काही दोघे-तिघे भाऊ भाऊ ह्यात उतरत असत. ह्यात एक गुजराथी जोडी होती. धाकटा हसमुख(हसला...म्हणायचे सगळे त्याला) आणि मोठा चिमण(चिमण्या म्हणायचो ह्याला). ह्यातला हसला हा दिसायला अतिशय देखणा,गोरा पान असा होता.पण भयंकर व्रात्य. सारखा खोड्या काढायचा. माझे आणि त्याचे तर नेहमीच वाजायचे. मग मी भडकून त्याला चोपायचो पण तोही इतका निर्लज्ज होता की कितीही मारा.. त्याची मस्ती कमी व्हायची नाही. मात्र कधी कधी तो चिमण्याकडे माझी तक्रार करायचा. मग चिमण्या मला एकटा गाठून मारायचा. तो माझ्या पेक्षा मोठाही होता आणि शक्तिमानही होता.
मग चिमण्याची तक्रार घेऊन मी दादाकडे जायचो की मग दादा त्वेषाने चिमण्याला आव्हान द्यायचा. हे आव्हानही मोठे नाटकी असे. तानाजी धारातीर्थी पडल्यावर शेलारमामा उदयभानाला लढाईचे आमंत्रण देतो. त्याच्या तोंडी जे वाक्य आहे, "दुष्टा! उदयभाना! माझ्या तान्याला मारलेस? चल आता मी तुझी खांडोळी करतो!"(आम्हाला दुसरीला एक धडा होता. 'गड आला पण सिंह गेला.' त्या धड्यात हे वाक्य होते. हा धडा आम्हा तिघा भावांचा अक्षरश: तोंडपाठ होता आणि लढाई-लढाई खेळताना आम्ही त्यातल्या वाक्यांचा असा समर्पक वापरही करत असू.)
त्याच चालीवर दादा म्हणायचा , " दुष्टा चिमण्या! माझ्या भावाला मारलेस? चल आता तुझी खांडोळी करतो!"
मग त्यांची मारामारी सुरू व्हायची. दोघेही तुल्यबल होते.पण शेवटी दादा त्याला भारी पडायचा. मग दादा त्याला जमिनीवर पाडून त्याला दाबून ठेवायचा आणि मग मीही माझा हात साफ करून घ्यायचो. त्या अवस्थेतही चिमण्या मला धमक्या द्यायचा, "साल्या,बघतो तुला,एकटा भेट!" मी आपला "हाहाहाहाहाहा" असे राक्षसी हास्य करून त्याला चिडवत असे. त्यावेळी त्याचा होणारा चडफडाट बघण्यासारखा असायचा.

२१ मार्च, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! ८
त्या कत्तलीनंतरची पहिली सकाळ ही अपार उजेड घेऊन आली. गोंधळलात ना! मी असा वेड्यासारखा अर्थहीन काय बोलतोय असेही वाटले असेल तुम्हाला. अहो असे व्हायचेच. माझेही तसेच झाले. कारण एरवी जो लख्ख सूर्यप्रकाश आमच्या पर्यंत पोचायला सकाळचे ७-७.३० वाजायचे तोच आज सकाळी ६च्या सुमारास दिसू लागला. सुर्यकिरणांच्या वाटेत येणारे, ते गर्द पानेफुले आणि फळांनी लगडलेले वृक्ष, आता त्यांची वाट अडवायला नव्हते.त्यामुळे मी जेव्हा अंथरुणातून उठलो तेव्हाच जाणवले की आजचा दिवस काही वेगळाच दिसतोय.सूर्यप्रकाश इतका प्रखर होता की क्षणभर डोळे दिपून गेले. हळूहळू त्या प्रकाशाचीही मग सवय झाली.
असेच दिवस जात होते. आम्ही लावलेल्या बर्याचशा फांद्यांनी मान टाकलेली होती.एक तर मुळे नसलेल्या आणि निर्दयपणे कापल्या गेलेल्या त्या फांद्या जगल्या असत्या तरच नवल वाटले असते.मात्र आमचे श्रम अगदीच काही फुकट गेलेले नव्हते.
पानं सुकलेल्या अवस्थेतही, घरटी निदान एखादं दुसर्या फांद्यांमध्ये अजूनही हिरवटपणा दिसत होता.आशेला जागा होती आणि हीच मोठी सुखकारक गोष्ट वाटत होती. मालकांची बाग असताना आमच्या कुणाच्याही दारात स्वत:चे असे कोणतेही रोप अथवा झाड नव्हते त्यामुळे झाडे जगण्यासाठी,खरे तर जगवण्यासाठी काय करावे लागते हे आम्हा कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे जे होईल ते निसर्गावर सोपवून आम्ही निर्धास्त होतो.
आठवडाभरात उरली सुरली झाडे(फांद्या) देखिल पार सुकून गेली.होळी जवळ आलेली त्यामुळे वातावरणात इतका उकाडा निर्माण झाला होता की झाडाला घातलेले पाणी पाचच मिनिटात दिसेनासे होऊन तिथली जमीन कोरडी ठणठणीत दिसायला लागायची. अशा अवस्थेत एका सकाळी मला अतिशय उत्साहवर्धक असा अनुभव आला. घराच्या बाहेर, ओट्यावर नेहमीप्रमाणे मी दात घासत बसलो होतो. आजूबाजूचे निरीक्षण करत असताना नजर एके ठिकाणी स्थिरावली. मातीत रोवलेल्या निष्पर्ण अशा एका काडीवर मला एक हिरवा ठिपका दिसला. आधी काय असावे ते कळले नाही पण मग नीट निरखून पाहिले आणि मला अक्षरश: अत्यानंद झाला. मी नाचत नाचत घरात गेलो आणि सगळ्यांना बळेच बाहेर घेऊन आलो. ते दृश्य पाहिल्यावर सगळेच खूश झाले पण.... ती काडी म्हणा अथवा खुंट म्हणा कोणत्या झाडाचा असावा ह्याबद्दल काहीच अंदाज येत नव्हता. कोणते बरे झाड असावे? सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता आणि त्याचे उत्तर मिळायला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार होती.
त्याचाही उलगडा पुढच्या काही दिवसात झाला. मंडळी ती होती मोगर्याची काडी, हे त्याला फुटलेल्या पालवीवरून समजले आणि माझ्या दारात लावलेल्या त्या मोगर्याच्या काडीला अतिशय लोभस अशी पालवी फुटलेली पाहून नकळत मला ज्ञानेश्वरांच्या 'मोगरा फुलला,मोगरा फुलला!' ह्या ओळी आठवल्या. आता कुठेशी नुसती पालवी फुटलेली असताना मी 'मोगरा फुलला' असे का समजत होतो? कारण मलाही माहीत नाही पण आपल्या हातांनी रोवलेल्या फांद्यांमधील मोगर्याची फांदी सर्वप्रथम रुजावी ही भविष्यकाळातील सुगंधाची जणू नांदी असावी असेच मला वाटले होते त्यामुळे मी स्वत:वरच खूप खूश होतो.
आणि मंडळी पुढे जणू वसंतोत्सव सुरू झाला असावा अशा तर्हेने हळूहळू प्रत्येकाच्या दारात मृतप्राय वाटणार्या त्या खुंटांना एकामागून एक पालवी फुटायला लागली ते पाहिल्यावर तर मला बालकवींची(त्यांचीच ना?) 'मरणात खरोखर जग जगते' ही काव्यपंक्ती आठवली.
सिंध्याने झाडं तोडणी झाल्यावर इमारतीच्या बांधकामाला जलदगतीने सुरुवात केली. सुरुवातीलाच आठदहा कामाठ्यांची कुटुंबे तिथे वसतीला आली त्यांनी काही तासातच त्यांच्यासाठी तिथे पाचसहा झोपड्या उभ्या केल्या.जागेची मोजणी मापणी झाली. त्यावर चुन्याने रेषा आखल्या गेल्या आणि एक दिवस मुहूर्तासाठी वाडीतील यच्चयावत सगळ्या लोकांना आमंत्रण दिले गेले. तो सिंधी आपल्या बायका-मुलांसह प्रत्येकाच्या घरी जाऊन आग्रहाचे आमंत्रण देऊन गेला. झाले गेले विसरून बहुतेकांनी हजेरी लावली. पुजा वगैरे आटोपल्यावर जमिनीवर नारळ फोडला गेला आणि सिंध्याने जमिनीत पहिली कुदळ मारली. खान-पान झाल्यानंतर समारंभ संपला. पुढच्याच पाच सहा दिवसात पुरुषभर उंचीचे ८-१० खड्डे खणून झाले.त्यात पाणी लागले. मग ते काढण्यासाठी मोटारी लावल्या. अशा सगळ्या धबडग्यात होळी आली. होळीसाठी दोन दिवस काम बंद ठेवलेले. बागेशिवायची ही आमची पहिली होळी. आम्हा मुलांना होळीच्या वेळी आजवर लाकूडफाटा,सुकलेला पाला-पाचोळा पुरवणारी बाग ह्या वेळी नव्हती ह्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा मन विषण्ण झाले. पण ती कसर आम्ही सिंध्याने बांधकामासाठी आणलेले बांबू,फळ्या वगैरे पळवून भरून काढली. होळी नेहमी प्रमाणे दणक्यात साजरी केली.
ह्या होळीला आम्हाला अजून एक नवा अनुभव मिळाला. तो म्हणजे त्या कामाठ्यांनी काढलेली सोंगे. कुणी राम,तर कुणी सीता,कुणी हनुमान अशी सोंगे धारण करून ते सगळे वाडीभर फिरत होते. लोक जे काही पैसा,धान्य देत ते आनंदाने घेत घेत पुढे जात होते. त्यांच्या मागून आम्ही सगळी वाडीतली बाळगोपाळ मंडळी त्यांची वानरसेना बनून चालत होतो. ढोलकीच्या तालावर त्यांच्या बरोबर आम्हीही नाचत होतो.ते लोक त्यांच्या भाषेत काही गाणीही म्हणत होते,नाचत होते. आम्हाला भाषा जरी कळत नव्हती तरी गाण्याची उडती चाल आणि त्याबरोबरचा ढोलकीचा ठेका आम्हालाही नाचायला प्रवृत्त करत होता. खूपच धमाल केली त्या दिवशी. त्यानंतर किती तरी दिवस आम्ही ती गाणी वाट्टेल ते शब्द घालून म्हणत नाचत असू.
त्या कामाठ्यांचा मुकादम 'बागाण्णा' आम्हा बालगोपालांवर खूप खूश होता. आम्ही त्याच्याशी आमच्या भाषेत बोलायचो आणि तो त्याच्या भाषेत.कुणाचा कुणाला पत्ता नाही. मग काय? खाणाखुणा करून बोलायचो. तीच तर खरी गंमत होती.संवाद साधण्यासाठी भाषेची आडकाठी असते असे निदान आम्हाला तरी त्याक्षणी जाणवले नाही.
दुसर्या दिवशीची धूळवडही दणक्यात झाली. आतापर्यंत आम्ही एकमेकांना मातीत लोळवून ती साजरी करायचो; पण ह्या वेळी आम्हाला आयते खणलेले आणि पाण्याने भरलेले खड्डे मिळाले होते. मग एकेकाला त्यात ढकलून देण्यातला आनंद अनुभवण्यात वेगळीच मजा आली. शेवटी शेवटी तर सगळेच खड्ड्यात! अशी परिस्थिती निर्माण झाली. मग काय विचारता? कुणी कुणाची तंगडी खेचतोय,तर कुणी कोणाला पाण्यात बुडवतोय असले आसुरी आनंद मिळवणारे खेळ सुरू झाले. बरं त्यातून बाहेर पडावे तर खड्डे खोल असल्यामुळे वर चढण्यासाठी शिडी शिवाय तरणोपाय नव्हता. पण ती आणणार कोण?
इतक्यात एकाने दुसर्याचा हात इतक्या जोरात धरून खेचला की तो खाली पडला आणि त्याच्या नाका-तोंडात पाणी गेले आणि तो घाबराघुबरा झाला. हे पाहून दुसरा जोरजोरात आरडाओरड करायला लागला. मग काय? बागाण्णा तिथे धावत आला त्याने ते पाहिले मात्र,धावत जाऊन त्याने शिडी आणली आणि मग तिच्या साहाय्याने एकेक करून सगळे बाहेर पडले. पण एकजण शिडीने बाहेर यायला तयार नव्हता. त्याने बागाण्णाकडे हात मागितला. नाईलाज म्हणून बागाण्णाने खाली वाकून त्याला हात देऊन वर ओढण्याचा प्रयत्न केला पण त्या व्रात्य मुलाने बागाण्णालाच खाली खेचले आणि चिखलात लोळवले. बागाण्णा खाली पडताच लगेच तो मुलगा शिडीने झरझर वर आला आणि इतर हसणार्या मुलांच्यात सामील झाला.
सगळ्यांना वाटले की आता बागाण्णा त्याला पकडून मारणार म्हणून सगळे जरा दूर जाऊन उभे राहिले. तो ही मनोमन घाबरलेला होता. पण...
नखशिखांत चिखलाने माखलेला बागाण्णा शिडी चढून वर आला आणि हसत हसत विहिरीकडे गेला. विहिरीतून पाणी काढून त्याने स्वतःवर ओतून घेतले,अंगावरचा चिखल धुऊन काढला आणि कुणावरही न रागावता तडक आपल्या झोपडीत निघून गेला. बागाण्णाच्या वर्तनाने अचंबित झालेला तो ही त्याच्या मागोमाग गेला. थोड्याच वेळात त्याला घेऊन बागाण्णा विहिरीकडे गेला आणि विहिरीतून पाणी काढून त्याने त्याला यथेच्छ न्हाऊ घातले. हे पाहून इतरही मुले पुढे सरसावली. बागाण्णाने त्यांनाही असेच न्हाऊ घातले आणि मग बागाण्णाचा जयघोष करत सगळेजण आपापल्या घरी निघून गेले.
तो व्रात्य मुलगा कोण होता हे तुम्ही ओळखले असेलच.

१६ मार्च, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! ७ (कत्तल!)
दादांचे वडील की आजोबा(नक्की माहीत नाही) मामलेदार होते. त्यामुळे आमची वाडी आणि अशाच अनेक वाड्यांचा मिळून एक मोठ्ठा भूभाग.... ज्या सबंध भागाला 'मामलेदार वाडी' असे संबोधत ती त्यांच्या मालकीची होती. प्रचंड अशी जायदाद त्यांनी गोळा केलेली होती. त्यांचे सगळे वारसदार (दादा आणि दादांचे बरेचसे सख्खे, चुलत/मावस वगैरे नातेवाईक) तिथेच आजूबाजूला त्यांच्या त्यांच्या बंगल्यात राहत असत. त्यापैकीच एकाच्या मुलाशी(जो नात्याने दादांचा नातू लागत होता)बेबीचे सूत जुळले. खरे तर बेबी त्याची 'आत्या' लागत होती; पण तो भाचा(की पुतण्या) असला तरी तिच्यापेक्षा वयाने मोठा होता. बेबीच्या हट्टामुळे नाईलाजास्तव तिचे त्याच्याशी लग्न लावावे लागले आणि ह्या धसक्याने दादा जे आजारी पडले ते त्यातून कधीच न उठण्यासाठी. काही महिन्यातच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने आणि बेबीच्या कृतीने ताई देखिल हवालदिल झाल्या आणि त्याही आजारी पडल्या. त्यांचे ते दरबार भरवणे खूपच कमी झाले. त्या कधी -मधी पडवीत बसलेल्या असल्या तरी आता कुणाशीही बोलत नसत. कुणी त्यांच्या तब्येतीची चौकशी केलीच तर जुजबी बोलून त्याला वाटेला लावत. दिवसभर विमनस्क स्थितीत बसलेल्या आणि शून्यात दृष्टी लावलेल्या ताईंना बघायची कुणालाच सवय नव्हती; पण आता सगळेच चित्र बदललेले होते.
ताईंच्या अशा अवस्थेमुळे त्यांचे कारभारात खास लक्ष लागेना आणि मग हळूहळू त्यांनी सगळा कारभार गुंडाळायला सुरुवात केली.
आधी त्यांनी त्यांच्या जायदादीच्या वाट्यातील ती बाग विकायला काढली जी आम्हा सगळ्यांसाठी एक आकर्षण होते. हा हा म्हणता ती बातमी वाडीभर पसरली आणि लहानथोर अशा सगळ्या वाडी-करांमध्ये एक प्रकारचे नैराश्य आले. ती बाग म्हणजे आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेली होती. रोज सकाळी उठल्यावर प्रथमत: त्या बागेचे दर्शन घडत असे की ज्यामुळे दिवसभर अतिशय प्रसन्न वाटायचे. डौलात डुलणारे ते उंचच उंच ताडमाड, ते सळसळणारे वड-पिंपळ, फळा-फुलांनी लगडलेली ती सर्व लहान-थोर झाडे, तो जाई-जुईचा सुगंध, रातराणीचा धुंद करणारा सुवास, प्राजक्ताची ती नाजूक आरक्त देठयुक्त सुवासिक फुले... आणि अजून कितीतरी... हे सगळे सगळे आता नष्ट होणार! ह्यापुढे ह्या सगळ्यांशिवाय आपल्याला जगावे लागणार.. ह्या कल्पनेनेच आम्हा सगळ्यांना नैराश्य आले. काही भाडेकरूंनी ताईंना कळकळीची विनंती केली की त्यांनी ती बाग विकू नये म्हणून; पण ताईंना आता पैलतीर खुणावत होते. मागे कुणी वारस नव्हता. एकुलत्या एका मुलीशी संबंध तोडून टाकलेले. मग कुणाच्या जीवावर हे सगळे आता निभवायचे? भाडेकरूंना नकार देताना त्यांच्याही जीवावर आले होते पण दुसरा मार्गच नव्हता. आपण जिवंत आहोत तोवर सगळी निरवा-निरव त्यांना करायची होती. मोठ्या कष्टाने त्यांनी सगळ्यांची विनंती अव्हेरली
ती बाग एका सिंध्याने विकत घेतली होती आणि मग एक दिवस तो सिंधी काही माणसांना घेऊन आला ... ज्यांच्या हातात कुर्हाडी,करवती अशी हत्यारे होती आणि मोठ-मोठे दोरखंड होते. आम्हा मुलांत कुतूहल निर्माण झाले की हा काय प्रकार आहे?
आणि जेव्हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा तर आम्ही पार थिजून गेलो होतो. ह्या सिंध्याला तिथे इमारत बांधायची होती आणि म्हणून त्याने इथली सगळी झाडे तोडायला ही सगळी फौज आणलेली होती. इतकी वर्ष ज्यांनी ह्या झाडांची जीवा-भावाने मशागत केली होती ते माळीदादा नि:स्तब्ध होते. माडाच्या झाडावर जेव्हा पहिली कुर्हाड पडली तेव्हा त्यांना ते बघवले नाही. मुसमुसत आणि डोळ्याला रुमाल लावत, जडावलेल्या पावलांनी ते तिथून निघून गेले. आम्हा मुलांचीही तीच अवस्था झाली होती.आम्ही हताश होऊन त्या अमानुष हत्या पाहत होतो आणि डोळ्यांतून अखंड धारा पाझरत होत्या.काही जण मुक्त कंठाने रडत होते. मोठ्या माणसांचीही काही वेगळी अवस्था नव्हती. ताईंनी तर त्या दिशेला असलेली खिडकीच बंद करून टाकली. सगळ्या वाडीवर सुतकी कळा पसरली होती.
एक एक वृक्ष धराशायी होताना पाहून काळीज तिळतीळ तुटत होते. फुलझाडे,वेली ह्यांची कत्तल करताना त्या लोकांना फार कष्ट नाही पडले; सटासट होणार्या विळ्या-कोयत्यांच्या वाराने त्या नाजूक वेली आणि फुलझाडे निमूटपणे मान टाकत होत्या; पण ते मोठ-मोठे वृक्ष पाडताना मात्र एकेकाचे घामटे निघाले. सतत सात दिवस ही कत्तल चालली होती. आम्ही मुले सकाळी शाळेत जाताना जे काही दिसेल ते डोळे भरून पाहून घेत होतो. शाळेतून घरी आल्यावर काही दिसेल ना दिसेल ह्याची शाश्वती नव्हती. आंबा,चिकू,पेरू सारखी मोठी झाडे तोडताना आधी त्यांच्या फांद्या तोडून टाकल्या जात होत्या. त्या फांद्यांना लागलेल्या छोट्या कैर्या,चिकू,पेरू वगैरे जे हाताला लागेल ते आम्ही जमेल तितके तोडून घेत होतो. ती फळे खाण्याच्या लायकीची असोत नसोत. निदान अजून काही दिवस तरी आम्ही त्यांच्या सहवासात अशा तर्हेने राहू शकणार होतो... ही भावनाच खूप मोठी होती. फुलझाडे,वेली वगैरेच्या फांद्या जितक्या उचलता आल्या तितक्या सर्व लोकांनी उचलल्या आणि आपापल्या दारात लावल्या. त्यातून काही जगल्या तर निदान तो सहवास आम्हाला हवाहवासा वाटत होता.

२९ फेब्रुवारी, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! ६
ताईंना एकच मुलगी होती.तिचे खरे नाव कधीच कुणाला लक्षात राहिले नाही कारण तिला सगळेच 'बेबी' म्हणत. बेबी माझ्या मोठ्या बहिणीपेक्षाही चार-पाच वर्षांनी मोठी होती. बेबी रंगाने ताईंसारखीच गोरी होती पण दिसायला मात्र सुंदर आणि नाजूक होती. ताईंही कदाचित त्यांच्या तरूणपणात सुंदर असतील, कुणास ठाऊक; पण आम्ही त्यांना पाहत होतो तेव्हापासून मात्र त्या बटबटीतच दिसत होत्या. ताईंचा आवाज पुरुषी आणि जाडा भरडा होता. त्याउलट बेबीचा आवाज अतिशय गोड होताच आणि मुख्य म्हणजे ती स्वभावाने अतिशय सोज्वळ आणि सौम्य होती. त्यामुळे आम्हाला नेहमीच हा प्रश्न पडायचा की बेबी ही ताईंची मुलगी होती तर त्यांच्या दिसण्या-वागण्यात इतका जमीन अस्मानाचा फरक कसा.
ताईंचे 'दादा' म्हणजे नवरा त्यांच्यापेक्षा खूपच वयस्कर होते.पण अंगा-पिंडाने दादा चांगलेच उंच आणि रुंद होते. कचेरीत जातानाचा त्यांचा रुबाब काही औरच होता. शर्ट-पॅंट, त्यावर कोट,पायात बूट, डोक्यावर गोल 'साहेबी हॅट'आणि डोळ्याला चष्मा. त्यावेळी त्यांच्याकडे पाहताना आम्हाला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती वाटत असे. मात्र दादा घरी असताना कमरेला धोतर, अंगात मलमलचा सदरा आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ ह्या व्यतिरिक्त अंगावर काहीच नसे. ह्या वेशात दादा अगदीच सोज्वळ आणि एखादे संत महंत वाटत. तसेही ते स्वामी समर्थांचे अनुयायी होतेच. त्यांच्या देवघरात स्वामी समर्थांची एक अतिभव्य तसबीर ठेवलेली होती. सुटीच्या दिवशी त्यांची पूजा-अर्चा तासंतास चालायची. घर सगळे धूप-उदबत्तीच्या वासाने भरलेले असायचे.वृत्तीने अतिशय भाविक असे हे दादा क्वचितच कुणाशी बोलत. पण ते बोलत तेव्हा त्यांचा तो 'धीरगंभीर आणि गडगडाटा' सारखा आवाज ऐकताच समोरचा मनुष्य त्यांच्यापुढे अगदी दीनवाणा व्हायचा.मात्र दादा कधी कुणावर रागावलेले मी तरी पाहिले नाही. तो सगळा मक्ता ताईंकडे होता.
अशा ह्या ताई-दादांच्या बंगल्यासमोर दिवाळीत रांगोळी काढायला बेबीला माझ्या बहिणीची मदत लागायची आणि बहिणीचे शेपूट बनून मीही तिथे जायचो. खरे तर ताईंसमोर जायची मला भिती वाटायची पण ताईंचा एकूणच आमच्या बाबतीत चांगला ग्रह असावा असे वाटते. कारण नेहमी त्यांच्या बोलण्यात ते जाणवायचे. कधीही काही संस्कारांचा विषय निघाला की त्या माझ्या आईकडे बोट दाखवीत. म्हणत, "विद्या(माझी बहीण)च्या आईचे संस्कार बघा. सगळी मुले कशी हुशार आहेत(हे जरा जास्तच होते. खरे तर आम्ही कुणीच म्हणावे असे हुशार नव्हतो. पण म्हणतात ना की वासरात.... तशी गत होती.). नेहमी सगळीकडे पुढे असतात.
अर्थात माझी बहीण आमच्या सगळ्या भावंडात हुशार होती हे मान्यच करायला हवे. त्यामुळेही असेल की 'गाड्याबरोबर नळ्याला यात्रा' ह्या न्यायाने आम्ही इतर भावंडेही हुशार ठरत असू. त्यात अजून एक भर म्हणजे बेबी अभ्यासात तशी यथातथाच होती. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या बहिणीची हुशारी तिच्यापुढे जास्त उठून दिसत असावी. असो. तर एकूण काय तर ताईंच्या लेखी आम्ही सगळे हुशार होतो. त्याचा एक फायदा मला व्हायचा. मला त्यांच्या त्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसायला मिळायचे. मग ताई माझ्याकडून श्लोक,गाणी वगैरे म्हणवून घेत आणि त्या बदल्यात घसघशीत खाऊही देत. अशावेळचे ताईंचे रूप काही वेगळेच भासे. इतके झाले तरी माझी त्यांच्याबद्दलची भिती मात्र कधीच कमी होत नसे. कारण मधेच कधीतरी त्यांना तिथे कुणीतरी बागेत शिरतेय अशी चाहूल लागायची आणि त्या तिथूनच "थांब! आलो मी!" म्हणायच्या की इथे मी भितीने थरथर कापायला लागायचो. त्यांच्या लक्षात आले की लगेच त्या "अरे तुला नाही" असे म्हणून समजूत घालायचा प्रयत्न करायच्या. पण त्यांचे साधे कुजबुजणेही सहजपणे आल्यागेल्याच्या कानावर पडण्या इतपत मोठ्या आवाजात असल्यामुळे ओरडणे कसे असेल ह्याची कल्पना यावी. मी जात्याच घाबरट असल्यामुळे हळूच तिथून पळता कसे येईल ह्याची संधी शोधायचो.
ताई क्वचितप्रसंगी विनोदही करायच्या.त्यांना हास्य-विनोद वर्ज्य नव्हता. मात्र त्यांचे ते विनोद आणि त्या बरोबरचे त्यांचे ते गडगडाटी राक्षसी हास्य आम्हा पोरांना घाबरवून टाकत असे.त्याची ही एक झलक.
एकदा आम्ही सगळी भावंडं आईवडिलांसोबत भायखळ्याच्या राणिच्या बागेत(आताचे जिजामाता उद्यान)गेलो होतो. दिवसभर तिकडचे सगळे प्राणी-पक्षी बघून,मस्तपैकी खाऊन-पिऊन आणि मजा करून घरी परतलो. वाडीत शिरताक्षणी ताईंचा पहिला प्रश्न आला तोही सणसणत!
"काय? मग आज कुठे जाऊन आली मंडळी?"
त्यांच्या त्या गडगडाटामुळे आम्ही मुलं आई-वडिलांच्या मागे लपलो. पण माझ्या बहिणीने सांगितले(ती ताईंना विशेष घाबरत नसे. कारण बेबीशी मैत्री असल्यामुळे ती बराच वेळ तिथेच असायची)की "आम्ही आज राणीचा बाग बघायला गेलो होतो."
झालं. तिचे बोलणे संपले नाही तोच पुन्हा ताई गडगडाटल्या, "राणीचा बाग, तेथे मोऽऽठे मोऽऽठे वाऽऽऽऽघ!"
आणि स्वत:च स्वत:च्या विनोदावर गडगडाटी हसू लागल्या.
त्यांचे पाहून आम्ही मुलेही नाईलाजाने हसू लागलो आणि संधी साधून तिथून हळूच सटकलो.

२१ फेब्रुवारी, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! ५
आमची वाडी खूप मोठी होती हे ह्या आधीच सांगितलेले आहे. तर ह्या वाडीतच एका बाजूला आमच्या वाडीच्या मालकांची खूपच मोठी एक बाग होती. त्यात अनेक प्रकारची फुलझाडे,वेली,फळझाडे, भाज्या, औषधी वनस्पती वगैरेंची रेलचेल होती. ह्या बागेचे वैशिष्ट्य हे होते की ह्यात लावलेली झाडे पद्धतशीर अथवा शिस्तशीर अशी लावलेली नव्हती. तर जिथे जशी जागा मिळेल तशी ती लावलेली होती. मात्र त्यातील विविधता इतकी होती की काही विचारू नका. बागेत एक छानशी विहीरही होती. हिच्याच पाण्यावर ती बाग पोसलेली होती.
मोठे वृक्ष म्हटले तर ताड-माड होतेच; वड-पिंपळ होतेच; बकुळ, चिंच, चिकू,पेरू,आंबा, फणस, केळी सारखी फळझाडं होती. विलायती चिंच,तुती सारखी क्वचितच आढळणारी झाडेही होती. भोपळा,शेवगा,दोडका,काकडी,टोमॅटो,कारली,वांगी,मिरच्या,अळू(भाजीचा आणि वड्यांचा आणि शोभेचा),तोंडली,भेंडी,मायाळू,नागवेल(विड्याची पाने) इत्यादी भाज्यांच्या वेली/झाडेही होती.
फुलझाडे आणि वेली तर विविध प्रकारच्या होत्या. गुलाब,मोगरा,जाई-जुई,चमेली,चाफा(ह्यातले जवळपास सगळे प्रकार म्हणजे हिरवा,पिवळा,पांढरा वगैरे), जास्वंदी(ह्याचेही बरेच प्रकार होते),सोनटक्का,कर्दळ(ह्यांची तर बने होती.),झेंडू,तगर,अनंत,गोकर्ण,सूर्यफूल,अष्टर,शेवंती,अबोली,गुलबक्षी,चिनी गुलाब अशी अनेकविध झाडे/रोपे/वेलींची रेलचेल होती.
शोभेची झाडेही भरपूर होती. त्यातच झिपरी(वेण्यांमध्ये जो हिरवा पाला घालतात ना ती), लाजाळू अशी नावे माहीत असलेली आणि नावे माहीत नसलेल्या असंख्य वनस्पती होत्या.
औषधी वनस्पतींमध्ये वाळा,माका,आघाडा,कोरफड,ब्राह्मी आणि अशा अनेक वनस्पती होत्या.
ह्या बागेला मालकांच्या बंगल्याजवळ प्रवेशद्वार ठेवले होते बाकी सर्व बाजूंनी तारांचे कुंपण घातलेले होते आणि त्याच्या जोडीला मेंदीची लागवड केलेली होती.
आमच्या वाडीत मुलांना तर तोटाच नव्हता. घरटी सरासरी तीन-चार मुले तर होतीच. त्यामुळे ह्या बागेवर आम्हा मुलांचा नियमित हल्ला असायचा. दगड मारून चिंचा,कैर्या,पेरू,चिकू वगैरे पाडण्यात आम्ही सगळे अव्वल होतो. पण व्हायचे काय की जी काही फळे पडत ती त्या बागेच्या आवारातच पडत. त्यात जायला एकच प्रवेशद्वार आणि तेही मालकांच्या बंगल्यासमोर असल्यामुळे त्यांची नजर चुकवून आत जाणे महा कर्मकठीण असे. त्यातही बागेचा माळी, मालकांचे इतर नोकर वगैरे मंडळींचा राबता असायचा. मग ती पडलेली फळे शोधायला बागेत जायचे तरी कसे? आमच्या वाडीच्या मालकीण बाई म्हणजे एक जंगी प्रकरण होते. मालक जातीने पाठारे-प्रभू समाजातले होते आणि ते रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर होते. त्यांची पहिली पत्नी हयात नव्हती (जिला मी कधीच पाहिलेले नाही) म्हणून त्यांनी उतारवयात दुसरे लग्न केले होते आणि ती स्त्री(म्हणजे मालकीण बाई) जातीने कोळी होती. जाडजूड शरीरयष्टी, उंची अगदीच बेताची, बेडकासारखे बटबटीत डोळे आणि त्यावर लाल काड्यांचा जाड भिंगांचा चश्मा. लुगडे नेसणे खास कोळी पद्धतीचे आणि अंगात कोपरापर्यंत लांब बाह्यांचा पोलका.
ह्या बाईकडे नुसते डोळे वर करून पाहणेच आम्हाला भीतिदायक वाटायचे. त्यात तिचा तो भसाडा आणि राक्षसी आवाज. तिला नुसती चाहूल लागली की कुणीतरी बागेत शिरलंय; की ती असेल तिथून जोरात ओरडायची, "थांब! आलो मी!"
की त्याची पळता भुई थोडी व्हायची. ही बाई असून "आलो मी" असे का म्हणायची ह्याचे कोडे सुरुवातीला आम्हाला होते; पण पुढे कळले की कोळी जातीच्या बायका असेच बोलतात म्हणून. असो. तर अशा ह्या आमच्या वाडीच्या मालकिणीला आम्ही मुलेच काय तर मोठी मंडळी देखिल टरकून असत.
वाडीत शिरण्याचा रस्ताच त्यांच्या बंगल्याच्या दरवाज्यासमोरून होता. त्यामुळे वाडीत येणार्या जाणार्या सगळ्यांची खबर ह्या मालकिणीला.. ताईंना (ह्यांना समस्त भाडेकरू 'ताई' आणि मालकांना 'दादा' म्हणत) असायची. ताई तशा प्रेमळ होत्या पण त्यांचे प्रेमही पाशवी प्रेम होते. म्हणजे असे की प्रेमाने त्यांनी कुणाला हाक मारली तरी त्यात जरब जाणवायची. त्यामुळे आम्ही लहान मुले तर आईच्या पदरामागे नाहीतर वडिलांच्या मागे लपत असू.
आमच्या त्या मोठ्या वाडीत आमचे एकुलते एकच ब्राह्मणाचे (हल्लीच्या भाषेत सांगायचे तर 'भटाचे')कुटुंब होते. ब्राह्मणांचे त्यांना खूप कौतुक असावे असे वाटते; कारण त्यांचा देवही 'ब्राह्मणदेव'(त्यांच्या भाषेत 'बामणदेव) हा त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशी एका छोटेखानी देवळात स्थानापन्न झालेला होता. त्यामुळेच की काय माझे वडील(ब्राह्मण आणि त्यातून आडनावाने देव) आणि माझी आई ह्यांच्याशी बोलताना ताई जरा(त्यातल्या त्यात हो !) नरमाईने बोलत.
ताई वाडीतल्या कोणत्याही स्त्रीला एकेरी संबोधत आणि वाडीतल्या सर्व स्त्रियादेखील त्यांना वडिलकीचा मान देत. घरात सगळ्याच कामांना नोकर-चाकर असल्यामुळे तसे ताईंना काहीच काम नसे. त्या त्यांच्या बंगल्याच्या प्रशस्त पडवीत खुर्ची टाकून बसलेल्या असत. बाहेरून येणार्या वाडीतल्या प्रत्येक स्त्रीची चौकशी केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यामुळे सगळ्याच बायका आपल्या हातातील पिशव्या अथवा जे काही सामान असेल ते तिथेच खाली ठेवून दोन घटका तिथल्या ओट्यावर विसावत. मग ताईंच्या चौकश्या सुरू होत.
"कुठे गेली होतीस? काय आणलंस? काय भावाने आणलंस?" वगैरे वगैरे चौकश्या झाल्यावर आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यावर मग त्या स्त्रीला जायची परवानगी मिळायची. ह्या चौकश्यांमध्ये कोण पाहुणे आले, कोण गेले, कोण आजारी आहे, मग औषध कोणत्या डॉक्टरांचे घेताय, घरात काय अडचण आहे, मुले नीट अभ्यास करतात की नाही असे सगळे बारीक-सारीक विषयही असत. ताईंच्या ह्या सवयीमुळे एक फायदा होत असे, सहसा वाडीत अनोळखी माणूस शिरत नसे. तसेच वाडीतली लहान मुलेही वाडीच्या बाहेर जाण्याची एकट्याने हिंमत करत नसत. एक प्रकारचा दरारा त्यांनी निर्माण केलेला होता. अर्थात त्यामागे वाडीतल्या आपल्या भाडेकरूंबद्दल आत्मीयता देखिल असायची. एका मोठ्या कुटंबाच्या कर्त्या स्त्री प्रमाणे त्या सगळीकडे लक्ष ठेवून असत. वेळप्रसंगी मदतही करत.
झाडाचे नारळ, आंबे, फणस ,केळी वगैरे फळे उतरवली की प्रत्येक घरी ती नोकरांच्या मार्फत जातीने पोचवली जात. त्यात दूजाभाव नसे.
सुरुवातीला भाडे घ्यायला ताई प्रत्येकाच्या घरी स्वतः जात. पुढे पुढे मग लोकच त्यांना त्यांच्या घरी भाडे नेऊन द्यायला लागले.
दरवर्षी न चुकता ताई नोकरांकरवी वाडीतल्या प्रत्येक घराला पिवळी (पिवळा चुना) फासून देत. त्या निमित्ताने मग आमची वाडी नव्याने चमकायला लागायची.

२ फेब्रुवारी, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! ४
मुलींमध्ये खेळून मी त्यांच्या खेळात प्रवीण झालो होतोच पण त्यामुळे मुलांच्या खेळात आपोआप कच्चा लिंबू ठरायचो. मुले(मुलगे) माझ्याशी खेळताना सहज जिंकत. गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे हे सगळे खेळ खेळताना मी नेहमीच हरायचो. ह्या खेळात एक छोटेसे रिंगण आखून त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक आडवी रेषा आखली जायची. तिथे बसून मग ज्या वस्तूने(एका वेळी गोट्या तर गोट्या अशा पद्धतीने) खेळत असू(गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे वगैरे)त्या वस्तू रिंगणात टाकायच्या.त्यापैकी एक जरी गोटी रिंगणाबाहेर गेली तरी आपला डाव गेला. मग दुसर्याने तसेच करायचे. पण जर का सर्व गोट्या रिंगणातच राहिल्या तर त्यातील एक गोटी आपला प्रतिस्पर्धी बोटाने दाखवत असे . नेमकी ती गोटी सोडून इतर कोणत्याही एकाच गोटीला आपल्या हातात असणार्या गोटीने नेम धरून मारायचे आणि त्या दोन्ही(हातातील आणि जिला मारतोय ती)गोट्या इतर दुसर्या कोणत्याही गोट्यांना स्पर्श न करता रिंगणाबाहेर घालवल्यास तो डाव जिंकता येत असे असे.पण माझा नेम कधीच लागत नसे आणि मी नेहमीच त्यात हरायचो.गोट्यांनी खेळायचे इतरही बरेच खेळ होते. आणखी एका खेळात मातीत छोटा खड्डा करून(त्याला आम्ही ’गल अथवा गील’ म्हणत असू) खेळण्याचा खेळ होता. त्याला ’गलगोप’ म्हणत. तसेच अजून एक ’कोयबा’ नावाचा खेळ होता. अजून बरेच होते पण त्यांची नावे आता विसरलो.
हे खेळ मी जरी सहजतेने हरत असायचो तरी मला त्याचे विशेष वाईट वाटायचे नाही. पण काही मुले,विशेष करून माझ्यापेक्षा थोडी मोठी मुले मला त्यांच्यात खेळायला घ्यायची नाहीत त्याचे मात्र वाईट वाटायचे. मी मुलींच्यात जास्त खेळायचो म्हणून मला काही मुलींप्रमाणे ही मुले देखिल "मुलीत मुलगा लांबोडा,भाजून खातो कोंबडा" असे चिडवायचे. ह्या चिडवण्याचे मला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे हळूहळू माझे मुलींच्यातले खेळणे कमी होऊन मी मग मुलांचे असे मानले गेले क्रिकेट, आबादुबी, लगोरी, भोवरेबाजी, तारघुसणी(हा खेळ केवळ पावसाळ्यातच खेळता येत असे) हुतुतू वगैरे खेळ खेळायला लागलो.अर्थात ह्यात मी लिमलोणचाच असायचो. हल्लीच्या भाषेत ’चिरकुट’(अहो ऑर्कुट नव्हे हो)!
माझ्या अजून एक लक्षात आले की मोठी मुले आपापसात काही तरी सतत कुजबुजत असत पण मी त्यांच्या जवळ गेलो की ती गप्प बसत किंवा विषय बदलत. असे बर्याच वेळा होत असे. "तुम्ही काय बोलता ते मलाही सांगा ना?" असे मी म्हटले की ते मला नेहमी "तू लहान आहेस अजून. तुला कळणार नाही!" असे म्हणायचे. मग मी खट्टू होत असे. खरे तर आता मी पाचवीत गेलो होतो म्हणजे तसा लहान नव्हतो; पण ह्या मुलांच्या लेखी मी लहानच होतो. मग एक दिवशी मी हट्टच धरला. त्यांना म्हटले, " मी आता लहान नाही. तुम्ही काय बोलता ते मलाही सांगा!"
त्यावर बरेच आढेवेढे घेत एकाने सांगितले,"तू मोठा झालास ना? मग सारखा त्या मुलींच्यात का खेळतोस?"
मग त्यावर माझे उत्तर असे होते, "लांब केस आणि कपड्यातला फरक सोडला तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? आणि का नाही खेळायचे त्यांच्याशी? मला आवडते. ते खेळही आवडतात म्हणून मी खेळतो."
त्यांनी एकमेकांकडे हसून पाहिले आणि त्यातला एकजण म्हणाला, "जा आता! म्हणूनच म्हटले की तू अजून लहान आहेस!"
नेहमीप्रमाणेच मी खट्टू झालो पण हे सारखे सारखे असे का बोलतात? हे जाणून घ्यायचेच असे ठरवले आणि त्यांच्या खनपटीस बसलो. मी म्हटले,"आज जर तुम्ही मला सांगितले नाही तर मी माझ्या आणि तुमच्या आईबाबांना तुमचे नाव सांगेन!"
ह्यावर ते सगळे हसायला लागले. पण मग त्यातल्या एकाने मला विश्वासात घेत "मी सांगितले असे सांगणार नसशील तर" ह्या अटीवर माझ्या कानात सांगितले.त्याने जे सांगितले ते सगळे नीटसे कळले नाही पण काही तरी विचित्र मात्र वाटले. मग मी पुन्हा खोदून खोदून त्यांना विचारल्यावर त्यांनी मला ते ’गुपित’(मुलगा आणि मुलीतला शारीरिक भेद) सांगितले. ते ऐकून माझ्या भावविश्वाला प्रचंड तडा गेला होता तरी ते तसे असेलच हे मानण्याची माझी अजिबात मानसिक तयारी नव्हती.
"पण मग हे लोक इतक्या आत्मविश्वासाने कसे सांगतात?" हा प्रश्न काही मला स्वस्थ बसू देईना. आता ह्याचा काही तरी सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे हे माझ्या मनाने घेतले. पण कसे? ते मात्र कळेना.
एक दिवस असाच मी खेळत असताना माझ्याबरोबरची एक मुलगी जरा आडोशाला गेली. ती तिथे काय करते आहे हे लक्षात येताच माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला. आपल्याला त्या मुलांनी जे काही सांगितले त्याची आता शहानिशा करता येईल असे वाटून त्याच ओघात मी तिच्या दिशेने जायला लागलो. हे तिच्या लक्षात आले आणि ती आपले कपडे सावरीत आणि रडत रडत पळाली. ती अशी का गेली ते मला काही कळले नाही म्हणून मी तिला "अग थांब! थांब!" असे म्हणत चार पावले तिच्या मागे गेलो. पण ती केव्हाच पसार झाली. "जाऊ दे झालं!" असा विचार करून मी पुन्हा खेळात गुंतलो.
ती मुलगी थेट तिच्या घरी गेली आणि तिने माझी तक्रार तिच्या आईकडे केली.तिची आई तिला घेऊन माझ्या आईकडे आली आणि झालेला प्रकार तिने माझ्या आईला सांगितला. दूरून मी हे पाहत होतो.मी नेमके काय चुकीचे केले हे मला समजत नव्हते त्यामुळे मी तसा बिनधास्तच होतो. पण आईने जेव्हा मला हाक मारून बोलावले तेव्हा तिच्या आवाजातली ’जरब’ जाणवून हे लक्षात आले की आपले काही तरी चुकले असावे आणि आता मार खावा लागणार. एरवी आईने हाक मारल्याबरोबर लगेच घरी परतणारा मी आज मात्र तिथेच उभा राहून पुढे काय घडणार आहे त्याचा अदमास घेत होतो. आतापर्यंत आईच्या हातात छडी आलेली होती आणि ती माझ्याच दिशेने चाल करून येत होती हे पाहिले मात्र, मी तिथून पोबारा केला. लगेच माझ्या आईने तिथे असलेल्या इतर मुलांना आणि माझ्या दोघा भावांना मला पकडून आणायला पाठवले. ह्या सगळ्यांना मी बराच वेळ गुंगारा दिला पण अखेरीस त्यांच्या तावडीत सापडलो आणि मग त्या सगळ्यांनी मिळून मला आईसमोर नेऊन उभे केले.
आधीच आईचा राग धुमसत होता त्यात मी पळून जाऊन निष्कारण तेलच ओतले होते. तिच्या समोर मला उभे करताच तिने मला बेदम मारझोड करायला सुरुवात केली. मी फटके वाचवायचा प्रयत्न करत होतो पण आईचा नेम अजिबात चुकत नव्हता. सटासट फटके बसत होते आणि मी अगदी लोळागोळा होईपर्यंत आई मला मारत होती. तोंडाने ती मला आणि स्वत:लाही दोष देत होती. "हेच संस्कार केले काय तुझ्यावर? आता मला तोंड दाखवायला कुठे जागा ठेवली नाहीस! माझंच नशीब फुटकं म्हणून तुझ्यासारखा दिवटा माझ्या पोटी आला!" असे म्हणत ती अजून जोरात फटके मारत होती.(हा मार खातानाही मला माझे (चुकले तर खरेच)नेमके काय चुकले हे कळत नव्हते; पण ते विचारण्याची माझी हिंमत नव्हती ) शेवटी आजूबाजूला जमलेल्या आयाबायांना माझी दया आली आणि त्यांनी माझ्या आईच्या हातातली छडी काढून घेतली आणि त्या तिला घरात घेऊन गेल्या. त्या दिवशी सबंध दिवसभर मला जेवायला मिळाले नाही आणि माझ्याबरोबर आईने स्वत:ला देखिल तीच शिक्षा करून घेतली.
ह्या सर्व प्रसंगामुळे माझ्या मनात स्त्रियांविषयी प्रचंड भिती आणि अविश्वास निर्माण झाला. त्याचेच प्रत्यंतर म्हणजे माझे मुलींच्यातले खेळणे अजिबात बंद झाले. इतकेच नाही तर आई,बहीण आणि शाळेतल्या शिक्षिका सोडल्यास(त्याही नाईलाज म्हणून) अन्य कोणत्याही, अगदी काकी,मामी,मावशी वगैरे नात्यातल्या इतर स्त्रियांशी देखिल मी बोलायला प्रचंड घाबरत असे.इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे मान वर करून बघण्याचीही हिंमत मी करत नसे.स्त्रियांबद्दल एक प्रकारची अढीच माझ्या मनात घर करून बसली.पुढे जशी अक्कल आली तेव्हा मला कळले की मी किती ’गंभीर’ चूक केली होती आणि त्यावरची आईने केलेली शिक्षा किती योग्य होती ते.
अर्थात झाले ते एका दृष्टीने चांगलेच झाले. कारण आईच्या ह्या शिस्तीनेच मी वेळोवेळी सावरलोय.मी स्त्रियांशी बोलत नव्हतो किंवा त्यांच्याकडे नजर वर करून पाहण्याची हिंमत करू शकत नव्हतो तरीही स्त्री-पुरुषांमधले नैसर्गिक आकर्षण मला स्वस्थ बसू देत नव्हते.परंतू ह्या झालेल्या प्रसंगाचा एक फायदा नेहमीच झाला की एखाद्या स्त्रीबद्दल मनात आकर्षण उत्पन्न झालेच तर मला सर्वप्रथम माझ्या आईचा ’त्या’ वेळचा तो क्रुद्ध चेहरा नजरेसमोर दिसत असे आणि इतर विचारांना बाजूला सारून साहजिकच माझे मन ताळ्यावर येत असे. मी माझे लग्न ठरेपर्यंत कोणत्याही स्त्रीच्या वाटेला गेलो नाही(अर्थात तसा प्रसंग कोणत्याही स्त्रीने देखिल येऊ दिला नाही हेही तितकेच खरे)आणि आज माझी पत्नी हयात नसतानाही त्याचे पालन करू शकतोय ह्याचे कारण त्यावेळी झालेली ती शिक्षाच होय. त्या विशिष्ट प्रसंगी मला आईचा खूप राग आला होता पण आज मागे वळून पाहताना नक्कीच जाणवते की तिच्या त्या शिक्षेनेच मी नेहमी सन्मार्गावर राहिलोय.
पुरुषाच्या उच्छृंखतेला आवर घालण्याची शक्ती केवळ स्त्री मध्येच आहे. मग ती आई,बहीण,पत्नी अथवा इतर कोणत्याही स्वरूपातली असो.

१८ जानेवारी, २००८
बालपणीचा काळ सुखाचा! ३
माझी मोठी बहीण माझ्या पेक्षा माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. मला पुरती समज येईपर्यंत मी तिचे शेपूट म्हणून नेहमी तिच्या मागे-मागे असायचो. ती ही मला तिच्या बरोबर खेळायला घेऊन जायची. तिला लहान व्हायला लागलेले फ्रॉक मी एकदोनदा घालून गेल्याचेही मला अजून आठवतेय. मला कपडे घालणे, पावडर लावणे वगैरे माझा नट्टापट्टाही ती मोठ्या आवडीने करायची. त्यावेळी खेळले जाणारे मुलींचे खेळ म्हणजे सागरगोटे, काचा-पाणी, दोरीवरच्या उड्या, मातीत घरं आखून आणि लंगडी घालून खेळला जाणारा खेळ(नाव आठवत नाही पण त्यात दोन्ही पाय टेकवण्यासाठी एक मामाचे घर असायचे), लंगडी, खेचाखेची, पकडापकडी,डबा ऐसपैस, मागे रुमाल लपवणे वगैरे वगैरे अजून बरेच खेळ असत.
त्यात अजून भर म्हणजे मंगळागौरीला आणि हादग्यात खेळले जाणारे फुगडी, बसफुगडी, रिंगण, खुर्ची का मिर्ची, कोंबडा, पकवा, ऐलमा-पैलमा वगैरे बरेच खेळ होते. आता तितकेसे नीट आठवतही नाही.ह्या सगळ्यामुळे नाही म्हटले तरी मी थोडा बायल्या झालो होतो. हळूहळू मी देखिल हे खेळायला लागलो. त्यात प्रावीण्य मिळवायला लागलो. माझ्या बरोबर हे खेळणार्या सगळ्या मुलीच असत. ह्या खेळाच्या अनुषंगाने येणारे शब्द आणि गाणी मला मुखोद्गत होऊ लागली.
त्यातले एक गाणे थोडेसे आठवतेय ते खेचाखेची करण्यासाठी दोन संघ बनवण्यासाठी गायले जाणारे गाणे.....आधी त्यातल्या त्यात मोठ्या असणार्या मुली एकमेकींचे हात असे उंच पकडून त्याची कमान करून उभ्या राहत आणि बाकीच्या इतरांनी त्या कमानी खालून जात राहायचे. मग त्या दोघीजणी ते गाणं म्हणत....
संत्रं लिंबू पैशा पैशाला
शाळेतल्या मुली आल्या शिकायला....असेच काहीसे होते. आता नीटसे आठवत नाहीये.पुढे......
खाऊन खाऊन खोकला झाला
पीं पीं पिठलं.......असे म्हणून झटकन दोन्ही हात खाली करून त्यावेळी कुणाला तरी त्यात पकडले जायचे. मग तिला काही सांकेतिक शब्द विचारले जाऊन त्यातला एक शब्द निवडायला सांगितला जाई. उदा. दोन फुलांची नावे... गुलाब आणि मोगरा. खरे तर ही दोन संघांची नावे असत पण आधी उघडपणे सांगितली जात नसत त्यामुळे आयत्या वेळी जो शब्द निवडला जायचा त्या संघात तिला जावे लागे. असे पुन:पुन्हा करून दोन संघ तयार होत आणि त्यांच्यात मग खेचाखेची व्हायची. त्यात मी ज्या संघात असायचो तोच संघ सहसा जिंकत असे कारण शेवटी काही झाले तरी माझ्यात निदान त्या मुलींपेक्षा जास्त शक्ती असायची. अर्थात मी बहुदा माझ्या बहिणीच्या संघातच असायचो. ते कसे ते एक गुपित आहे. ती मला नेत्रपल्लवीने सांगत असे हे गुपित मात्र मी तुम्हाला अजिबात सांगणार नाहीये.
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा......एकमेकींचे हात धरून आणि रिंगण करून म्हटले जाणारे असे बरेच काहीसे लांबलचक गाणे होते. त्यावेळी माझेही ते पाठ होते पण आता अधले मधले थोडे फार आठवते. पण सलगपणे असे काही आठवत नाही.
माझी बहीण रांगोळ्या पण खूपच छान काढायची. दिवाळीत तिला प्रचंड मागणी असे. आमची वाडी खूप मोठी होती आणि प्रत्येकाच्या घरापुढे प्रशस्त जागा असायची. मग तिथे झाडून, स्वच्छ सारवून वगैरे त्यावर ठिपक्यांची रांगोळी काढली जायची. दिवाळीचे वेध लागले की मग प्रथम रांगोळीची पुस्तके शोधली जात; नंतर ठिपके पाडण्यासाठी भोके पाडलेले कागद बनवले जात. ८-१० ठिपक्यांपासून ४०-५० ठिपक्यांपर्यंत असे कागद आखून आणि उदबत्तीने त्यात भोके पाडून हे कागद तयार करावे लागत. बहिणीचे बघून बघून पुढे पुढे मी देखिल तिला ह्यात मदत करायला लागलो.रांगोळी काढण्यात माझा हात विशेष चालत नसायचा पण माझी बहीण खूपच झटपट आणि तरीही उत्कृष्ट रांगोळी काढत असे. जवळ जवळ १०-१५ घरांपुढे ती रांगोळ्या काढायची. मी रंग भरताना तिला मदत करत असे. रंगसंगती तीच ठरवत असे. तिच्या त्या रंगसंगतीवर सगळेच खूश असत. कधी कधी तिच्याकडून मी एखाद्या घरची छोटी रांगोळी स्वतंत्रपणे रंगवायला घ्यायचो आणि माझ्या मनाप्रमाणे रंग भरायचो. माझी रंगांची आवडही जरा 'हटके'च होती. त्यामुळे तशी रंगसंगती पाहिली की सगळेजण फिदीफिदी हसत असत. मग माझी बहीण येऊन त्यात काही जुजबी सुधारणा करायची आणि तीच रंगसंगती एकदम मस्त दिसायला लागायची. ती नजर मला कधीच आली नाही. आजपर्यंत मला आयुष्यात कधीच न जमलेले हे एक काम आहे.
तसे बघायला गेले तर मी मुलांचेही खेळ खेळत होतो. गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे,खो-खो, लंगडी, पकडापकडी आणि असे अनेक खेळही खेळत असायचो पण जास्त करून बायकी खेळच खेळायचो आणि मुलींच्यातच असायचो. जिथे सहज जिंकता येते तिथेच जास्त रमायचो. मुलगा आणि मुलगी ह्यांच्या केश आणि वेष ह्यामध्ये असलेला दृश्य फरक सोडला तर इतर काही फरक असतो हे मला अजिबात माहीत नव्हते. आज ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण ही त्यावेळची वस्तुस्थिती होती. ह्यामुळेच माझ्या संपूर्ण आयुष्यावर कायमचा परिणाम घडवणारी एक घटना माझ्या भाबडेपणामुळे त्यावेळी घडली त्याबद्दल पुढील वेळी.

२१ डिसेंबर, २००७
बालपणीचा काळ सुखाचा! २
माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. लहानपणी खूप बडबड्या होता. सतत गाणी म्हणायचा. गोष्टी सांगायचा. नकला करायचा. पण साधारण पाच सहा वर्षांचा असेपर्यंत खूप बोबडा होता. त्याच्याबद्दलची आई-वडिलांनी सांगितलेली ही एक आठवण.
माझ्या मामाकडे त्या काळात फोनो(चावीचा रेकॉर्ड प्लेयर आणि त्याला पुढे लावलेला भोंगा) होता. त्यावर रेकॉर्ड्स लावल्या की त्या आम्ही ऐकत असू. ह्यातून येणार्या आवाजाचा मालक (गायक-गायिका) ह्यात आतमध्ये कसे शिरतात? बरे शिरतात तर शिरतात पण शिरताना दिसत कसे नाहीत आणि इतक्या छोट्याश्या जागेत मावतात कसे? असले प्रश्न नेहमी मला सतावायचे. पण माझा भाऊ(त्याला मी दादा म्हणतो) मात्र त्या गाण्यांचे मोठ्या भक्तीने श्रवण करायचा आणि घरी आला की मग आमच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर बसून ती गाणी तो आपल्या बोबड्या बोलीत जोरजोरात ऐकवायचा. ऐकणार्यांना खूप गंमत वाटायची कारण बहुतेक सगळेच शब्द उलटे पालटे झालेले असत. नेमके गाणे काय तेही समजत नसे.
एखाद्याने हे गाणे तू कुठे ऐकलेस असे विचारले की लगेच तो सांगायचा, "मोघुमामातले तवा दाद्दा होता ना!" (मधुमामाकडे तवा (रेकॉर्ड) लागला होता ना!) गाणे काय तर .... अले नुत्ता हाताय हाताय , तय तय लादे तवंदी तायला तिताय तिताय मग बर्याच प्रयत्नांनी आईच्या लक्षात यायचे ते गाणे...... अरे नाखवा हाकार हाकार, चल चल राधे करवंदी खायला चिकार चिकार... असे काहीसे ते गाणे होते. ह्याच्या आधी आणि पुढे काय होते ते आता आठवत नाही. पण त्याची टकळी चालूच असायची.
माझ्या लहानपणी आमच्या आजूबाजूला भरपूर वनसंपदा होती. त्यामुळे खूप सारी फुलपाखरे, चतुर, मधमाशा वगैरे असे उडणारे कीटक दिसत तसे लाल मुंग्या,काळ्या मुंग्या,डोंगळे,मुंगळे वगैरे वगैरेंचीही रेलचेल होती. ह्या माझ्या दादाला डोंगळे खायची सवय लागली. कशी ती माहीत नाही; पण दिसला डोंगळा की तो उचलून लगेच तोंडात टाकायचा. चावण्याची भिती वगैरे काहीच नव्हती. ही सवय मोडण्यासाठी आईने जंग जंग पछाडले पण तिचा डोळा चुकवून तो आपला कार्यभाग साधून घेत असे.मात्र एकदा एक डोंगळा त्याच्या जिभेला असा काही करकचून चावला की त्या दिवसापासून त्याची ती सवय आपोआप सुटली.
माझ्या धाकट्या भावाचे पराक्रम तर काही विचित्र होते. हे किस्से तो तीन-चार वर्षांचा असतानाचे आहेत. माझ्या वडिलांना तपकिरीचे व्यसन होते. ती तपकीरही साधीसुधी अथवा सुगंधी तपकीर नसायची. त्या काळात ’मंगलोरी’ ह्या नावाने मिळणारी अती कडक(स्ट्रॉंग) अशी ती तपकीर असायची. तपकिरीची डबी सदैव त्यांच्याजवळ असायची. थोड्या थोड्या वेळाने त्यातली चिमूटभर तपकीर ते नाकात कोंबत. हे सगळे माझा धाकटा भाऊ नेहमी पाहत असे. एकदा वडील काही कामात असताना त्यांचे लक्ष चुकवून ह्या माझ्या भावाने तपकिरीची डबी पळवली आणि आडोशाला जाऊन ती डबी उघडून त्यातील सगळी तपकीर आपल्या नाकात ओतली.जे व्हायचे तेच झाले. फटाफट शिंका यायला लागल्या आणि तो घाबराघुबरा झाला. आई-वडील आपापली कामे सोडून धावत पळत त्याच्याकडे गेले आणि त्याची सुश्रुषा करायला लागले. त्याला ह्या शिंका अचानक कशा यायला लागल्या हे आधी कळलेच नाही पण बाजूलाच पडलेली तपकिरीची डबी पाहिली आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. त्याचे वय अतिशय लहान असल्यामुळे त्याला ओरडून काहीच उपयोग नव्हता म्हणून आईने वडिलांनाच दोन शब्द सुनावले. पण त्या परिस्थितीत वडील शांत राहिले म्हणून पुढे बोलणे वाढले नाही.
ह्यानंतरचा पराक्रम तर काही और आहे. त्या काळात कोळसा आणि रॉकेल ह्यांचा वापर जळणासाठी करायचे. आमच्याकडे वीज नव्हती त्यामुळे चिमण्या-कंदील हे रॉकेलचे दिवे असत. तसेच रॉकेलचे स्टोव्ह असत. त्या सर्वांमध्ये रॉकेल भरण्याचे काम रोज चालत असे. हा माझा धाकटा भाऊ आईच्या अवतीभवतीच असायचा. डब्यातनं रॉकेल बाटलीत काढणे आणि बाटलीतनं ते स्टोव्ह,दिव्यांमध्ये भरणे ह्या गोष्टीचे रोज त्याचे निरीक्षण चाले. रॉकेलचा डबा,बाटली वगैरे सामान एरवी स्वयंपाकघरात एका कोपर्यात ठेवलेले असे. एक दिवस आई बाहेरच्या खोलीत कचरा काढत असताना हे महाशय स्वयंपाकघरात खेळत होते. खेळता खेळता त्याचे लक्ष त्या रॉकेलच्या बाटलीकडे गेले. ती अर्धी भरलेली होती. त्याने ती तशीच उचलली आणि तोंडाला लावली. त्यातले बरेच रॉकेल त्याच्या नाकातही गेले आणि जोराचा ठसका लागला. त्याचा तो विचित्र आवाज ऐकून आई धावत आली आणि तिने ते पाहिले मात्र. तिने कपाळाला हात मारून घेतला. पटापट त्याला तिथून उचलून बाहेर आणले. मिठाचे पाणी प्यायला लावून ओकून सगळे पोटातले रॉकेल बाहेर काढले तेव्हा कुठे तो नीट श्वास घेऊ लागला. आई मनातनं घाबरली होती पण प्रसंगावधान राखून तिने ते सगळे सोपस्कार केले म्हणून बरे नाहीतर फार गंभीर प्रसंग ओढवला असता.त्यानंतर आई त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेली आणि झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. डॉक्टरांनी त्याला नीट तपासले आणि काही काळजीचे कारण नाही असे सांगितले तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. डॉक्टरांनी माझ्या आईच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.त्यानंतर आई प्रत्येक गोष्टीत काटेकोर झाली. अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी त्याच्या हाती लागू नये म्हणून वर फळीवर ठेवायला सुरुवात केली.

२० ऑक्टोबर, २००७
बकुळ!
सद्या मी जिथे राहतो त्या विभागात एक बकुळाचे झाड आहे.ते झाड एका इमारतीच्या परिसरात लावलेले आहे;पण त्याच्या बर्याच फांद्या रस्त्यावरदेखील पसरलेल्या असल्यामुळे सकाळी सकाळी तिथे फुलांचा सडा पडलेला दिसतो.हमरस्ता असल्यामुळे वाहतूक सारखी चालूच असते आणि त्यामुळेच ह्या फुलांकडे म्हणावे तसे लक्ष लोकांचे जात नाही. काही तुरळक ज्येष्ठ नागरिक पहाटे -पहाटे ही फुले वेचताना दिसतात हे अलाहिदा! ह्या फुलांवरूनच माझ्या बालपणीचा बकुळवृक्ष आणि त्यासंबंधीच्या काही आठवणी जाग्या झाल्या.
आम्ही ज्या वाडीत राहत होतो त्या वाडीची रचना साधारण अशी होती की वाडीत शिरताना डाव्या बाजूला मालकांचा बैठा बंगला आणि त्याला जोडूनच एक चाळ.पुढे आल्यावर उजव्या बाजूला मालकांची वाडी(ज्यात फळझाडे-फुलझाडे आणि एक नेहमीच तुडुंब भरलेली विहीर होती). डाव्या हाताला एक छोटीशी झोपडी. अजून पुढे आले की डाव्या हाताला अजून दोन चाळी (एक लांबलचक तर दुसरी टुमदार बंगल्याच्या आकारातली) आणि उजवीकडे अजून एक चाळ(ह्याच चाळीतल्या पहिल्या खोलीत माझे जवळपास ३०-३२ वर्षे आयुष्य गेले) आणि त्याच्या समोर मोठे अंगण. हे अंगण आमची चाळ आणि मालकांची फळबाग ह्यांच्या मधोमध होते. जणू दोघांच्या हद्दी दर्शविणारे.
ह्याच अंगणात नेमके आमच्या(पहिली खोली) आणि शेजार्यांच्या(दुसरी खोली) दारासमोर एक दुशाखी बकुळवृक्ष होता. ह्या दुशाखेमुळे बुंध्यात एक छानशी बेचकीसारखी जागा दोन खोडांच्या(शाखा) मध्ये निर्माण झाली होती. त्याचा आम्ही सिंहासनासारखा उपयोग करत असू. आमच्या दारासमोर जी शाखा होती ती थोडी वाकडी पसरून मग वर आभाळाच्या दिशेने गेलेली होती तर दुसरी शाखा किंचित तिरकी होऊन आभाळाच्या दिशेने झेपावली होती.ह्या वाकड्या फांदीवर चढून खाली अंगणात उड्या मारणे, फांदीला लोंबकळणे,झोपाळा बांधणे आणि पकडापकडीच्या खेळात सारखे माकडासारखे खालीवर करत राहणे हा आमचा नित्याचा परिपाठ होऊन बसलेला होता.
झाडाला जेव्हा फुले लगडायची तेव्हाचा घमघमाट तर काही विचारू नका. नुकताच बहर आलेला असला की खाली पडलेली फुले कमी प्रमाणात असत. मग ती वेचताना स्पर्धा लागत असे. कंदिलाच्या प्रकाशात कधी मध्यरात्री तर कधी पहाटेच्या संधी प्रकाशात फुले वेचण्याचा आनंद काही वेगळाच असे. ऐन बहराच्या काळात तर सगळा परिसरच सुगंधमय होऊन जात असे. आम्हा छोट्या मुलामुलींची तर कोण जास्त फुले जमवतेय ह्याची स्पर्धा लागत असे.वर फुलांनी लगडलेले झाड आणि खाली गालिच्यासारखा पसरलेला त्यांचा सडा! एखाद्या हवेच्या झुळुकीनेही अंगावर वर्षाव व्हायचा फुलांचा. साक्षात सुगंधाने न्हाऊन निघत असू आम्ही. किती वेचू आणि किती नको असे होऊन जात असे. मुलींच्या परकराचे-फ्रॉकचे ओचे आणि आम्हा मुलांचे सदर्या-चड्ड्यांचे खिसे-पिशव्या भरल्या तरीही फुले जमवण्याचा सोस कमी होत नसे.खरे तर आम्हा मुलांना(मुलगे) त्याची काय जरूर होती? पण तो सुवासच असा होता की मनाला पिसे करत असे आणि आम्ही यंत्रवत ती फुले गोळा करत असू. नंतर त्या फुलांचे गजरे करून आपल्या आईला-बहिणीला देण्यात एक वेगळेच समाधान होते. कधीमधी आम्ही मुले ही फुले खातही असू. ताजी फुले गोड आणि चविष्ट लागत. ह्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ही फुले सुकली तरी ह्यांचा सुगंध जात नाही. त्यामुळे अशा फुलांचा सुगंधी तेल बनवायला देखिल उपयोग होत असे. अशा प्रकारचे सुगंधी तेल दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला उपयोगी पडत असे.
फुलांनंतरचा मोसम हा बकुळीच्या फळांचा! तसे हे फळ अतिशय लहानसे( साधारण मध्यम आकाराच्या बोराएवढेच) पण चवीला अतिशय मधुर! फळ कच्चे असतानाचा ह्याचा पोपटी-हिरवा रंग जितका आकर्षक तितकाच पिकलेल्या बकुळाचा केशरी-लालचुटुक रंगही तोंडाला पाणी आणत असे. कच्च्या बकुळाचा उपयोग आम्ही पतंगी चिकटवण्यासाठी करत असू. ह्या कच्च्या बकुळात असलेला चिकटपणा कोणत्याही इतर गोंदांइतकाच प्रभावी आहे.पिकलेली बकुळफळे काढण्यासाठी बरेच जण झाडावर अगदी वरपर्यंत चढत;पण आम्हाला घरातून आईची सक्त ताकीद असे की झाडावर चढायचे नाही त्यामुळे विरस होत असे. कधीमधी आई दुपारची वामकुक्षी घेत असण्याचा फायदा घेऊन आम्हा तिघा भावंडांपैकी कुणी झाडावर चढलेच तरी खाली राहिलेल्यांचा गोंगाट(वर चढलेल्याला "अरे तिकडे तिकडे! नाही नाही जरा बाजूला! हां बरोबर!" वगैरे ओरडून सांगणे) ऐकून आईला चटकन अंदाज येत असे(कारण अगदी दारातच होते ना झाड! काय करणार!) आणि मग ती लगेच अंगणात येऊन आम्हाला खाली उतरायला भाग पाडत असे. अशा वेळी खूप विरस होत असे.पण काय करणार! आईच्या पुढे बोलणे म्हणजे सगळ्यांसमोर बोलणी आणि मार खावा लागेल आणि आपलीच इतर सवंगड्यांसमोर इज्जत जाईल म्हणून गप्प बसणे भाग असे. हा बकुळ वृक्ष आमच्या दारात होता ह्याचा नेहमीच अभिमान वाटत असे मात्र अशा वेळी तो आपल्याच दारात असण्याचा राग येत असे.
असेच एकदा पकडापकडी खेळताना आमच्यातलाच एक मुलगा वाकड्या फांदीवरून धप्पकन खाली पडला आणि त्याचा पाय तुटला. आणि मग तर आईची करडी नजर आमचा सतत पाठलाग करत असे. आम्हाला तिने निक्षून सांगितले की हे असले अघोरी खेळ खेळत जाऊ नका(आता झाडावर चढण्याचा आणि त्यावरून खाली उड्या मारण्याचा आनंद आईला कसा कळणार? पण आमची प्राज्ञा नव्हती आईपुढे बोलायची ). त्यामुळे मग आम्ही एक नवीनच खेळ सुरू केला राजा-राजा खेळण्याचा. बहुधा माझा मोठा भाऊ राजा होत असे आणि त्या बकुळीच्या बुंध्याच्या बेचक्यांत (सिंहासनावर) बसून राज्यकारभार करत असे. आमच्या वाडीत खूप मुले होती आणि आमचे कुटुंब वाडीतील एकमेव ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे नकळतपणे आमच्याकडे नेतृत्व आले होते. तसे आम्ही अभ्यासात बऱ्यापैकी होतो;पण उगीचच लोक आम्हाला हुशार समजत. असो. मुद्दा तो नाही. तर अशा भरपूर लोकसंख्येमुळे आम्ही खेळणाऱ्या मुलांचे दोन तट पाडून हा राजा-राजाचा खेळ खेळत असू. मग एकमेकांबरोबर युद्ध करणे,युद्धातील बंद्यांचा न्यायनिवाडा करणे,जनतेच्या तक्रारी ऐकणे आणि न्याय करणे वगैरे खेळ होत असे. ह्या सर्व खेळावर कुठे तरी चंद्रगुप्त-चाणक्य ह्यांच्या कथेचा प्रभाव असायचा.
अशा ह्या बहरणार्या आणि आमची आयुष्ये समृद्ध करणार्या बकुळवृक्षावर एक दिवस कु्र्हाड पडली. आमच्या समोर असणारी मालकांची फळबाग तर कधीच उध्वस्त करून त्या जागी एक इमारत उभी राहिली होती आणि आता पाळी होती बकुळवृक्षाची आणि त्याच बरोबरीने आमचीही चाळ पाडून तिथे उभे राहणार्या टोलेजंग इमारतीची. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या आमच्या सख्यावर,ज्याच्या अंगा-खांद्यावर बागडलो त्याच्यावर(काय उपमा देऊ? सुचतही नाही! आज इतक्या वर्षांनी ती आठवण लिहितानाही जीव कासावीस होतोय) चालणार्या करवती आणि कु्र्हाडी बघून आमच्या मनात विलक्षण कालवाकालव झाली. त्याचे शेवटचे दर्शन घेताना हळूहळू मन पूर्व स्मृतींमध्ये गेले आणि मनाला तो विलक्षण सुगंध पुन्हा सुखावून गेला.भानावर आलो तेव्हा तो वृक्षराज केव्हाच धाराशायी झाला होता.मात्र त्याचा बुंधा म्हणजे आमचे सिंहासन अजूनही शाबूत होते. त्याने मात्र त्या करवती-कुर्हाडींनाही दाद दिली नाही. दोन करवतींची पाती तुटली आणि एका कु्र्हाडीचा दांडा तुटला तेव्हा त्या लाकूडतोड्यांनी त्याला तसेच ठेवून आपला गाशा गुंडाळला.
पुढे इमारतीचा पाया खणण्याच्या वेळीच तो बुंधा मुळासकट उपटला गेला;पण शेवटपर्यंत लढत राहण्याचा त्याचा तो संदेश आजही मी माझा आदर्श मानतो.

१५ एप्रिल, २००७
बालपणीचा काळ सुखाचा! १
माझ्या बालपणाची मला स्वत:ला आठवणारी पहिली पुसटशी आठवण म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा पहिला वाढदिवस! मी त्यावेळी साधारण ४ वर्षांचा होतो.त्या काळी आमच्या घरात विजेचे दिवे नव्हते. म्हणजे तशी वीज आधी होती(मला आठवतेय तेव्हापासून नव्हती); आमच्या घरात फक्त दोनच विजेचे गोळे(बल्ब) असत. इतरांकडे त्या व्यतिरिक्त पंखाही असे. एकदोघांकडे रेडिओही होता.विजेचे मीटर सगळ्यांसाठी एकच असे आणि सगळ्यांनी येणारे बील समान वाटे करून भरायचे असा अलिखित नियम होता.तरीही भांडणे होत. कमी वीज वापरूनही आम्हाला जास्त भुर्दंड पडत असे.म्हणून मग माझ्या वडिलांनी दरवेळेच्या भांडणांना कंटाळून स्वत:च आमच्या घरातील विजेच्या तारा कापून टाकल्या होत्या.(हे सगळे मला थोडा मोठा झाल्यावर आईकडूनच कळले.) त्यामुळे माझे अख्खे बालपण हे चिमणी आणि कंदिलाच्या प्रकाशातच गेले.
तर अशा आमच्या ह्या घरात ज्या गतकाळच्या निशाण्या होत्या त्या म्हणजे वीजगोळे धारक कमनीय दांड्या आणि अशाच त्या दोन दांड्यांना त्या दिवशी लटकवलेल्या होत्या दोन पेट्रोमॅक्सच्या बत्त्या! ते लखलखणारे दोन दिवे मला अजूनही प्रकर्षाने आठवताहेत.
त्या दिवशी आमच्याकडे बर्याच पाहुण्यांचा राबता होता. मी जात्याच अशक्त , किरकिरा आणि बुजरा असल्यामुळे एका कोपर्यात उभा होऊन ही गंमत पाहत उभा होतो. कुणाच्यात मिसळत नव्हतो. तसा माझा चेहरा बरा असावा(आई-वडील मला मोदकतोंड्या म्हणत!त्याचे काही एव्हढे विशेष नाही हो. प्रत्येक आई-वडिलांना त्यांची मुले गोंडसच दिसतात त्याला आपण तरी काय करणार?) त्यामुळे मामा-मावश्या वगैरेंना माझंही जरा कौतुक असायचे;पण मी मुलखाचा भित्रट असल्यामुळे कुणी माझ्या कडे नुसते बघितले की मी 'मायते'!(मारते... माझ्यासाठी सगळेच स्त्रीलिंगी होते) असे ओरडत रडायला सुरुवात करत असे. सगळेचजण मला मारतील अशी काहीशी सुप्त भिती माझ्या मनात दाटलेली असे. त्यामुळे कुणाकडून कौतुक करून घेण्याचे माझ्या नशिबात नसावे.
त्या दिवशी माझ्या भावाभोवती अक्षरश: खेळण्यांचा सडा पडला होता. तसेच चांदीची भांडी,रंगीबेरंगी कपडे,दुपटी आणि बरेच काही त्याच्यासाठी येणार्या नातेवाईंकांनी आणलेले होते. माझ्या वेळेस आमची परिस्थिती यथातथाच असल्यामुळे माझे बारसे किंवा वाढदिवस अशा तर्हेने साजरा होऊ शकला नव्हता(हे ही पुढे आईकडूनच कळले) त्यामुळे ह्यावेळी सर्व नातेवाईकांनी अतिशय सढळ हाताने भेटवस्तूंचा मारा केला होता. ह्या सर्वात माझे लक्ष वेधून घेतले होते ते एका लालभडक दुमजली लाकडी बसने. मला ती बस खूपच आवडली. तसेच एक लाकडी घोडाही होता. त्या घोड्यात बसता येत होते आणि मागेपुढे झुलतादेखील येत होते. कधी एकदा पाहुणे जातात आणि मी त्यांच्याशी(खेळण्यांशी) खेळतो असे होऊन गेले होते;पण रात्र झाली तरी काही पाहुण्यांची वर्दळ थांबत नव्हती.
सरतेशेवटी एकेक करत सगळेजण जेव्हा गेले तेव्हा मी चटकन उडी मारून त्या घोड्यात(हो! मध्ये बसायला गादी आणि टेकायला पाठ आणि दोन्ही बाजूला दोन रंगीबेरंगी तोंडे असलेला घोडा होता तो-- हल्लीच्या झुलत्या(रॉकींग चेअर) खुर्चीसारखा) ऐटीत बसलो आणि आणि घोडा चालवता चालवता कधी झोपलो ते कळलेच नाही.

८ एप्रिल, २००७
मित्र!
नक्की आठवत नाही; पण मी बहुधा तिसरीत असतानाची ही गोष्ट आहे.
माझ्या बालवयात मी कमालीचा रड्या,हट्टी,दुराग्रही असा सकल अवगुणसंपन्न होतो. भुकेमुळे कासावीस होणे ही तर माझी सहजप्रवृत्ती होती. सकाळी ९च्या सुमारास वडील कार्यालयात गेले की मी आईकडे 'मला जेवायला वाढ' अशी भूणभूण करायला सुरुवात करायचो. वडीलांच्या डब्यासाठी पोळी-भाजी तयार असायचीच.तेव्हा आई मला 'आधी आंघोळ करुन घे आणि मग जेव' असे सांगायची;पण मी भूकेचा इतका हळवा होतो की 'आधी जेवण आणि मगच आंघोळ' असा हट्ट धरून बसत असे.
माझी आई जितकी प्रेमळ तितकीच कर्तव्य आणि शिस्तीला कडक होती. तिला हे असले नखरे अजिबात रुचत नसत. प्रथम गोडीगुलाबीने आणि नंतर रागावून ती मला आंघोळ करून घ्यायला सांगत असे;पण माझे फक्त 'भूक भूक' हेच पालूपद चालायचे. त्याने आई बधत नाही असे पाहिले की मी मग तारस्वरात रडायला सुरुवात करायचो(पुढील आयुष्यात बहुदा मला आवाज लावायला त्याचा उपयोग झाला असावा!) आणि तिच्यावर भावनिक कुरघोडी करायचा प्रयत्न करायचो. पण आई बधायच्या ऐवजी हातात लाटणे घ्यायची की मग मी पळून जाऊन बाहेरच्या ओट्यावर रडत बसायचो पण आई त्याला दाद देत नसे. तिची 'आधी आंघोळ कर' ची अट कायम असायची.
माझ्या ओट्यावर जाऊन रडण्याने माझा एक फायदा असा व्हायचा की आईच्या मारापासून मी सुरक्षित असायचो आणि द्सरे म्हणजे माझ्या आकांडतांडवामुळे शेजारच्या साळकाया-माळकाया मी का रडतोय हे बघायला यायच्या. मग आईच्यात आणि त्यांच्यात संवाद होत असे. त्यातून त्यांना माझ्या रडण्याचे कारण कळायचे. त्या माझी समजूत घालायचा प्रयत्न करत पण मी बधत नसे म्हणून मग त्या आईवर भावनिक दबाव आणत आणि शेवटी त्या सगळ्यांच्या त्या दबावामुळे आई मला 'घे मेल्या! खा!' असा खास आशीर्वाद देउन जेवायला वाढत असे. मग मी अधाशासारखा खाऊन घेत असे आणि मगच आंघोळ करत असे.
जवळपास रोजच (सुट्ट्यांचे दिवस सोडून! कारण वडील त्यादिवशी घरी असत) माझा हा कार्यक्रम यशस्वी होत असे. पण एक दिवस आई देखिल हट्टालाच पेटली. कुणाच्याही दबावाला बळी न पडता तिने मला ठणकावले 'आंघोळ कर आणि मगच जेव. नाहीतर आज उपाशी राहा'!
मी आकांडतांडवाचे खूप प्रकार करून पाहिले पण आई बधली नाही. बघता बघता माझी शाळेला जाण्याची वेळ आली. माझी इतर भावंडे शहाण्यासारखी आंघोळी, जेवण उरकून शाळेत जायला निघाली देखिल आणि मी अजूनही भिकार्यासारखा दारात बसून आशाळभूतपणे आईला दया येईल अशी आस लावून बसलो होतो. शेवटी आईने मला पुन्हा एकदा 'आंघोळ कर आणि चल लवकर जेवायला. शाळा बुडवायची नाही'! असे सांगितले. पण मीही हटवादीपणे तसाच बसून होतो. शाळेची वेळ झाली आणि आता काही जेवण मिळण्याची शक्यता नाही हे लक्षात आल्यावर तशीच पुस्तक-वह्यांची पिशवी उचलली आणि रडत रडत शाळेत गेलो.
आयुष्यात पहिल्यांदाच उपाशीपोटी शाळेत गेलो असल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष नव्हते. बघता बघता मधली सुट्टी झाली. माझ्या वर्गमित्रांनी आपापले डबे उघडून खायला सुरुवात केली. मी मात्र माझ्या जागेवर भुकेल्यापोटी रडत बसलो. कुणाकडे मागणे (स्वत:च्या घरात सोडून ) स्वभावात नसल्यामुळे मी आपला मुसमुसत बसलो होतो. ते बघून माझा एक मित्र वसंत माझ्याकडे आला आणि माझ्या रडण्याचे कारण विचारू लगला. मी त्याला सकाळचा सगळा प्रकार सांगितल्यावर त्याने आपला डबा माझ्यापुढे धरला आणि मला खाण्याचा आग्रह करू लागला . एक क्षण मला त्या खाण्याचा मोह पडला पण त्यावर मात करून मी त्याला नकार दिला. त्याला खूप वाईट वाटले;पण मला दुसर्यांसमोर माझा पराभव मान्य करायचा नव्हता. मी तसाच बसून राहिलो. मधली सुट्टी संपली आणि पुन्हा शाळा सुरु झाली पण माझे लक्ष अभ्यासात लागलेच नाही.
शाळा सुटल्यावर मी घरी येत असताना वसंत पुन्हा माझ्याजवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन चालायला लागला.मला त्या स्पर्शातला स्नेह मनोमन जाणवला. आम्ही दोघे अबोल अवस्थेत घराजवळ आलो. माझ्या घराच्या जवळच ह्या माझ्या मित्राच्या वडीलांचे चहा-बिस्किटांचे छोटेसे उपहारगृह होते. तिथे पोचल्या पोचल्या त्याने मला बळे बळे आत नेले आणि आपल्या वडीलांना मी सकाळपासून उपाशी असल्याचे सांगितले. त्यांनाही हे ऐकून वाईट वाटले आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी मला तिथे बसवून स्वत:च्या देखरेखीखाली चहा-बिस्किटे खायला लावली. हे सर्व चालू असताना माझे लक्ष अचानक वसंतकडे गेले आणि त्याच्या चेहर्यावरचे ते तृप्ततेचे भाव बघितले आणि मी त्याच्याकडे बघून स्मितहास्य केले. माझ्या चेहर्यावर पुन्हा हास्य फुललेले पाहून त्या पिता-पुत्रांना खूपच आनंद झाला होता. माझे खाणे संपल्यावर मग घरी जायला निघालो तेव्हा त्याच्या बाबांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि 'केव्हाही ये.आपलेच हाटेल हाय' असे सांगितले. मी मोठ्या तृप्त मनाने घराकडे निघालो.
घरी पोचलो तेव्हा आई सचिंत होऊन बाहेरच्या ओट्यावर माझी वाट पाहत बसली होती. मी दिसताच ती लगबगीने आली आणि मला घरात घेऊन गेली. तिच्या डोळ्यातले भाव बघून माझ्या लक्षात आले की तिही दिवसभर जेवलेली नाहीये. मग मी शहाण्यासारखी आंघोळ केली आणि तिच्या बरोबर दोन घास खाऊन घेतले.त्यानंतर आयुष्यात मी पुन्हा कधीही असा हट्ट केला नाही.
मित्रानो आजही वसंत माझा चांगला मित्र आहे. वसंत ही गोष्ट केव्हाच विसरून गेलाय पण त्याला जेव्हा जेव्हा मी भेटतो तेव्हा तेव्हा हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.माझा स्वत:चा स्वभाव चांगला नव्हता तरीही हे असे मित्र मला वेळोवेळी लाभले हे मी माझे महद्भाग्यच समजतो.

४ एप्रिल, २००७
हिम्मत!!!
त्यावेळी मी चौथीत होतो. अभ्यासात बर्यापैकी होतो. दरवर्षी नियमित पणे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात जात असे. माझा धाकटा भाऊ माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होता. तो अभ्यासात हुशार होता. तसा तो सगळ्याच गोष्टीत हुशार होता. गोट्या खेळण्यात तो त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माझ्यासारख्यांना सहज हरवत असे. त्याचा नेम अचूक असल्यामुळे गोट्या,बिल्ले,सिगरेटची पाकीटे वगैरेचा खजिनाच त्याने जिंकून गोळा केला होता.त्याचे लक्ष अभ्यासात कमी आणि खेळात जास्त असा सगळा प्रकार होता.
माझी चौथीची परीक्षा मी चांगल्या गुणानी उत्तीर्ण झालो आणि आता मला माध्यमिक शिक्षणासाठी जवळच असलेल्या दुसर्या खाजगी शाळेत प्रवेश घेण्याचे वेध लागले होते. माझा हा हुशार भाऊ मात्र पहिलीतच चक्क एका विषयात नापास झालेला होता आणि तो म्हणजे गणित विषय होता. हा निकाल बघून आम्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. कारण कोणतेही गणित तो तोंडी अगदी सहजगत्या सोडवत असे. आम्हा सगळ्यांना रोज दिवेलागण झाली की शुभंकरोती,परवचा वगैरे सगळ्या गोष्टी म्हणण्याची आई-वडिलांनी सवय लावलेली होती आणि म्हणूनच ज्याचे अडीचकी पर्यंतचे पाढे पाठ होते तो असा गणितात कसा नापास होईल हे कोडे उलगडेना. त्यातून त्याला गणितात 'शून्य भोपळा' मिळालेला होता. हे देखिल अतिशय नवल वाटण्यासारखे होते.
ह्या संबंधात माझ्या वडिलांनी त्याला विचारले तेव्हा त्याला काहीच सांगता आले नाही ;पण त्याच्याच बरोबरच्या आमच्याच वाडीतील एका मुलाने पुरवलेली माहिती गंमतीशीर होती.त्याच्या म्हणण्यानुसार हा माझा भाऊ परीक्षेच्या दिवशी शाळेत गेला होता आणि त्याच्या खिशात नेहमीप्रमाणे गोट्याही होत्या. आम्ही शाळेत नेहमीच वर्ग भरण्याआधी चांगले अर्धातास जात असू आणि तिथे आपापसात खेळत असू.तर परीक्षेच्या दिवशी तो असाच शाळेच्या मागच्या बाजूला इतर काही मुलांबरोबर गोट्या खेळत बसला. खेळताना वेळेका़ळाचे कोणतेही बंधन नसल्यामुळे त्या दिवशीच्या गणिताच्या परीक्षेला तो हजरच राहिला नाही आणि साहजिकच त्याला त्यात शून्य गुण मिळाले. हे सगळे त्याच्याही लक्षात आले नाही. त्या दिवशी त्याने घरी येताना दोन्ही खिसे भरून गोट्या जिंकून आणल्या होत्या आणि त्याच खूषीत तो बाकीचे सगळे विसरला होता.
आता प्रश्न पडला की काय करायचे? सुखासुखी एक वर्ष फूकट कसे घालवायचे? मग माझ्या वडिलांनी आमच्या हेड-मास्तरांना एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात भावाचे ते सगळे प्रताप लिहून दिलगिरी व्यक्त केली. तसेच त्याची पुन्हा एकदा गणिताची परीक्षा घेण्याची विनंती केली. ही चिठ्ठी त्यांनी मला दिली आणि सांगितले की हेड-मास्तरांना नेऊन दे म्हणून! मंडळी काय सांगू मला तर घामच फूटला पण वडिलांची अवज्ञा करणे म्हणजे मार खाणे हे माहित असल्यामुळे त्यांना नाही म्हणणे शक्यच नव्हते आणि तिथे त्या महा-भयंकर हेड-मास्तरांच्या समोर जाणे हेही अशक्य होते. मग आता काय करणार? 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा परिस्थितीत मी सापडलो होतो.
कोणताच इलाज नसल्याने मी माझ्या लहान भावाला घेऊन शाळेत गेलो. हेड-मास्तरांच्या खोलीच्या आसपास बराच वेळ रेंगाळत राहिलो पण आत जाण्याची हिम्मत होत नव्हती.हातपाय थरथरत होते. वेळ निघून चालला होता आणि ज्यासाठी आलो होतो ते काम करण्याची हिम्मतही हळूहळू कमी होत होती. आमचे दोघांचे घुटमळणे चालूच होते इतक्यात साक्षात जमदग्नीचा अवतार असे ते महा-भयंकर प्रकरण अंगावर चाल करूनच आले. आमचे तिथले ते तसे घुटमळणे त्यांच्या काक दृष्टीतून सुटणे अशक्यच होते हे आम्ही साफ विसरलो होतो.त्यांनी करड्या आवाजात प्रश्न केला. "इथे काय चाललेय तुमचे? आता शाळेला सुट्टी सुरू झालेली आहे मग इथे कसले उपद्व्याप करताय?आणि कोण तुम्ही?उत्तरादाखल मी कसेबसे त्यांच्या दिशेने बघितले आणि पुन्हा मान खाली करून त्यांच्या दिशेने हात करून ती चिठ्ठी त्यांना दिली.त्यांनी मोठ्या त्रासिक नजरेने चिठ्ठी उलगडून बघितली,वाचली आणि आम्हाला दोघांना त्यांनी आत बोलावले. मला वाटले आता बहुदा छडीचा प्रसाद मिळणार! आपले काही खरे नाही! इथून पळून जावे असा विचार मनात आलाच होता तेव्हढ्यात इतका वेळ गायब असलेला शाळेचा शिपाई नेमका टपकला आणि आता इथून सुटका नाही हे लक्षात आल्यामुळे नाईलाजाने कसायाच्या मागे जाणार्या बोकडाप्रमाणे आम्ही दोघे आत गेलो.
आत गेल्याबरोबर हेमांनी प्रथम मलाच धारेवर धरले.पण मी ह्यावर्षी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालोय आणि अमूक अमूक शाळेत ५वीत प्रवेश घेणार आहे हे ऐकून चेहेर्यावरचे करडे भाव किंचित सौम्य झाले.मग भावाची परीक्षा सुरू झाली. त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची सटासट आणि बिनचूक उत्तरे त्याने दिली आणि मग त्या जमदग्नीचे एक सौम्य रूप आम्हाला पाहायला मिळाले. लगेच त्या चिठ्ठीवर त्यांनी माझ्या वडिलांना उद्देशून 'कु. विलास वरच्या वर्गात गेला' असे दोन शब्द लिहिले आणि 'जा ! तू आता दूसरीत गेलास!' असे भावाला म्हणून चक्क मिशीतल्या मिशीत हसले!मग आम्ही दोघांनी पुढे होऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आशिर्वाद घेऊन मोठ्या आनंदात रमत-गमत घरी पोचलो.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)