माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
अभिवाचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
अभिवाचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
३१ मार्च, २०१७
५ ऑक्टोबर, २०१२
मद्रासमधला एक किस्सा!
१९७७ साली मी तीन महिन्यांसाठी मद्रासला गेलो होतो...त्याबद्दलचा सविस्तर वृत्तांत माझ्या जालनिशीवर ’मद्रास’ ह्या नावाखाली सापडेल. तर मद्रासला असतांनाचा ह एक किस्सा जरा हटके आहे..ऐका.
७ डिसेंबर, २०१०
८ नोव्हेंबर, २०१०
७ ऑक्टोबर, २०१०
नाट्यसंगीत !
माझी नाट्यसंगीताबद्दलची काही निरीक्षणं ह्यात नोंदवलेली आहेत...मी जे काही गाऊन दाखवलंय..ते मूळ स्वरूपातही उपलब्ध असल्यामुळे त्याचे विजेट्सही सोबत जोडलेले आहेत...माझ्या गाण्याऐवजी श्रोत्यांनी मूळ स्वरूपातली गाणी नीट लक्ष देऊन ऐकावीत म्हणजे मला काय म्हणायचंय ते त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचेल.
ऐका माझं निरूपण:
राम मराठे: जय शंकरा!
भरे मनात सुंदरा:प्रसाद सावकार
बसंतकी बहार आयी-जुगलबंदी: राम मराठे आणि प्रसाद सावकार
ऐका माझं निरूपण:
राम मराठे: जय शंकरा!
भरे मनात सुंदरा:प्रसाद सावकार
बसंतकी बहार आयी-जुगलबंदी: राम मराठे आणि प्रसाद सावकार
६ ऑगस्ट, २०१०
मी मार खाल्ला !
ही कहाणी साधारण ३० वर्षांपूर्वीची आहे. नेहमीप्रमाणेच कार्यालयात जायला उशीर झाला होता म्हणून ९-४७ ची चर्चगेटला जाणारी जलद गाडी कशीबशी मी मालाडहून पकडली. ही गाडी जोगेश्वरी ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान थांबणार नव्हती. त्यामुळे झटपट पोचता येणार होते.आधी दारातच लटकत होतो;पण दमादमाने जोगेश्वरीपर्यंत बराचसा आत पोचलो. गाडीला मरणाची गर्दी होती आणि त्यातच पंखे बंद होते. हे म्हणजे नेहमीसारखेच होते. म्हणजे काय की ऐन थंडीत हे पंखे अगदी सुसाट फिरतात आणि ऐन उन्हाळ्यात संप पुकारतात अगदी तसेच...... ऐकायचेय ही कहाणी..तर ऐका.
३० जुलै, २०१०
पोलिसी खाक्या !
त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.........ऐका हा अजून किस्सा.
२९ जुलै, २०१०
भीमटोला !
भीमटोला! काय जबरदस्त शब्द आहे ना! त्या शब्दातच सगळं वर्णन आलंय.
आता तो शब्द आठवायचं कारण काय म्हणाल तर....
सांगतो. नीट, सविस्तर सांगतो.
आता तो शब्द आठवायचं कारण काय म्हणाल तर....
सांगतो. नीट, सविस्तर सांगतो.
२८ जुलै, २०१०
पुनर्जन्म!
मित्रहो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन क्षेत्रात माझी पुरी हयात गेली तरीही आज मी पूर्णपणे एक सामान्य व्यक्ती म्हणून जगतोय. म्हणजे असं की जेव्हा जे करायचं ते हिरीरिने केलं,त्यात बर्याच अंशी प्राविण्यही मिळवलं; मात्र आता ते सगळं सगळं जाणीवपूर्वक विसरलोय. राहिलेत फक्त काही कडू-गोड आठवणी. त्यातलीच एक इथे सांगतोय. पाहा तुम्हाला आवडते का?
२७ जुलै, २०१०
२५ जुलै, २०१०
सामनावीर
सामनावीर ह्या माझ्या ह्या आधी लिहिलेल्या किस्स्याचे अभिवाचन ऐका. ज्यांना वाचण्याऐवजी ऐकायला आवडतं अशांच्या सोयीसाठी मी ह्यापुढे वेळोवेळी आणखी इतर किस्स्यांचे अभिवाचनही सादर करणार आहे.
३० ऑक्टोबर, २००९
संगीत चिवडामणी!
संगीत चिवडामणी...ह्या नावाच्या आधी प्रकाशित केलेल्या माझ्या एका लेखाचे हे अभिवाचन आहे. ऐकून पाहा आवडतंय का?
९ ऑगस्ट, २००९
दिल्लीवर स्वारी-१
माझ्या एका शाळकरी मित्राच्या भावाच्या लग्नाला राजस्थानला आणि पुढे केलेल्या दिल्ली दौर्यासंबंधीची कहाणी ऐका.
१ जुलै, २००९
गजलनवाज!
मराठी गजल-गायन,गजलेचा प्रचार आणि प्रसार अव्याहतपणे गेल्या ३७ वर्षांपासून करणार्या गजलनवाज भीमराव पांचाळेंशी माझी पहिली भेट साधारणपणे १२-१३ वर्षांपूर्वी झाली. ती कशी झाली, ऐकायचंय? मग ऐका इथे.
३० जून, २००९
मी एक किंचित बिरबल!
माझ्यावर अनपेक्षित ओढवलेला एक प्रसंग आणि त्यातून मी कशी सुटका करून घेतली हे ऐकायचंय? तर ऐका.
२९ जून, २००९
स्वगत!
आपली दोन मनं असतात असे म्हटले जाते. तर अशा ह्या दोन मनांचा आपापसातला संवाद म्हणजेच स्वगत...तेच सादर करतोय. ऐकून सांगा कसे वाटतंय.
१० जून, २००९
बंगलोरच्या आठवणी!
ऑफिसच्या कामानिमित्त मी १९७३ साली माझ्या दोन सहकार्यांसह बंगलोरला गेलो होतो. तिथे महिनाभर आमचे वास्तव्य होते. त्या दरम्यानच्या काही गंमतीदार आठवणी ऐका माझ्याच आवाजात.
९ जून, २००९
ऐसपैस गप्पा!
गप्पा मारायला जशा आवडतात तशाच त्या इतरांनी मारलेल्या ऐकायला आवडतात....असे जर तुमचेही असेल तर मग इथे ऐका माझ्या गप्पा. गप्पा आवडल्या/नावडल्या तरी ऐकल्यावर सांगायला विसरू नका/संकोच करू नका.
तर ऐका ह्या ऐसपैस गप्पा!
तर ऐका ह्या ऐसपैस गप्पा!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)