माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० जुलै, २०१०

पोलिसी खाक्या !

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.........ऐका हा अजून किस्सा.

४ टिप्पण्या:

शांतीसुधा म्हणाले...

अभिवाचन छानच झालंय देका. तिघांचे वेगवेगळे आवाज मस्तच जमलेत.


वरील प्रतिक्रीया कन्नड लीपी मध्ये अशी दिसते आहे.....

ಅಭಿವಾಚನ್ ಮಸ್ತಚ್ ದೆಕಾ. ತಿಘಾಂಚೆಹೀ ವೆಗವೆಗಳೆ ಆವಾಜ್ ಛಾನಚ್ ಜಮಲೆತ್.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद अपर्णा.

मनमौजी म्हणाले...

काका...पोलीसांचे आवाज खुप मस्त जमलेत...मस्त झालय अभिवाचन.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद योगेश.