माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ जुलै, २०१०

शाही खिचडी.











मंडळी मी आज एक रोजचाच पदार्थ जरा वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर करतोय...त्याचं नाव आहे शाही खिचडी. नाव वाचूनच एकदम खूश झालात ना...आता बनवून आणि मग खाऊन पाहा....अजून खूश व्हाल.

साहित्य: दोन वाट्या तांदूळ
१ वाटी मुगाची सालवाली डाळ
एक बटाटा + एक कांदा (कांदा उभा चिरलेला,बटाटा बारीक चिरलेला)
तिखट,हळद,मीठ,गोडा मसाला,एक चमचा तूप,हिंग,जिरे इत्यादि.

कृती: सर्वप्रथम एका पातेल्यात एक चमचा तुपात हिंग-जिरे-हळद युक्त फोडणी करावी.
त्यात कांदा घालून तो थोडासा लालसर परतावा. नंतर त्यात बटाटे घालून ते मिश्रण सारखे करावे.
त्यानंतर त्यात धूवून घेतलेले डाळ-तांदूळ घालावेत...हे सगळं मिश्रण एकजीव करावे. मग त्यात
चवीनुसार,तिखट,गोडा मसाला आणि मीठ घालावे. त्यानंतर त्यात जरूरीपुरते पाणी घालून शिजवावे.

अशा तर्‍हेने तयार झालेला हा पदार्थ आहे शाही खिचडी. आता, तुम्ही म्हणाल... हॅ! ह्यात शाही असं काय आहे? उगाच आपलं काहीतरी म्हणायचं झालं!
हं, मला माहीत आहे. शाही असं काही म्हटलं की तुमच्या मनात लगेच काजू,बदाम,पिस्ते,मनुका,बेदाणे  वगैरेयुक्त असे काहीसे चित्र उभे राहते. ;)
पण नाही...तुम्हाला जसे वाटते तसे हे नक्कीच नाही....ही आहे आम्हा गरीबांची शाही खिचडी  ;)
 एकदा चव घेऊन पाहाच... मग बोटे चाटत राहाल...माझी नाही हो....तुमचीच...आणि मग नक्कीच माझ्याशी सहमत व्हाल ह्याची मला खात्री आहे.
एकदा करून पाहाच आणि मग बोला....नक्कीच म्हणाल...खिचडी खावी तर ती शाही खिचडीच.

*
लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरचीही वापरू शकता...ती तशी वापरायची असेल तर उभी चिरून फोडणीतच घालावी...मस्त चरचरते आणि खिचडीला एक वेगळीच खुमारी येते.
*गोड लिंबाचं लोणचं, लसणीची चटणी आणि गोडसर दही ह्या सगळ्यांसोबत ही खिचडी खातांना अजूनच लज्जत वाढते...बघा, आपल्याला आवडते की नाही ते.  :)

११ टिप्पण्या:

सोनाली केळकर म्हणाले...

ही शाही खिचडी तर माझी ऑल टाईम फेव्हरेट आहे. उद्याच करावी म्हणत्ये.

THEPROPHET म्हणाले...

अल्टिमेट एकदम काका,
बेस्टच!
मला आवडलीय रेसिपी...आज करतो!

प्रमोद देव म्हणाले...

सोनाली आणि विद्याधर धन्यवाद.

माझी दुनिया म्हणाले...

पुढच्या वेळी करायच्या आधी आठवणीने सांगा, म्हणजे सगळेजण खायला येऊ शकू.

प्रमोद देव म्हणाले...

>>>पुढच्या वेळी करायच्या आधी आठवणीने सांगा, म्हणजे सगळेजण खायला येऊ शकू.
हे म्हणजे "ये रे बैला, मला शिंगं मार" म्हणण्यासारखे आहे. :D
अजिबात सांगणार नाही. ;)

मी रेश्मा म्हणाले...

तोंडाला पाणी सुटले काका मस्तच ... सर्वात आवडता आयतम आहे हा
आणि माझी आई हि सॉलिड बनवते अशी खिचडी

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद रेश्मा.
अरे वा,तुलाही अशीच खिचडी आवडते...छान.

Meenal Gadre. म्हणाले...

खिचडीबरोबर ताकाची कढी नको का? आणि पापड कुठे आहे?

Unknown म्हणाले...

Mast! lai Bhari!

Sampada Malavde म्हणाले...

sahi ! aata lavkar shahi khichadi banavayala havi :)

प्रमोद देव म्हणाले...

उर्मी, तोंडी लावणे हे आपापल्या आवडीनुसार असू शकते.
संपदा, नक्की कर तशी खिचडी आणि मलाही बोलव..परीक्षणाला...आपलं...चव घ्यायला. :ड

उर्मी,फाल्गुनी आणि संपदा, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद