माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

७ नोव्हेंबर, २०११

स्वर आले दुरुनी!

सुगम संगीतातला माझा आदर्श असलेले सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके तथा बाबुजी ह्यांची गाणी ऐकतच मी लहानाचा मोठा झालोय. ह्याआधी त्यांनी गायलेले ’तोच चंद्रमा नभात’ ट्रॅकबरोबर गाण्याचा प्रयत्न केला...तो बराच यशस्वी झाला अशा प्रतिक्रिया मिळाल्यामुळे ह्यावेळी त्यांच्याच एका गीताचे पुन्हा गायन करण्याची हिंमत करतोय. प्रभाकर जोग हे ह्या गीताचे संगीतकार आहेत आणि मी त्यांच्याच ’गाणारे वायोलिन’चा ट्रॅक वापरूनच हे गाणं गायलंय...पाहा आपल्याला आवडतंय का?
३ टिप्पण्या:

ashwini म्हणाले...

bhaaree aahe kakaa

मीनल गद्रे. म्हणाले...

मधल्या वेळात (जेव्हा गायन नाही तेव्हा) व्हायलिन कमी आवाजात वाटते आहे. ते तसे असणारच कारण ते लाईव्ह नाही आहे. एरवी जेव्हा गायकाचा आवाज नसतो तेव्हा वाद्य मोठ्याने वाजतात.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद अश्विनी आणि मीनल!