My Photo
प्रमोद देव
राहणार मुंबई, महाराष्ट्र, India
मी आहे एक सामान्य मराठी माणूस. गप्पा-गाणी,साहित्य-संगीत,विविध खेळ इत्यादि गोष्टीत मी रमतो. १)माझ्या आजवरच्या आयुष्यातील कडूगोड अनुभव मी इथे माझ्या कुवतीनुसार "पुर्वानुभव" ह्या नावाने शब्दबद्ध केलेले आहेत. आपण ते वाचावेत आणि वाटल्यास त्यावर प्रतिक्रिया द्यावी अशी आपल्याला विनंती आहे. २)तसेच "त्यांची कविता माझे गाणे" असा एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येईल आणि त्याच बरोबर त्याची चालही ऐकता येईल. ३)पुर्वानुभववर लिहीलेल्या काही मोजक्या आठवणी तुम्हाला माझ्याच आवाजात "बत्तीशीची चौसष्टी" वर ऐकायला मिळतील.
View my complete profile

स्वरभास्कराच्या काही भावमुद्रा!

>> 2 June 2008



५५ व्या सवाई गंधर्व महोत्सवातील ही एक भावमुद्रा.

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी ह्यांच्या गाण्याचा मी एक निस्सीम चाहता आहे. त्यांच्या सारखेच आपल्याला गाता यावे अशी लहानपणापासूनच तीव्र इच्छा होती पण तो योग ह्या जन्मी तरी नव्हता हेच खरे. तरीही मी त्यांना माझे मानसगुरु मानतो. एकलव्यासारखे त्यांचे गायन आजवर ऐकत आलोय. भीमसेनजी जरी गुरु द्रोणाचार्यांइतकेच त्यांच्या स्वतःच्या गायनाच्या क्षेत्रात महान असले तरी मी मात्र एकलव्याइतका प्रतिभावान नसल्यामुळे त्यांचे गाणे माझ्या गळ्यात उतरवू शकलो नाही ही एक वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच त्याची खंतही आहे. असो. मूळ विषय हा नाही.
मला आवडलेल्या काही भीमसेनजींच्या भावमुद्रा महाजालावर भटकताना हाती लागल्या आणि मोठाच खजिना सापडल्याचा आनंद झाला. त्या आनंदात आपल्यालाही सामील करून घ्यावे असे वाटले म्हणून हा प्रपंच.
तेव्हा महाजालावरील त्या सर्व संबंधितांचे(ज्यांनी ही छायाचित्रे इथे चढवलेली आहेत) त्याबद्दल मनापासून आभार.



गानसमाधीत मग्न!


तंबोरा जुळवण्यात मग्न




मैफिलीची तयारी



मैफिलीआधी चिंतनात मग्न!

1 प्रतिक्रिया:

आशु्तोष मुजुमदार Friday, November 07, 2008  

नमस्कार देवसाहेब,

तुमचा ब्लॉग छान आहे. विशेषतः, पंडीतजींच्या भावमुद्रा collection मस्त आहे. त्यांच्या भारतरत्‍नाच्या निमित्ताने मला या फोटोंचा उपयोग झाला हे आवर्जून सांगावे वाटले.

तुम्हीपण माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या.

  © Blogger templates Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP