पंडित हरिप्रसाद चौरसिया. प्राथमिक गायनाचे धडे वाराणसीच्या पंडित राजाराम ह्यांच्याकडे. त्यानंतर बासरीने त्यांना वेडं लावलं म्हणून बासरीवादनाचे धडे पंडित भोलानाथ ह्यांच्याकडून घेतले. १९व्या वर्षी आकाशवाणी च्या कटक केंद्रात बासरीवादक म्हणून नोकरी. पाच वर्षांनंतर तिथून मुंबई आकाशवाणीत बदली. त्यानंतरचे सर्व शिक्षण उस्ताद अल्लाउद्दीन खाँ(मैहर घराणे) ह्यांची कन्या श्रीमती अन्नपुर्णा देवी ह्यांच्याकडून घेतले.
१९५०च्या सुमारास अहमदाबाद येथील मिलन मिल्समध्ये स्टेनोग्राफर असताना.
कसून केलेला रियाज़!सोबत पत्नी अनुराधा.
ओरिसातील कटक आकाशवाणीवर वाद्यवृंद संचालन करताना.
आकाशवाणीचे तीन शिलेदार. गिटारवादक ब्रिजभूषण काब्रा,संतुरवादक शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद.
विख्यात सतारवादक पंडित रविशंकर आणि विख्यात संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मांसोबत
ध्वनिमुद्रणाप्रसंगी तबलानवाज़ झाकिर हुसेन आणि पंडित हरिप्रसाद
घट्ट मित्र: शिव-हरि. ह्याच नावाने चित्रपटांना संगीत दिलंय.
तिरुपती बालाजी मंदिरात गानकोकिळा लता मंगेशकर,उषा मंगेशकरांसोबत.
जन्माष्टमी साजरी करताना
मैफ़ल सजवताना. सोबत तानपुर्यावर पत्नी अनुराधा
वादनात तल्लीन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा