भारतीय शास्त्रीय संगीतातील एकेका दिग्गजांबद्दल माहिती करून घेण्याचा मी गेले काही दिवस प्रयत्न करतोय. पण त्यांच्या गाण्याबद्दल काही बोलण्याइतपत माझा अधिकार नसल्यामुळे मी आपला त्यांच्या मोहक अदाकारीवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले. नादब्रह्मात रंगलेले कलाकार पाहण्यातही एक वेगळेच संगीत आहे असा एक अलौकिक साक्षात्कार मला ह्या दरम्यान झाला. सुरुवातीला अर्थातच स्वरभास्कर भीमसेनजींचा मान असल्यामुळे मी त्यांच्या काही भावमुद्रा आपल्यासमोर पेश केल्या.आज त्याच मालिकेतील माझे एक आवडते गायक डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांच्या काही भावमुद्रा इथे पेश करत आहे.

वसंतराव गायनाइतकेच तबलावादनातही तितकेच उस्ताद होते हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.

नातू राहूलला तालाचे बाळकडू पाजताना

मैफिलीत रंगलेले वसंतखाँ

तंबोरा जुळवण्यात गुंग
कोणत्याही एका घराण्याशी बांधिलकी न मानणार्या वसंतरावांनी सगळ्या घराण्यांच्या गायकीतले उत्तम तेच उचलले आणि स्वत:ची स्वतंत्र गायन शैली निर्माण केली. भीमसेनांप्रमाणेच मी वसंतरावांनाही माझे मानस गुरु मानतो. त्यांच्या गाण्याचा मी निस्सीम चाहता आहे. वसंतराव गात असताना मधनं मधनं काही मार्मिक टिप्पणी देखिल करत जी देखिल तितकीच श्रवणीय आणि महत्वाची असे.
वसंतरावांच्या मैफिलीची ही एक झलक पाहा. राग: अहिर भैरव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा