पाऊस!
>> 19 March 2009
ही माझी पहिली-वहिली कविता आहे. बघा आवडतेय का?
आले दाटून मेघ नभात
वारा वाहे जोशात/जोरात
वीज चमके कड कडाड
पाऊस पडतो तालात
पानांवरती टपटप पडती
हिरवी झाली अवघी धरती
बेडूक गातो खर्ज स्वरात
मोर नाचतो रानात
ह्या कवितेची चाल ऐकावीशी वाटली तर खाली ऐका.
|

5 प्रतिक्रिया:
अरे वा...... मस्तच !!
काव्यप्रांगणात तुमचं मनापासून स्वागत देवकाका :)
क्या बात है!
जरा उशीरच झाला हा ब्लॉग पहायला.
छान आहे कविता.
जयश्री,प्रशांत आपल्या दोघांचे मन:पूर्वक आभार.
देवसाहेब सुंदरच आहे की तुमची कविता. आवडली. चालही.
धन्यवाद गोळेसाहेब!
Post a Comment