मी ५वी ६वीत असताना म्हणजे सुमारे ४० वर्षापूर्वी ही दोन बालगीते पाठ करून त्यावर शाळेत बक्षिसे देखील मिळवली होती.पण ती बालगीते आता मला पुसटशी आठवतात ती अशी....
१) अशी कशी बाई ही गंमत झाली
फराळाची ताटली चालू लागली
कुशीवर झोपून लाडू कंटाळला
टुणकन ताटलीच्या बाहेर आला
गड गड गड गड गोलांटी रंगली.......वगैरे वगैरे.
आणि
२) मेथाबाईचे लगीन निघाले
दुध्या-भोपळा नवरा झाला
पुढे काशीफळ आघाडीला
वांगी-बटाटे दोहो बाजूला....... वगैरे वगैरे
ह्या बालगीतांचे कवी कोण हे देखिल मला आठवत नाहीत.आपणा पैकी कोणाला ह्याबद्दल काही माहिती असल्यास कळवण्याची कृपा करावी.
३ टिप्पण्या:
फराळाच्या ताटातली चकली उठली
चाकासारखी गरगर धावत सुटली.
तेव्हा करंजी म्हणाली, ’असे कसे झाले ?
चकलीला एकाएकी पाय कसे फुटले ?’
लाडू म्हणाला, ’माझ्या मनासारखं झालं
आता मला ऐसपैस बसायला मिळालं !’
धावणार्या चकलीने उंबरा गाठला
तेव्हा तिला अंगणात कावळोबा दिसला
’अगबाई कावळिटला !’ असे म्हणून चकली
गरकन् मागे वळून ताटाकडे पळाली
बिचारा लाडू मग अंग चोरुन बसला
तरी सुद्धा चकलीने त्याला धक्का मारला
तेव्हा टाळया पिटीत शंकरपाळी म्हणाली,
’भलतीच बिलंदर आहे की हो चकली !’
ऋतूजा,हे ते गाणे नव्हे...
पण तरीही हे गाणंही मस्तच आहे...आवडलं मला.
इथे दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
कुशीवर झोपून करंजी दमली
चंदेरी साडी सावरीत उठली
टाचांचे बूट घालून मिरवीत गेली
फराळाची ताटली चालू लागली
टिप्पणी पोस्ट करा