काश्मीर की कली ह्या चित्रपटातील रफीसाहेब आणि आशाताईंनी गायलेलं हे सुंदर गीत...रफीसाहेबांचा मधाळ, अवखळ आणि नखरेल स्वर तर आशाताईंचा मधाळ आणि लाडिक आवाज..दोन्हीही एकमेकांना अतिशय पुरक असेच आहेत...आता हे गीत मी गायचे म्हणजे पीडाच की हो...माझ्या दृष्टीने नव्हे... मी काय वाट्टेल ते गाऊ शकतो. ;)
ते मी तुम्हा श्रोत्यांच्या भूमिकेतून म्हणालोय मी. :ड
पण काय करणार अशोक वायगणकरसाहेबांनी मेंडोलिनवर वाजवलेलं हे मस्त गाणं मिळालं...मग बनवला त्याचाच रूळ आणि धावडवली माझी गाण्याची एक्स्प्रेस..त्यावरून...अगदी सुसाट...
आता इथे आलाच आहात तर ऐका हो... :)
४ टिप्पण्या:
तुम्ही या वेळी ह्या रुळावर धावडवलेल्या एक्स्प्रेस मधील प्रवास खरेच छान पार पडलाय...गाणे नक्कीच छान जमलंय....
धन्यवाद मायनाक!
वा. छानच जमलंय की!
धन्यवाद गोळेसाहेब!
टिप्पणी पोस्ट करा