माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२६ जानेवारी, २०१२

मेरे नैना सावन भादों....

किशोरकुमारच्या आवाजातलं हे अजून एक सुंदर गाणं...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक... माझ्या आवाजात रूळासंगे ऐका....जमलंय/फसलंय ते तुम्हीच सांगा.

५ टिप्पण्या:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

देव साहेब, जमलं नै राव. :(
सॊरी हं सर.........!

प्रमोद देव म्हणाले...

बिरुटेसाहेब,नेमकं कुठे चुकलंय..की सगळंच चुकलंय?
सांगितलंत तर दुरुस्त करायचा प्रयत्न तरी करता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

सर्वच नाही चुकलं. संगीतापेक्षा तुमचा सूर खूपच वेगळा वाटतो. दोन वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत असे वाटते. ट्रॅक पेक्षा वेगळं गाणं हे तुमचंच नव्हे तर अनेकांचे वाटू शकते परंतु तुम्ही या गाण्याच्या जवळपासही जाऊ शकला नाही,असे मला सारखं वाट्त आहे. तो आनंद आपला आवाज देऊ शकला नाही. (प्रतिक्रिया लिहितांना मला खूपच वाईट वाटतंय)पण आपण प्रयत्न करता, आपला छंद जोपासता म्हणून ते ठीक आहे. छान आहे, यात काही वाद नाही. अर्थात आणखी कोणी ऐकून प्रतिक्रिया दिली तर मी म्हणतोय ते बरोबर का ते चूक ठरविता येईल.

तुमचं गाणं ऐकण्यासठी कोणाला हाक मारु बरं ?

प्रमोद देव म्हणाले...

मूळ गाण्याशी माझी अतिशय बारकाईने तुलना केली....माझी आणि त्या गाण्याची पट्टी बरोबर तीच आहे.......त्यामुळे ती कमीजास्त करण्याची गरज नाहीये...लयीला मात्र किंचित मागे-पुढे झालंय हे लक्षात आलं.