’सुहानी रात ढल चुकी’ हे मोहम्मद रफी ह्यांनी गायलेले गाणे माझे खूप आवडते आहे...कैक दिवसांपासून ते माझ्या नरड्यातून हवे तसे निघत नव्हते...अनायासे जालावर त्याचा रूळ मिळाला मग काय केला प्रयत्न...आज शेवटी एकदाचे बर्यापैकी जमलंय असं वाटतंय...ऐकून कसे ते आपणच ठरवा.
४ टिप्पण्या:
आपण गायिलेली गाणी मी ऐकतो. हे रूळ गायन, रूळ मिळाला, म्हणजे काय हे समजले नाही. आपण सुरात गाता, गीताचे स्वर बिघडू न देण्याचा प्रयास करता.मी संगीतातील जाणकार नसलो, तरी आपले गाणे बेसूर होत नाही,एवढे समजते.
"हिरवे पिवळे तुरे उन्हाचे" हे कधी काळी कै. रतिलाल भावसार यांनी गायिलेले गाणे आपल्याला गावेसे वाटते काय ? आपल्यला ते पसंत असेल, मी ते ऐकू इच्छितो.
mannab अहो,रूळ म्हणजे ट्रॅक..गाण्याचा ट्रॅक. :)
हिरवे पिवळे तुरे उन्हाचे..हे गाणे ऐकल्याचे आठवत नाहीये मला....पण रतिलालजींचे..दावा नयनी यशोदेचा सुकुमार..चटकन आठवतंय...अजूनही त्यांची काही गाणी आठवताहेत...लागतिगे काळजाला तीर हे वेडे तुझे.
ही दोन्ही गीतं माझ्या आवडीची आहेतच..पण त्यासाठी १)ट्रॅक मिळणं शक्य नाही २)माझ्या गळ्याची तेवढी तयारी देखिल नाहीये.
आपण नेमाने माझी गाणी ऐकता..मला भरून पावलं...खरंतर मी काही सराईत आणि प्रशिक्षित गायक नाहीये...पण गाण्याची आवड आणि भरपूर मोकळा वेळ असल्यामुळे असले प्रयोग करत असतो.
आपणास मन:पूर्वक धन्यवाद!
हिरवे पिवळे तुरे उन्हाचे हे गाणे वसंत आजगावकरांचे आहे. (कविता इंदिरा संत, संगीत व गायक वसंत आजगावकर)
अनामित, तुम्ही म्हणताय ते खरं आहे...वसंत आजगावकरांच्या आवाजात हे गाणं ऐकल्याचं स्मरतंय!
प्रतिक्रियेबद्दल आणि ह्या माहितीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा