माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१७ मे, २०१०

पावसाळी विशेषांक!

मंडळी...हिवाळी विशेषांक  आणि होळी विशेषांक  ह्या दोघांनंतर आता आपण काढत आहोत पावसाळी विशेषांक.
ह्या अंकासाठी आपण खास असा कोणताही विषय ठेवत नाही आहोत...मात्र "पाऊस आणि पावसाळी" अशा काही ओलेचिंब आठवणी आपल्याला सादर करायच्या असतील तर त्यासाठी आपण एक वेगळे सदर जरूर ठेवूया.
ह्या अंकासाठी आपण कथा.कविता,आठवणी,ललित,व्यंगचित्र,खास छायाचित्रं...इत्यादी कोणत्याही प्रकारचे साहित्य पाठवू शकता....मात्र अट एकच आहे....जे काही पाठवाल ते ताजे हवे...पूर्वप्रकाशित नको आणि आपला अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य इतरत्र कुठेही प्रकाशित होणार नाही ह्याची काळजी घ्या...

आपले साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आहे १५जून २०१० . अंक प्रकाशित करण्याची तारीख त्यानंतर जाहीर करण्यात येईल.
विशेष सूचना: ह्या अंकासाठी येणारे प्रत्येक लेखन प्रकाशित करण्याचा आमचा मनोदय आहे. येणार्‍या साहित्यात कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत...मात्र तशीच जरूर भासली तर संबंधित व्यक्तीशी चर्चा करूनच त्याप्रमाणे बदल केला जाईल....आलेल्या साहित्यात फक्त टंकलेखन  ,शुद्धलेखन इत्यादिमध्ये काही चूक आढळली तर तेवढेच संपादन त्यात केले जाईल.

आपले लिखित साहित्य कोणत्याही परिस्थितीत पीडीएफ  मध्ये पाठवू नका. एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवू शकता.  साहित्य पाठवण्याचा पत्ता आहे...
attyanand@gmail.com

तर मग लागा तयारीला...

९ टिप्पण्या:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

देव साहेब, पावसाळी विशेषांकासाठी शुभेच्छा...!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

काका, तुमच्या अंकांना माझ्या शुभेच्छा नेहमीच असणार आहेत. माझा एक लेख तर नक्कीच गृहीत धरा. लिहिते आणि पाठवून देते.

प्रमोद देव म्हणाले...

बिरुटेसाहेब, नुसत्या शुभेच्छांवर कटवू नका...प्रत्यक्ष सहभाग घ्या.
कांचन, तुझ्या सहभागाशिवाय अंक पूर्ण कसा होईल?

राघव म्हणाले...

वा वा! खूप शुभेच्छा. :)
लेखन पाठवण्याचा प्रयत्न करतो.

राघव

प्रमोद देव म्हणाले...

राघव,जरूर पाठव कविता...वाट पाहतोय.

R.G.Jadhav म्हणाले...

मी आपल्या अन्काची आतुरतेने वाट पहात आहे. अन्कासाठी शुभेच्छा.

R.G.Jadhav म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
अनामित म्हणाले...

काका, जमल तर मी पण पाठविन म्हणते लेख.

प्रमोद देव म्हणाले...

जाधवसाहेब, अंक जुनच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात प्रकाशित होईल....तुम्हाला नक्कीच त्याची सुचना पाठवेन.

जीवनिका...जमलं तर नको...नक्की जमव.