माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२३ ऑक्टोबर, २०१४

दिवाळी गीतांक



दिवाळी अंक....छपाईच्या स्वरूपातले आणि इथले महाजालावरचे इ-दिवाळी अंक आपण खूप पाहिले आणि वाचले आहेतच आणि पुढे वाचालही....पण मी ह्यावर्षी एक नवा प्रयोग केलाय...बहुदा हा जगातला पहिलाच प्रयोग आहे असे म्हणायला कुणाची हरकत नसावी...कोणता बरं तो प्रयोग?
मी  काही निव्वळ ’दिवाळी गीते’ इथे ध्वनीचित्रफितीच्या रूपात सादर करतोय...त्याच्या मागची माझी भूमिका दिवाळी अंकासारखे काही तरी असावे हीच आहे..मात्र लेखनाच्या ऐवजी हा गीतांचा अंक असल्यामुळे मी ह्याला ’दिवाळी गीतांक’ असे नाव दिलंय...एकूण सात दिवाळी गीते ह्या अंकात आहेत..एका पाठोपाठ एक ती आपल्याला ऐकता येतील...जरूर ऐका आणि आपला अभिप्रायही कळवा बरं का!

आपणा सर्वांना, ह्या दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: