डिमॅट खाते उघडणे हे सेविंग्ज बँक खाते(बचत खाते) उघडण्याइतके सोपे आहे. बर्याचशा राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका आणि शेअर दलाली करणार्या संस्थांच्याकडे आपण हे डिमॅट खाते उघडू शकता.
हे खाते उघडण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्या अशा....
१) २०रु. च्या स्टँप पेपरवर खाते उघडण्याचा अर्ज करणे(हा अर्ज छापील स्वरूपात वरील सर्व संस्थांमध्ये मिळतो). त्या सोबत काही कागदपत्र जोडावी लागतात. ती म्हणजे १) घराच्या पत्त्याविषयीचा पुरावा(हल्ली रेशन कार्डाच्या ऐवजी टेलेफोन बील,विजेचे बील, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट वगैरेपैकी कोणत्याही गोष्टींची प्रमाणित(अटेस्टेड)प्रत लागते). २) पॅन कार्डाची प्रमाणित प्रत(ही अत्यंत जरूरीची आहे).३)ज्या बँकेत आपले बचत खाते आहे त्या बँकेकडून आपल्या 'सही'चे प्रमाणीकरण(अटेस्टेशन)करणे.
२)हे खाते उघडण्यासाठी काही संस्था त्याचा मोबदला घेतात तो चेकच्या(धनादेश) स्वरूपात असतो. अर्ज भरून(सर्व जरूरी कागदपत्रांसह) तो संस्थेकडे सुपूर्द केल्यापासून साधारण एक आठवड्यात आपले खाते उघडले गेल्याबद्दलचे सुचनापत्र आपल्याकडे पोचते केले जाते. ह्या खात्याची सेवा देणारी संस्था ह्यासाठी वार्षिक मोबदला घेते. तसेच ह्या खात्यात शेअर जमा करण्यासाठी प्रथम ते डिमॅट करावे लागतात. त्यासाठीची सर्व प्रक्रिया आपणाला ह्या ठिकाणी समजावून दिली जाते आणि डिमॅट च्या प्रक्रियेसाठी देखील काही मोबदला द्यावा लागतो. ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला खाते उघडताना लेखी स्वरूपात दिली जाते तसेच ती व्यवस्थित समजावून सांगितली जाते.
नम्र विनंतीः ही प्रक्रिया लेखी स्वरूपात वाचत असताना आपल्या डोक्यात बर्याच शंका-कुशंका येणे स्वाभाविक आहे( अशा गोष्टींचे लेखन किचकट असते आणि त्याहून ते वाचून समजणे जास्त क्लिष्ट असते.) तेंव्हा मी आज इथेच थांबतो आणि ज्या काही शंका आपल्या मनात असतील त्या आपण विचारल्यास मी त्यांना यथामती उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. ह्या पुढच्या प्रक्रिया म्हणजे शेअर्स विकायचे/विकत घ्यायचे कसे, पैशांची देवाणघेवाण कशी करायची वगैरे वगैरे गोष्टी लेख स्वरूपात मांडण्याऐवजी मला असे वाटते की त्या प्रश्नोत्तरे स्वरूपात झाली तर ते जास्त सोपे (माझ्यासाठी आणि आपल्यासाठी)होईल असे मला वाटते.
३ टिप्पण्या:
Sher kase vikat ghyve v te vikave
Sher kase vikat ghyve v te vikave
Good
टिप्पणी पोस्ट करा