मला एक अनुभव हटकून येतो....मी सद्द्या राहातो ती इमारत सात मजली आहे आणि मी सहाव्या मजल्यावर राहतो...इथे एका मजल्यावर पाच सदनिका आहेत...माझ्या मजल्यावर माझ्या सदनिकेचे दार नेहमीच बंद असतं...इतर दोन ठिकाणी घरात लहान मुलं असल्यामुळे त्यांचे दरवाजे नेहमीच उघडे असतात....तरीही आमच्या ह्या मजल्यावर कधी कुणी व्यक्ती पहिल्यांदाच आली तर पत्ता विचारण्यासाठी माझ्या बंद दरवाज्याची घंटीच वाजवली जाते...समोर दारं उघडी दिसत असूनही त्यातल्या कुणालाही पत्ता विचारावासा का वाटत नाही हे मला कोडंच आहे....कारण बहुतेक करून आलेली व्यक्ती ही माझ्या व्यतिरिक्त इतर चार जणांपैकी कुणाकडे तरी आलेली असते...मग तो वाणसामान घेऊन आलेला हमाल असो, हॉटेलातून काही खाद्य पदार्थ घेऊन आलेला पोरगा असो किंवा कुणी पाहुणा असो....
हे कमी म्हणून की काय कैक वेळेला आलेला मनुष्य केवळ इमारतीचे आणि ज्याच्याकडे जायचंय त्याचे नाव इतक्याच भांडवलावर आलेला असतो आणि तो इतर कोणत्याही मजल्यावर न जाता थेट माझ्या मजल्यावर येऊन मलाच पत्ता विचारत असतो.....माझ्या इमारतीत मी सोडून बाकी सगळे गुजराथीच आणि येणारी व्यक्ती ही त्यांच्यापैकीच कुणाकडे तरी आलेली असते....इमारतीत येतांना इमारतीच्या रखवालदारालाही ते लोक पत्ता विचारू शकतात ना...किंवा खाली असलेली नावांची पाटीही वाचू शकतात ना....पण नाही..थेट माझ्याकडेच येतात....आता तुम्ही म्हणाल की थेट माझ्याकडे कशावरून येतात...इतरांकडेही जात असतीलच..तुम्हाला काय माहीत?
मुद्दा बरोबर आहे तुमचा....मलाही आधी तसंच वाटलं होतं...पण बरेचदा मी असं पाहिलंय की येणारी व्यक्ती ज्यांच्याकडे येते असे लोक समोर असूनही त्यांना पत्ता न विचारताच माझा बंद दरवाजा खटखटवला जातो... आणि मी त्यांना समोरच उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे निर्देश करतो...आता बोला.
हाच अनुभव मला ह्यापूर्वी जिथे मी राहात असे तिथेही यायचा....
अहो पत्ता विचारण्याबद्दल किंवा चौकशी करण्याबद्दल तक्रार नाही..पण त्याला काही वेळकाळ? ह्या आधी मी जिथे राहायचो तिथे मी तळमजल्यावर राहायचो... एकदा रात्री अडीच वाजता एकाने माझ्या घराची घंटी वाजवली होती आणि मीही अतिशय सहजतेने कोण आहे हे न पाहताच दार उघडले होते...सुदैवाने ते कुणी चोर-दरवडेखोर नव्हते... समोरच्या घरात राहणारे लोक कुठे गेलेत म्हणून चौकशी करणारे त्यांचे नातेवाईकच होते...अर्थात त्या आलेल्या लोकांची आणि माझी साधी तोंडओळखही नव्हती...पण मी आपला सद्गृहस्थ म्हणून त्यांची चौकशी करून उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं आणि वाटेला लावलं....आलेले लोक आमच्याच गावातले म्हणजे स्थानिकच होते...पण त्यांचे नातेवाईक कुठे गेले ते मला माहीत नव्हतं....चौकशीत कळलं की ते लोक असेच सहज फिरत फिरतच आले होते...एका गाण्याच्या कार्यक्रमाहून घरी परत जातांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी....म्हणजे त्यांच्याकडे असे काही गंभीर कारणही नव्हतं अशा अवेळी कुणाचाही दरवाजा ठोठवण्यासाठी...
मी त्यांना विचारलं की अहो, तसं काही गंभीर कारण नव्हतं तर का उगाच मला त्रास दिलात...तर म्हणाले की तुमच्या घरातला दिवा चालू दिसला, म्हणून म्हटलं जागे असाल...आता नाईट लँपच्या प्रकाशामुळेही जर कुणाला असं वाटत असेल की घरातले लोक जागे असतील तर अशा लोकांबद्दल काय बोलणार?
काही नाही, मी कपाळाला हात लावून घेतला.
दुपारच्या झोपेचं खोबरं तर किती तरी लोक करतच असतात...माझ्या झोपेशी लोकांचं काय वाकडं आहे माहीत नाही..पण भली पहाट, टळटळीत दुपार, मध्यरात्र...वेळ कोणतीही असो...मला जेव्हा कमालीची झोप येत असेल तेव्हाच नेमकी घंटी वाजते....
कुणीसं म्हटलंय ना हो...देवाचिये द्वारी,उभा क्षणभरी,त्याने मुक्ती साधियेल्या! ;)
मला आता माझ्या दरवाज्यावरची माझ्या नावाची पाटीच काढून टाकावी लागणार आहे.. बहुदा देव आडनावाचा दोष असावा हा सगळा...दुसरं काय असू शकतं!

४ टिप्पण्या:
Contact Dhondopant.(Aapaly patriket kadaachit "DwarGhantika Yog" asaawa). :) Cheers.
हाहाहा! द्वारघंटिका योग! अगदी बरोबर!
देवकाका,
तुम्हाला एक असामान्य चुंबकत्व प्राप्त झालेले आहे.
त्याचा अभिमान बाळगा!
हाहाहा! असामान्य चुंबकत्व!
गोळेसाहेब, अहो त्याचा फायदा जाऊ द्या हो पण केवळ त्रासच होतो ना !
टिप्पणी पोस्ट करा