माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

७ मे, २०१२

’सत्यमेव जयते’च्या निमित्ताने!

अमिरखानचा कालचा कार्यक्रम पाहिला....त्यात माझ्या दृष्टीने दोन गोष्टी धक्कादायक वाटल्या.  त्यातली एक म्हणजे... कुटुंबनियोजनाच्या नावाखाली सरकारनेच स्त्री-भ्रूण हत्येला चालना दिली होती....अर्थात नंतर सामाजिक संस्थाच्या दबावाने सरकारला माघार घ्यावी लागली हे अलाहिदा...पण तिथून ते लोण खाजगी क्षेत्रात जे पसरले ते आज बंदी घालूनही चोरून मारून नव्हे तर राजरोसपणे सुरु आहे...फक्त सांकेतिक भाषेत...आणि आज आपण सारे त्याचे सामाजिक दुष्परिणाम भोगतोय.

दुसरी अशी की हरयाणा.दिल्ली,पंजाब इत्यादि ठिकाणी विवाहयोग्य अशा मुलींची चणचण असल्यामुळे ह्या ठिकाणचे लोक कर्नाटक,आंध्र,बिहार वगैरेसारख्या ठिकाणाहून मुलींना विकत घेऊन त्यांची जबरदस्तीने तिथल्या पुरुषांशी लग्नं लावत आहेत...ह्यात काही ठिकाणी एका स्त्रीवर त्या घरातले सगळे पुरुष अत्याचार करतात तर कधी तिला पत्नीचा दर्जा न देता मोलकरणीचा दर्जा दिला जातो असे निदर्शनाला आलेले आहे.

मंडळी सद्द्याचा स्त्री-भ्रूण हत्येचा प्रकार जर आपण वेळीच थांबवला नाही तर मग...एकेका मुलीशी तीन-चार जणांना विवाह करावा लागेल..महाभारतात द्रौपदीची जी परवड झाली होती तीच परवड आताच्या मुलींना भोगावी लागेल....आताही स्थिती काही फारशी वेगळी नाहीये म्हणा.

बाकी, गरीब लोकांच्यातच हे स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे ,सुशिक्षित वर्गात तेवढे नाही इत्यादि गैरसमजांबद्दल मला आधीच कल्पना होती...नियमित वृत्तपत्रवाचन आणि डोळे/कान उघडे ठेवून समाजात वावरलं तर हे असे गैरसमज कधीच निर्माण होत नाहीत...पण आपले सर्वसाधारण वर्तन असे असते की...आपल्याला काय करायचंय? आपण तर असं काही करत नाही ना? आपल्याला त्रास होत नाही ना..इत्यादि...ह्या आधुनिक तपासण्या नव्हत्या तेव्हाही नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीला  कधी दुधात बुडवून तर कधी तिच्या तोंडावर उशी ठेऊन तिला गुदमरून टाकून जीव घेण्याचे प्रकार आपण कथा कादंबर्‍यातही वाचल्याचे आठवत असेलच...ते बहुतेक सगळे प्रकार उच्च वर्णीय , जमीनदार, मालदार वर्गातच होत असत....आजही होतात. ही असली कामं परस्पर दाई अथवा सुईणींच्या हस्ते, त्यांना मोठी बिदागी देऊन करवली जातात. गरीबांकडे कधी असे प्रकार होत नाहीत...त्यांचं एकच म्हणणं असतं...देवाची इच्छा...जे मिळालंय ते स्वीकारण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येते.

स्त्री-भ्रूण हत्येमूळे स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळला हे तर निर्विवादच आहे...आणि त्यामुळेच हल्ली स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार वाढले आहेत असे माझे मत आहे आणि  थोपुवरच्या एका चर्चेत मी ते मांडलेही होते....पण लोकांना ते तितकेसे पटले नाही...कालच्या कार्यक्रमात हरियाणातल्याच एका स्त्री समाजसेविकेने माझ्या म्हणण्याला दुजोरा दिलाय...तिने म्हटलंय मुलींची संख्या कमी झाल्यामुळे गावातल्या लग्नेच्छु युवकांची संख्या बरीच वाढलेय पण त्यांच्यासाठी बायको म्हणून मुलीच मिळेनाशा झाल्यामुळे आता तेच युवक आपल्याच ओळखी-पाळखीतल्या स्त्रियांची छेडछाड करायला लागलेत.

कालच्या त्या कार्यक्रमामुळे, ज्या गोष्टींबद्दल कुजबूज ह्या स्वरूपात चर्चा चालत होत्या त्या आता उघड प्रमाणात होतील हे नक्की आणि समाजमनाच्या दडपणामुळे  स्त्री-भ्रूण हत्येच्या संख्येत निश्चितच घट होईल अशी आशा आपण करूया.
जयहिंद!

७ टिप्पण्या:

श्रद्धा म्हणाले...

देव काका, आज तुमचा ब्लॉग माझ्या वाचनात आला. बऱ्यापैकी पोस्ट्स हि वाचून झाल्यात. खूप छान लिहिता तुम्ही.
पुढचे लेख वाचले कि नक्की प्रतिक्रिया देईन.
असेच लिहित राहा.

प्रमोद देव म्हणाले...

श्रद्धा, तुझं माझ्या जालनिशीवर हार्दिक स्वागत आहे!
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद!
कुणीतरी आपलं लेखन वाचतंय ही भावनाच आनंददायक आहे . त्यामुळे तुझ्यासारख्या आवर्जून प्रतिक्रिया देणार्‍या वाचकांच्यामुळेच मी असा लिहिता राहिलोय हेही इथे नमूद करू इच्छितो.
पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद!

श्रीधर जहागिरदार म्हणाले...

छान लिहिलेत. २००३ साली प्रदर्शित झालेला "मातृभूमी - A nation without women" ह्या चित्रपटातून हे सर्व , मुलीची चणचण, तिचे वस्तूकरण, कोवळ्या मुलांना मुलगी म्हणून "खपवणे", एकाच घरात गांवातील एकमेव मुलगी विकत आणून सर्व भावंडांनी आणि वडिलांनीही वाटून घेणे, अन शेवटास त्या मुलीवर होणारा सामुहिक अत्याचार हे सर्व अंगावर येण्या इतपत प्रभावीपणे, मनोज झा ह्या दिग्दर्शकाने दाखवले होते. हा चित्रपट अर्थातच तिकीट बारीवर आपटला. आता अमीर खान ने आपला ब्रांड वापरून छोट्या पडद्यावर हे अधिक प्रखरपणे दाखवले. आता तरी देश जागा होईल अशी आशा करू या.

प्रमोद देव म्हणाले...

जहागीरदारसाहेब,माझ्या जालनिशीवर आपले हार्दिक स्वागत आहे.
आपल्या भावनांशी मीही सहमत आहे..हळूहळू का होईना पण नक्की काही तरी सकारात्मक बदल होईल अशी आशा करूया.

Nils Photography म्हणाले...

Completely Agree !!!
I was also thinking the same.

If sex ratio of Boys to Girls keep decreasing then rapes and all these things will increase defiantly...

and I got shocked by knowing that people of hariyana and Rajshtan actually buying women, just imagine they treat that woman as a 'THING' when they get boar they will throw her and buy a new one...

GOD... we keep complaining about western culture and look our culture where we are going ???

Its really time to take some serious decision now....

Nice Blog...

Nils Photography म्हणाले...

Keep Posting !!!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद नील.