माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

६ जून, २०१०

शब्दबंध २०१०

होणार, होणार म्हणता म्हणता २०१० च्या शब्दबंधचे इ-संमेलन एकदाचे ५जून रोजी पार पडले.
शब्दबंध २००९ च्या आधी जे एक उत्साहाचे वातावरण होते ते ह्यावेळी फारसे जाणवले नाही त्यामुळे ह्या २०१० च्या संमेलनात कसा प्रतिसाद मिळेल ह्याबाबत मी स्वत: साशंक होतो...पण तरीही प्रत्यक्ष संमेलनाच्या वेळी प्रत्येक सत्रात( प्रत्येकी साडेतीन तासांची चार सत्रे) अभिवाचक आणि श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. उत्साहाने आपापल्या साहित्याचे वाचन करणारे अभिवाचक आणि दिलखुलास दाद देणारे श्रोते असे एकूण उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सकाळी ९ वाजता सुरुवात झालेले हे संमेलन उत्तररात्रीपर्यंत उत्तरोतर रंगतच गेले.

तांत्रिक बाजूंबद्दल बोलायचे झाल्यास....बर्‍याच सदस्यांना आणि श्रोत्यांना अजून स्काईप हे माध्यम नेमके कसे वापरायचे हे नीटसे कळलेले नाहीये. त्यामुळे सत्रसंचालकांना सत्र सुरु करतांना अनंत अडचणी येत होत्या आणि त्यात बराच वेळही वाया जात होता. ह्या इ-संमेलनाआधी सराव सत्र घेऊन सदस्यांना आणि श्रोत्यांना स्काईपबद्दलची पूर्ण माहिती,ध्वनीग्राहक (मायक्रोफोन) जोडणी,देवनागरीतून लेखन करण्यासाठी बरहा आयएमईचा वापर कसा करायचा वगैरे तांत्रिक माहिती पूरवून आम्ही आमच्या परीने खबरदारी घेतलेली होती...पण बरेचजण अशा सराव सत्रांना त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हजर राहू शकले नाहीत....अशा लोकांच्या आयत्यावेळी येण्यामुळे खूपच गोंधळ उडत होता. तरीही भगीरथ प्रयत्नांनी आम्ही सगळे त्यावर बर्‍यापैकी मात करून संमेलन यशस्वी करू शकलो...हेही नसे थोडके. मात्र एकच सांगतो...सभासदांनी  स्काईपचा योग्य वापर कसा करावा....संमेलनाच्या वेळी काय काळजी घ्यावी ह्याबद्दलच्या सूचना नीट समजून घेऊन त्या जर व्यवस्थितपणे अंमलात आणल्या असत्या तर कदाचित वाया गेलेल्या वेळात अजून एखादे सत्र होऊ शकले असते असे अतिशयिक्तीने म्हणावेसे वाटते.  ;)  असो....

ह्यावेळच्या शब्दबंधमध्ये एकूण ३० अभिवाचकांनी आपापले साहित्य वाचून दाखवले. कविता,प्रवासवर्णन,कथा,ललित लेखन,माहितीप्रद तसेच ऐतिहासिक महत्वाचे,विनोदी तसेच गंभीर, विचार करायला प्रवृत्त करणारे, करूण,भावूक करणारे असे विविध रसांनी नटलेले साहित्यप्रकार अभिवाचकांनी आपापल्या आवाजात सादर केले.

गेले दोन-अडीच महिने ह्या संमेलनाची तयारी सुरु होती.
ह्यावेळी संमेलनाचा संयोजक होता संग्राम भोसले. त्याला मदतनीस म्हणून मी आणि प्रशांत मनोहर होतो.
सभासदांना सराव सत्रापासूनच मी आणि विनायक रानडे हे तांत्रिक सहकार्य करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत होतो.

ह्या संमेलनात अभिवाचक म्हणून सामील झालेले :

१)संग्राम भोसले(पुणे), २) प्रशांत मनोहर(नागपूर), ३) मी(मुंबई),४) प्रभाकर फडणीस(मुंबई)
५) विनायक रानडे(पुणे), ६)  नरेंद्र गोळे(डोंबिवली), ६) जयंत कुलकर्णी(पुणे), ७) आशा जोगळेकर(अमेरिका),
८) श्रीराम पेंडसे(पुणे), ९) संतोष साळुंके(मलेशिया), १०) तुषार जोशी(नागपूर), ११) हर्षा स्वामी (पुणे),
१२) अमोल वाघमारे, १३) प्रतिमा मनोहर(नागपूर), १४) विद्याधर भिसे(मुंबई),
१५) अमेय धामणकर(ठाणे), १६) राहूल पाटणकर(पुणे), १७) महेंद्र कुलकर्णी(मुंबई),
१८) नीलेश गद्रे(ऑस्ट्रेलिया), १९) अपर्णा लळिंगकर(बंगळुरु), २०) मीनल वाशीकर(कोल्हापूर),
२१) मीनल गद्रे(अमेरिका), २२) प्राजक्ता पटवर्धन(अमेरिका), २३) हेरंब ओक(अमेरिका),
२४) शंतनू देव(कॅनडा), २५) संगीता गोडबोले(अमेरिका), २६) भाग्यश्री सरदेसाई(अमेरिका),
२७) नचिकेत कर्वे (अमेरिका), २८) अपर्णा संख्ये(अमेरिका), २९) समीर सामंत(मुंबई)
आणि ३०) श्रीकांत शिरभाटे

संमेलनात श्रोते म्हणून सामील झालेले....
१) अनिकेत वैद्य(पुणे), २) रविंद्र जाधव,(मुंबई), ३) आनंद पत्रे(हैद्राबाद), ४) सागर बाहेगव्हाणकर(पुणे),
५) सुरेश पेठे(पुणे), ६) नंदन होडावडेकर (अमेरिका), ७) प्रशांत काळकर(पुणे) इत्यादि.

खास,संमेलनाच्या वृत्तांत संकलनासाठी सकाळचे सहाय्यक संपादक सम्राट फडणीसही बहुतेक सत्रांमध्ये उपस्थित होते.

हा झाला थोडक्यात वृत्तांत. बाकी सविस्तर वृत्तांत इतर मंडळी लिहितीलच.  :)

१० टिप्पण्या:

शांतीसुधा म्हणाले...

छानच झाला आहे वृत्तांत. पण कालच्या शेवटच्या सत्रात नक्की अडचण काय होती....म्हणजे कशामुळे होती आनी नंतर ती कशी सुटली हे समजलं तर बरं होईल.

मी अत्त्यानंद म्हणाले...

शेवटच्या सत्रातील अडचण म्हणजे सभासदांमधलं असामंजस्य. कुणीही कुणालाही बोलावणं पाठवत होतं..त्यामुळे एकाच वेळी दोनतीन ठिकाणाहून बोलावणी यायची..आणि त्यातच लोकं गुंतून, गोंधळ वाढत होता....अर्धा एक तास गेला त्यात...शेवटी थकून भागून एकदाचे लोक आले वळणावर. ;)

भानस म्हणाले...

मला तर भितीच वाटू लागली होती.... :( पण अखेरीस जमले सगळे.:) शब्दबंधच्या पहिल्या सत्रात श्रोता म्हणून व शेवटच्या सत्रात अभिवाचक म्हणून राहिला मिळाल्याने मला अतिशय आनंद वाटला. तुम्हां सगळ्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नांनी सत्र यशस्वी झाले. खूप खूप आभार.

आनंद पत्रे म्हणाले...

काका, दुपारच्या सत्राला मजा आली, रात्री स्काईप मला वारंवार बाहेर काढत होतं, त्यामुळे ते सत्र हुकले.
शब्दबंधच्या आयोजकांचे आभार!

अपर्णा म्हणाले...

काका, स्काइप चकटफ़ु म्हटलं की थोडं इथे-तिथे व्हायचंच....पण मजा आली...आणि हो आमच्या सत्रात नचिकेतने पण एक लेख वाचला म्हणजे ३१ वाचक...:)

मी अत्त्यानंद म्हणाले...

भाग्यश्री,आनंद आणि अपर्णा तुम्हा तिघांना धन्यवाद.
खरंच...काही चुका झाल्या...पण शेवटी आपण त्यावर यशस्वीपणे मात करू शकलो हेच महत्वाचं.
पुढच्या वेळी ह्या चुका होणार नाहीत ह्यासाठी आपण सगळेजण मिळून काळजी घेऊया.

अपर्णा...लेखात योग्य तो बदल केलाय...नचिकेतने अभिवाचन केले....नंदनने केले नाही....संबंधित यादीत नावात अदलाबदल केली आहे.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

मीनल म्हणाले...

हो, छानच झाला कार्यक्रम. आणि तुमच्यामुळे मला अभिवाचन करता आले(आयत्या वेळेची ही बडबड तुम्हीही गोड मानून घेतलीत!)
धन्यवाद.
शब्दबंधच्या सर्व टीमचे धन्यवाद.

चैताली आहेर. म्हणाले...

काका...अभिनंदन.... कार्यक्रम छान झाला हे ऐकुन छान वाटले..त्याच्वेळी मला सहभागी होता आले नाही ह्यासाठी वाईटही वाटतेय.... जेव्हा तुम्ही सारेजण सत्राचा आनंद घेत होतात तेव्हा मी चडफडण्याव्यतिरिक्त काहीही करु शकले नाही...
असो...पण पुन्हा एकदा अभिनंदन...

मी अत्त्यानंद म्हणाले...

मीनल,चैताली धन्यवाद.
मीनल तू देखिल खूप मेहेनत घेतलीस...तुझ्या सत्रातल्या लोकांना घट्ट बांधून ठेवलं होतंस..म्हणून शेवटी ते यशस्वी झालं.
चैताली..अगं शब्दबंध दरवर्षी होत असतं...आता पुढच्या वर्षी भाग घे...व्यत्यय हे येत असतात..तो जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.

THE PROPHET म्हणाले...

मी शब्दबंध संपल्या संपल्या लगेच मुंबईबाहेर पडलो. त्यामुळे बरंच लिहायचं राहून गेलंय. सगळ्या शब्दंबंधींचे खूप खूप आभार.
अगदी मस्त अनुभव होता! खूप मजा आली. रुखरुख एव्हढीच, की मी एकाच सत्राला उपस्थित राहू शकलो.