इथे लिहितांना अथवा कोणत्याही लेखी संभाषणात आग्रहपूर्वक देवनागरी लिपीचा आणि मराठीचाच वापर करावा आणि आपल्या मराठी भाषक मित्रमंडळींतही ह्याचा आवर्जून प्रचार करावा.
त्यासाठी ह्या दुव्यावरून
बरहा आयएमई हे एक छोटेसे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर उतरवून घ्या आणि देवनागरीतून लिहायला आजपासूनच सुरुवात करा.
हे कसे करायचे ह्याचे प्रत्यक्ष आणि सुलभ मार्गदर्शन आपल्याला नागपूरच्या तुषार जोशींनी तयार केलेल्या एक ध्वनिचित्रमुद्रणाद्वारे मिळेल. त्याचा दुवा खाली देत आहे.
http://www.youtube.com/watch?
देवनागरी लिहिताना सुरुवातीला थोडे जड जाईल पण थोड्या सरावाने हे सहजसाध्य होईल हे मी स्वानुभवावरून सांगतो.
काही अक्षरे लिहितांना उडणारा गोंधळ दूर करण्यासाठी ही एक मदत:
ख=kha,Ka
घ=gha,Ga
ङ=~ga
च=ca,cha
छ=Ca,Cha
झ=jha,Ja
ञ=~ja
ट=Ta
ठ=Tha
ड=Da
ढ=Dha
ण=Na
थ=tha.
ध=dha
फ=pha,Pa
भ=bha,Ba
श=Sa,sha
ष=Sha
ळ=La
क्ष=kSha
ज्ञ=j~ja
ॐ=oum
ऐ=ai
ऍ=~e
ऑ=~o
औ=ou
अं=aM
अ:=a:,aH
र्य=r^ya
म्=m^^(पाय मोडायचा असेल तर)
कृ=kRu
हूँ= hU~M
४ टिप्पण्या:
बारह तर उत्तम आहेच .. पण अगदी कुणालाही सहज वापरता येणारी गुगल आय एम इ अशी ही एक सुविधा आहे. आपण वापरली आहे काय ? इथे तुम्ही वाचू शकता त्या बद्दल .. http://netvidyarthi.blogspot.com/2010/01/blog-post.html
धन्यवाद वीरेंद्र.
हा प्रतिसाद मी गुगल आय एम ईनेच लिहीत आहे.
बराहा वापरण्याची सवय असल्यामुळे जरा वेळ लागतोय पण एकूण प्रकार चांगला वाटतोय.
ह्याबद्दल ऐकले होते पण कधी प्रयत्न केलेला नव्हता.
काका...धन्यवाद!! खुप उपयोगी आहे.
काका धन्यवाद
बरच शिकायला मिळालय,पण ते tha च कोड काहि ऊलगड्त नाही अजुन.
टिप्पणी पोस्ट करा