ज्याला जी गोष्ट करायला जास्तीत जास्त आवडते तीच करायला परिस्थितीवशात एखाद्यावर काही काळासाठी बंदी आली तर?
तुम्ही म्हणाल,कसले भलते सलते प्रश्न हल्ली तुमच्या डोक्यात येतात हो....साठी बुद्धी नाठी...दुसरं काय?
चांगलं लिहावं,वाचावं...झालंच तर गप्पा माराव्यात,गाणी म्हणावीत....
झालं! सगळंच मुसळ केरात की हो...अहो मीही तेच सांगत होतो तुम्हाला...गेला आठवडाभर मला खोकल्याने हैराण केलंय... गाणी म्हणणं सोडा हो..नुसतं गाण्याचा मनात विचार आला तरी ढास लागतेय...दोन शब्द बोलायलाही मारामार झालेय....औषधं घेतोय..अगदी वेळच्या वेळी,सगळी काळजीही घेतोय....पाहिलंत ना तोंडावर फडकं बांधलंय ते? पण हा खोकला काही पाठ सोडायला तयार नाहीये....हितचिंतक सल्ला देताहेत त्याला लवकरात लवकर पळवा..लवकर बरे व्हा....मलाही तसंच वाटतंय हो....पण
आता हा पण काय आणखी?
सांगतो हो....काय तो अभंग आहे...आयला आठवायचा प्रयत्न करतोय तर आठवण्याऐवजी खोकलाच येतोय की राव....हं,आत्ता आठवला....
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी साधियेल्या....असा काहीसा अभंग आहे बघा....
हा खोकला, तशाच मिषाने आला की हो माझ्याकडे...पण आता म्हणतो...नाऽऽही! अजिबात नाही जाणार इतक्या लवकर! मलाही राहायचंय तुझ्याबरोबर! उठसुठ कशाला ती गाणी गायची? जरा आम्हाला पण बागडू दे की तुझ्या मुखी!
आता,हा असा बोलायला लागला तर मलाही प्रश्न पडला की हो....खरा नसलो म्हणून काय झालं आडनावाचा तरी देव आहे ना...मग त्या आडनावाला जागायला नको....भले त्याचा आडफायदा...म्हणजे गैरफायदा हो... तो खोकला घेऊ दे...आपण आपल्या नावाला...त्येच त्ये हो...आड, आडनावाला जागायला नको? म्हणून सद्द्या त्याला म्हटलं..बाबा रे, किती दिवस राहायचे तेवढे दिवस राहा...मी पण कैक वर्षात गप्प बसलेलो नाहीये...तेव्हा जरा तेवढंच मौनव्रत पाळतो...तुला जेवढं काही माझ्या मुखात...खरं तर नरड्यात म्हणणार होतो.....वास करायचा असेल...वास म्हणे रहिवास हो...इतकं शिंपल तुमच्यासारख्या जंटलमन लोकांला समजू नये?....हं तर म्हटलं..तुला जितका वेळ वास करायचा असेल कर बाबा...तुही खूश हो! मी आपला मौनीबाबाच बनतो.
असो...तर मंडळी, ह्या मौनामुळे एक फायदा झाला...बोलता येत नाही, गाता येत नाही मग आता करायचं काय हा माझ्यासारख्या बडबड्या माणसापुढे यक्षप्रश्न निर्माण झाला...पण काही नाही..त्यावरही तोडगा निघाला...कुठेतरी वाचलं होतं...समस्येमुळे तुमचा एक मार्ग बंद झाला असं जरी क्षणभर वाटलं तरी ते तसं नसतं...दुसर्या ठिकाणी कुठे तरी वाट सापडते...आपण ती शोधायची असते....माझंही तसंच झालं..काही काळ मी निर्बुद्ध मनाने बसून होतो...मग एका क्षणी साक्षात्कार झाला....अरेच्चा...इतके दिवस आपण चाली लावत होतो, स्वत:च गात होतो....त्या सगळ्याकडे कधी एका त्रयस्थ श्रोत्याच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे काय?
नाही...असेच उत्तर होते....मग? आता कसली वाट पाहतो आहेस...आताचा वेळ लाव सत्कारणी...कर त्या गोष्टींचा विचार....शोध त्यातल्या त्रुटी, शोध त्यातलं सौंदर्य...आणि मी लगेच कामाला लागलो....
मंडळी, खरंच सांगतो....माझ्या काही चाली पुन्हा नव्याने ऐकल्या....बर्याचशा आवडल्या..काही अगदीच सामान्य वाटल्या....पण त्यांच्यात सुधारणा करता येईल असेही लक्षात आले.....गाण्याच्या बाबतीत सांगायचे तर ताल...तो आधीपासूनच कच्चा आहे....पण बर्याचदा अधेमधे किंचित सूरही घसरतोय....किमान तो तसा घसरता कामा नये.....मनातल्या मनात नोंदी करतोय...पुन्हा नरडं गाण्यालायक झालं की आता ह्या गोष्टीतही नक्कीच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.....तालाच्या बाबतीत मात्र अजून काही मार्ग दृष्टीपथात दिसत नाहीये...आधी मला माझ्या शरीराचे घड्याळच सुधारावे लागेल...बहुदा त्यातूनच ताल जागेवर येईल....पाहूया...प्रयत्न करणं माझ्या हाती आहे...बाकी यश मिळेल न मिळेल...काहीच माहीत नाही.
(वेळ जात नाही म्हणून काही तरी खरडलंय..फारसं मनावर घेऊ नका.)

1 टिप्पणी:
काका...काळजी घ्या :) :)
टिप्पणी पोस्ट करा