माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ जानेवारी, २०१२

श्रावणात घन निळा बरसला!

’श्रावणात घन निळा बरसला’ कविवर्य मंगेश पाडगांवकरांचे शब्द,खळेसाहेबांची चाल आणि लतादिदींचा आवाज...असा त्रिवेणी संगम साधला गेलेले हे गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक आहे...हेच गीत प्रभाकर जोग ह्यांनी त्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलंय...जोगसाहेबांनी हे गीत त्याची लय वाढवून वाजवलंय...म्हणून मी त्याची लय कमी करून मूळ गीताच्या लयीशी मेळ खाईल अशी ठेवलेय...खरंतर,हे गीत माझ्यासारख्याच्या भसाड्या आवाजासाठी मुळीच नाहीये ह्याची मला पूर्ण कल्पना आहे..तरीही हे गीत मला खूप आवडते म्हणून जसे जमेल तसे गायचा प्रयत्न केलाय...मूळ गीताशी त्याची तुलना होणे शक्यच नाही आणि कुणी करूही नये..तेव्हा मी निदान दोन-पाच टक्के जरी व्यवस्थित गाऊ शकलो असे आपणास वाटले तरी केलेला प्रयत्न सार्थकी लागला असे वाटेल...तर ऐका...खरंच सांगतो..हे गीत माझ्या आवाजात ऐकायला सिंहाची छातीच हवी. :D
नवीन वर्षातले माझे हे तिसरे रूळ-गायन आहे

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

ekdam besur, talacha kahi patta nahi.u need lot more practise.

प्रमोद देव म्हणाले...

बेसुर? नेमकं कुठे जाणवतंय..काही सांगू शकाल का?
माझं गायन बेताल असू शकतं..हे मी देखील मान्य करतो..कधीतरी एखाद्या ठिकाणी बेसूरही होऊ शकतं..पण पूर्ण गाणं बेसूर? थोडं सविस्तर मार्गदर्शन करू शकाल का?
गाण्याचा सराव अजून करायला हवा ह्या आपल्या मताशी पूर्णपणे सहमत!त्या दृष्टीने नक्कीच मेहेनत घेईन.