माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ नोव्हेंबर, २०११

हिवाळी अंक २०११ संबंधीचे निवेदन!

दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या अंकासाठी आपले उत्तमोतम साहित्य पाठवावे असे आम्ही आपणास आवाहन करत आहोत...
साहित्य कोणते असावे?
साहित्याला  विषयाचे/प्रकाराचे कोणतेही बंधन नाही ... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/विनोदी/प्रवासवर्णन/चरित्र/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि कोणत्याही विषयावरील लेखन चालेल.. त्याच बरोबर ध्वनीमुद्रण(अभिवाचन.. कविता अथवा लेखाचे),ध्वनीचित्रमुद्रण,छायाचित्रण आणि व्यंगचित्र अशा प्रकारचं  साहित्यही ह्या अंकासाठी आपण पाठवू शकता.

काही अटी आणि नियम:
  केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन अंकात प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही. जरूर तिथे संबंधित साहित्यिकाशी बोलून निर्णय घेतला जाईल.

अहो, आम्हालाही ह्या अंकात भाग घ्यायचाय, पण खरंच सांगतो/सांगते नवीन लिहायला अजिबात वेळ नाहीये हो..जुनं अजिबात चालणार नाही का?

नवीन लिहायला वेळ नाही...हरकत नाही...मग आपले जुने लेखनही चालेल.
अरेच्चा,वर तर म्हणताय की केवळ नवे आणि ताजे लेखन हवंय आणि इथे म्हणता जुनेही चालेल...नीट काय ते सांगा ना!
थांबा,थांबा मंडळी! असे एकदम अंगावर येऊ नका....सांगतो...नीट वाचा.  :)
जुने लेखनही चालेल, पण, त्याचे स्वरूप बदलून,बरं का...म्हणजे कसे? सांगतो....आपल्याच कोणत्याही जुन्या लेखाचे/कवितेचे अभिवाचन/गायन करून आपण ते आम्हाला पाठवू शकता...पाठवतांना कृपया तसा उल्लेख मात्र करावा.साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.


ह्या अंकाबाबत आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
jaalarangaprakaashana@gmail.com

साहित्य पाठवताना हिवाळी अंक २०११साठी असे लिहून पाठवावे.
आपले साहित्य आमच्याकडे पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे २१ डिसेंबर २०११

चला तर मग आता लागा तयारीला आणि आपले साहित्य आमच्याकडे ठरलेल्या मुदतीत पाठवायला विसरू नका.

२५ नोव्हेंबर, २०११

जाऊं कहां बता ऐ दिल!

छोटी बहन ह्या जुन्या सिनेमातील स्वर्गीय मुकेश ह्याने गायलेले हे गीत माझ्या आवाजात काराओके रुळाच्या साथीने कसं वाटतंय ते ऐकून सांगा.

१७ नोव्हेंबर, २०११

आ लौटके आजा मेरे मीत!

हिंदी सिनेसंगीतातले हे जुने गाणे स्वर्गीय मुकेशच्या आवाजात आपण कैक वेळेला ऐकलेले असेल....आता एका वेगळ्या आवाजात ऐका...जमलंय/फसलंय हे तुम्हीच ठरवा.१५ नोव्हेंबर, २०११

कानडा राजा पंढरीचा!

माझे दोन आवडते गायक..सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेले ’कानडा राजा पंढरीचा’ हे गीत माझे अतिशय आवडते असे आहे..आज पंडितजींच्या कृपेने त्या गाण्याचा रूळ मिळाला..मग काय, मी देखिल माझी गायनाची गाडी पळवली त्यावरून..एकदम भरधाव! :)१४ नोव्हेंबर, २०११

देहाची तिजोरी!

आम्ही जातो आमुच्या गावा ह्या चित्रपटातील एक गाजलेले गीत..देहाची तिजोरी...त्याचा रूळ(ट्रॅक) मिळाला..मग काय केला प्रयत्न त्याबरोबर गायचा...आता तुम्हीच ऐका आणि ठरवा..कितपत जमलाय/फसलाय ते!
७ नोव्हेंबर, २०११

स्वर आले दुरुनी!

सुगम संगीतातला माझा आदर्श असलेले सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके तथा बाबुजी ह्यांची गाणी ऐकतच मी लहानाचा मोठा झालोय. ह्याआधी त्यांनी गायलेले ’तोच चंद्रमा नभात’ ट्रॅकबरोबर गाण्याचा प्रयत्न केला...तो बराच यशस्वी झाला अशा प्रतिक्रिया मिळाल्यामुळे ह्यावेळी त्यांच्याच एका गीताचे पुन्हा गायन करण्याची हिंमत करतोय. प्रभाकर जोग हे ह्या गीताचे संगीतकार आहेत आणि मी त्यांच्याच ’गाणारे वायोलिन’चा ट्रॅक वापरूनच हे गाणं गायलंय...पाहा आपल्याला आवडतंय का?
२ नोव्हेंबर, २०११

तोच चंद्रमा नभात

बर्‍याच दिवसांपासून ’तोच चंद्रमा’चा ट्रॅक पडून होता...अचानक झटका आला..म्हटलं पाहूया आपल्यालाही त्यासोबत गाता येतंय का ते...दोन तीन वेळा प्रयत्न केला आणि जमले की हो...आधी केवळ ध्वनीमुद्रण केले होते...मग आता सरळ ध्वनीचित्रमुद्रणच केलं..ऐकून/पाहून सांगा आवडला का हा प्रयत्न?
हे ध्वनीचित्रमुद्रण वेबकॅमद्वारे थेट युट्युबवर केलंय...ध्वनी आणि ओठांच्या हालचाली ह्यांमध्ये मला बराच फरक आढळतोय...आधी आवाज येतोय आणि मग तोंड हलतंय...ह्याबाबतची सुधारणा कशी करायची..कुणी सांगू शकेल काय?