माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ नोव्हेंबर, २०११

तोच चंद्रमा नभात

बर्‍याच दिवसांपासून ’तोच चंद्रमा’चा ट्रॅक पडून होता...अचानक झटका आला..म्हटलं पाहूया आपल्यालाही त्यासोबत गाता येतंय का ते...दोन तीन वेळा प्रयत्न केला आणि जमले की हो...आधी केवळ ध्वनीमुद्रण केले होते...मग आता सरळ ध्वनीचित्रमुद्रणच केलं..ऐकून/पाहून सांगा आवडला का हा प्रयत्न?
हे ध्वनीचित्रमुद्रण वेबकॅमद्वारे थेट युट्युबवर केलंय...ध्वनी आणि ओठांच्या हालचाली ह्यांमध्ये मला बराच फरक आढळतोय...आधी आवाज येतोय आणि मग तोंड हलतंय...ह्याबाबतची सुधारणा कशी करायची..कुणी सांगू शकेल काय?




४ टिप्पण्या:

Meenal Gadre. म्हणाले...

गायन track वर जमले आहे. आवडले.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद मीनल.

राकेश दिनेश शेन्द्रे म्हणाले...

मस्त झालय सर ......

अंधार असल्यामुळे , चेहरा बरोबर दिसत नाहीये .

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद राकेश!
आता ह्या वयात कुठून दिवे लावणार...म्हणून अंधार आहे. ;)