माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२२ एप्रिल, २०२१
९ मार्च, २०२१
४ डिसेंबर, २०१९
१ नोव्हेंबर, २०१९
८ सप्टेंबर, २०१८
२२ मार्च, २०१७
१२ मार्च, २०१७
५ मार्च, २०१७
३ मार्च, २०१७
२ मार्च, २०१७
१ मार्च, २०१७
२८ फेब्रुवारी, २०१७
२७ फेब्रुवारी, २०१७
२२ फेब्रुवारी, २०१७
१६ ऑगस्ट, २०१४
गणपती गजानना!
एक छोटीशी कविता...अशीच काही अक्षरं जोडून केलेली. :)
मी आधी जी रचना केली होती ती अशी होती...
गजानना, गजानना
स्वीकारावी अमुची वंदना
मोरेश्वरा गौरीकुमरा
आम्हावरी सदैव कृपा करा
त्यानंतर मला ह्याच गीताला गुजराती पद्धतीने चाल लावाविशी वाटली म्हणून थोडा बदल करून काही ओळीही मी त्यात वाढवल्या.
गणपती, गजानना,
हेरंबा, भालचंद्रा
स्वीकारावी आमुची वंदना
गिरिजाकुमरा, मोरेश्वरा
गणनाथा, सिद्धेश्वरा
आम्हावरी सदैव कृपा करा
थोडीशी गुजराती भजनाच्या धाटणीची अशी ही चाल तयार करण्यासाठी खरे तर गुजराती पद्धतीचा ढोल मला हवा होता...पण त्याऐवजी जालावर ’पुणे ढोल’ मिळाला...त्यामुळे ही चाल ऐकतांना मराठी आणि गुजराती...अशा दोन्हींचा मिलाफ त्यात आढळून येईल असे मला वाटते.
इथे चाल ऐका....आणि जमल्यास प्रतिक्रियाही नोंदवा.
मी आधी जी रचना केली होती ती अशी होती...
गजानना, गजानना
स्वीकारावी अमुची वंदना
मोरेश्वरा गौरीकुमरा
आम्हावरी सदैव कृपा करा
त्यानंतर मला ह्याच गीताला गुजराती पद्धतीने चाल लावाविशी वाटली म्हणून थोडा बदल करून काही ओळीही मी त्यात वाढवल्या.
गणपती, गजानना,
हेरंबा, भालचंद्रा
स्वीकारावी आमुची वंदना
गिरिजाकुमरा, मोरेश्वरा
गणनाथा, सिद्धेश्वरा
आम्हावरी सदैव कृपा करा
थोडीशी गुजराती भजनाच्या धाटणीची अशी ही चाल तयार करण्यासाठी खरे तर गुजराती पद्धतीचा ढोल मला हवा होता...पण त्याऐवजी जालावर ’पुणे ढोल’ मिळाला...त्यामुळे ही चाल ऐकतांना मराठी आणि गुजराती...अशा दोन्हींचा मिलाफ त्यात आढळून येईल असे मला वाटते.
इथे चाल ऐका....आणि जमल्यास प्रतिक्रियाही नोंदवा.
१३ जून, २०१४
पाऊस म्हणाला...
पाऊस सुरु होऊन काही तास उलटले तरी अजूनही एकही पावसावरची कविता कशी आली नाही ह्याचे आश्चर्य वाटतंय...मग म्हटले आपणच करून टाकूया एखादी कविता...हं तर, वाचा...
पाऊस म्हणाला, येऊ का रे
मी म्हणालो, बिनधास्त ये रे
तो म्हणाला, भिजशील तू
आणि आजारीही पडशील तू
मी म्हणालो, हरकत नाही,
आपण पहिल्यांदा भेटण्याची
गंमत काही औरच असते, नाही!
पाऊस म्हणाला, येऊ का रे
मी म्हणालो, बिनधास्त ये रे
तो म्हणाला, भिजशील तू
आणि आजारीही पडशील तू
मी म्हणालो, हरकत नाही,
आपण पहिल्यांदा भेटण्याची
गंमत काही औरच असते, नाही!
२५ जुलै, २०१०
पावसाचे गाणे
ही कविता मी चक्क पाडलेय...आपल्याला का नाही जमत बरं कविता? असा विचार करत करत शब्द एका पाठोपाठ मांडत गेलो,पुसत गेलो,पुन्हा मांडत गेलो आणि त्यानंतर जे काही तयार झालं ते आपल्या पुढे ठेवलंय. आता तुम्हीच ठरवा की ह्याला कविता म्हणायच की नाही ते.
७ जून, २०१०
चारोळी
आज सकाळी व्यायामशाळेतून येतांना अचानक...काहीही ध्यानी-मनी नसतांना मला ही चारोळी स्फुरली.
ती वळवाच्या सरीसारखी अचानक येते ।
खुलवते वातावरण स्नेहार्द्र नजरेतून ।
बरसते अखंड बडबडीतून आणि ।
आली तशीच, अचानक निघून जाते ।।
ती वळवाच्या सरीसारखी अचानक येते ।
खुलवते वातावरण स्नेहार्द्र नजरेतून ।
बरसते अखंड बडबडीतून आणि ।
आली तशीच, अचानक निघून जाते ।।
२० ऑक्टोबर, २००९
दिवाळीचा सण!
मित्रहो,पुन्हा एकदा शब्दांची जुळवाजुळव करून अट्टाहासाने एक कविता केलेय आणि ते कमी म्हणून की काय तिला चालही लावलेय. तेव्हा कविता वाचा आणि ऐका बरं का!
आला दिवाळीचा सण आला
हासू नाचू खेळू चला॥धृ.॥
अंगणात काढा रांगोळी
पणती उजळेल दिवाळी ।
आकाशकंदील चढवू चला
फराळ मिळूनी करू चला ॥
इथे चाल ऐका.
आला दिवाळीचा सण आला
हासू नाचू खेळू चला॥धृ.॥
अंगणात काढा रांगोळी
पणती उजळेल दिवाळी ।
आकाशकंदील चढवू चला
फराळ मिळूनी करू चला ॥
इथे चाल ऐका.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)