माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ मे, २००९

कृतार्थ!

ही माझी दुसरी कविता. शब्दांची मोडतोड करून जोडलेली. जमलेय का सांगा.

मी,हासत हासत जगलो
अन्‌ हसता हसता मेलो

बालपणाची गंमत न्यारी
आठवणींचा खजिना भारी
खेळातील आनंद पाहुनी
खेळातच परी रमलो ॥

तरूणाईचा जोश अनोखा
ज्यात सखीचा जाहलो सखा
शृंगाराच्या मत्त लीलांनी
रतीरंगातच रमलो ॥

वृद्धपणाची सांज सावळी
जीवनगंगा कृतार्थ झाली
मोद म्हणे संसारसागरी
आत्मानंदी तरलो ॥


चाल इथे ऐका.


ही नव्याने लावलेली चाल ऐका. ही चाल दिनांक १८ जून २०११ ह्या दिवशी ध्वनीमुद्रित केलेय.
ही चाल दिनांक २१/२२ जून २०१२ रोजी  थेट ध्वनीमुदित केलेय...चाल जशी सुचत गेली तसा गात गेलोय....मागे तालही घेतलाय मदतीला...ऐकून सांगा आवडली की नावडली .

९ टिप्पण्या:

Dk म्हणाले...

व्वा! बहोत ही बढिया :)

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद दीपक!

जयश्री म्हणाले...

देवकाका......तुस्सी तो छा गये :)
खूपच मस्त झालीये कविता.
लयबद्ध.....!!
कवितेतला"मोद"... "अत्यानंद" देऊन गेला :)

vijay kumar sappatti म्हणाले...

hi

i visited first time on your blog .

This is really one of the great work , i cam e across. I really liked this poem.

mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.

thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com

regards

vijay

प्रमोद देव म्हणाले...

जयश्री,विजय तुम्हा दोघांचे मन:पूर्वक आभार!

Meenal Gadre. म्हणाले...

भाव/अर्थपूर्ण कविता आहे.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद मीनल.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

नमस्कार काका.
कविता छानच झालीये. माफ़ करा पण मला चाल नाही आवडली. खुप संथ झालीये. कवितेचा रंग तारुण्याचा आहे त्याला चालीचा संथपणा नाही सुट होतय. शेवटचे कडवे मात्र अप्रतिम झालेय. आगाऊपणाबद्दल क्षमस्व !

प्रमोद देव म्हणाले...

कोणत्या चालीबद्दल म्हणतो आहेस तू विशाल? दोन्ही?