माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

६ जानेवारी, २०१२

चौदवीका चांद हो...

माझ्या बालपणात बिनाका-मालावर लागणार्‍या त्या काळच्या सुप्रसिद्ध आणि अवीट गोडीच्या गाण्यांपैकी एक हे...चौदवीका चांद हो...मोहम्मद रफीने काय नखरेलपणे हे गाणे गायलंय...आज इतक्या वर्षांनी मला ह्या गाण्याचा रूळ सापडला आणि मग मीही माझं नरडं साफ करून घेतलं...मंडळी..एक सांगायचंच राहिलंय..मी तसा तालात मुळातच कच्चा आहे त्यामुळे ह्या गाण्याबरोबरच इतर गाण्यातही बरेचसे ’हलेडुले’ झाले असण्याची दाट शक्यता आहे..तेव्हा विनंती आहे की ज्यांना ताल कळतो त्यांनी इथे मी गायलेल्या गाण्यातल्या त्या चुका अगदी बिनधास्तपणे सांगाव्यात...नेमक्या जागा सांगितल्या तर अजूनच मदत होईल मला...असो,आता गाणं ऐका.


आधीच्या गाण्यात थोडी सुधारणा केली आहे...खरंच तशी ती झालेय का? ऐकून सांगा.

७ टिप्पण्या:

mynac म्हणाले...

प्रयत्न सुंदर आहे फक्त थोडी घाई होत असल्याने ताल नि गाणे थोडे वेगळे होते.पण सरावाने नक्कीच सुधारणा होऊ शकते ह्यात शंका नाही.एकूण अनुभव मात्र नक्कीच स्तुत्य.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद मायनाक...अहो आयुष्यभर ह्या तालाशी झुंजतोय..पण तो काही वश होत नाहीये. :(
तरीही आपण आवर्जून गाणं ऐकताय हेही माझ्यासाठी विशेष आहे.

mynac म्हणाले...

खरे तर मी सुद्धा काही गायक बियक नाही पण ऐकायला मात्र जरूर आवडते.तसेच हा प्रकार (रूळ) हा मला नवीन असल्याने जास्त मजा येते.या वेळच्या गाण्याची सुरुवात मात्र झकासच झाली आहे नि गाण्यात नक्कीच गोडवा उतरलाय.समेवर येताना थोडी तारांबळ उडणे स्वाभाविक असते कारण आपण सगळे कानसेन म्हणून जास्त तयार असतो पण तानसेन म्हणून आपली त्या दृष्टीने तयारी नसणे हे अगदी स्वाभाविक असते./आहे.पण हौसेला नि आनंदाला मोल नसते.आपण अतिशय मेहनत घेऊन हा प्रकार खरोखरच्या अत्यानंदाने आम्हा समोर पेश करता त्याला ही खरे तर मना पासूनची दाद आहे. आपणास आपल्या येणाऱ्या नवीन गाण्यांसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद मायनाक! माझीही रूळ ह्या प्रकाराशी हल्लीच ओळख झालेय...माझं नेहमीच गाणं हे कवितेच्या भाषेत सांगायचं तर... वृत्तबद्ध कविता करता येत नाहीत म्हणून काही लोक मुक्तछंदात कविता करतात...माझं गाण्याच्या बाबतीत तसंच आहे..तालात गाता येत नाही म्हणून मी सहसा (ताल)मुक्त गातो...आता हे रूळ प्रकरण हाताळतांना आपण पाहताच आहात माझी तालाशी चाललेली दंगामस्ती. ;)

mynac म्हणाले...

आणि हो महत्वाचे सांगायचे राहले कि ह्या वेळच्या गाण्याला स्टीरिओ इफेक्ट असल्याने/आल्याने ते आधीच्या तुलनेत जास्त श्रवणीय झाले आहे.आपल्या रेकॉर्डींगच्या पद्धतीत केलेल्या बदला मुळे का कशा मुळे तो इफेक्ट आपण आणलाय ते माहित नाही पण ऐकायला मस्त वाटत.आधीची गाणी जास्त मोनो वाटतात.

mynac म्हणाले...

अशी किंवा ह्या प्रकारची ठेक्या वरील गाणी गाताना जर आपण बसतो त्या खुर्चीवर हलक्या हाताने त्या मूळ ठेक्या सोबतच ठेका धरता आला तर काही फरक पडू शकतो का ते ही कृपया तपासावे.ह्याने कदाचित ठेका व गाणे जास्त व्यवस्थित मॅच होऊ शकेल असे वाटते.माहीत नाही पण जर विचार करण्या जोगे असल्यास हा ही एक प्रयत्न करून बघावा असे प्रेमाचे सांगणे,

प्रमोद देव म्हणाले...

मी सगळी गाणी एकाच पद्धतीने ध्वमु करत असतो तरी तसा फरक का पडला असेल...कल्पना नाही...हं, फक्त माईक बदलला होता काही गाण्यांसाठी...अर्थात दोन्हीही हेडफोनबरोबरचे माईकच आहेत.
हाताने ठेका धरायचा प्रयत्नही करून पाहिला पण मग सुराकडे दूर्लक्ष होतं...दोन गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करता न येणं हीच बहुधा माझी अडचण असावी.
असो...प्रयत्न सुरुच असतात...एक दिवस अशक्य ते शक्यही होईल. :)
आपल्या सूचनांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!