माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१४ ऑगस्ट, २०१०

’जालवाणी’ ह्या ध्वनीमुद्रित अंकाचे प्रकाशन!

मंडळी आज मला हे जाहीर करायला आनंद होतोय की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि साक्षीने जालवाणी हा पहिला-वहिला ध्वनीमुद्रित अंक प्रकाशित होत आहे. ह्या अंकात आपल्याला गद्य आणि पद्य अभिवाचन ऐकायला मिळणार आहे.

जालवाणीचा दुवा सगळ्यांसाठी... http://jaalavaani.blogspot.com/


ह्या अंकाचे मानकरी आहेत...संकेताप्रमाणे आधी स्त्रियांची नावं देतो.
१)मीनल गद्रे, २) कांचन कराई ३) श्रेया रत्नपारखी, ४)अपर्णा लळिंगकर, ५)अनुजा पडसलगीकर, ६)अनुजा मुळे उर्फ झुंबर, आणि ७) तन्वी देवडे

आता ह्यानंतर पाळी आहे पुरूष मानकर्‍यांची...
१)विनायक रानडे, २) महेंद्र कुलकर्णी, ३) नरेंद्र गोळे, ४)सुधीर काळे, ५)गंगाधर मुटे, ६)हेरंब ओक, ७) विद्याधर भिसे,८)सोमेश बारटक्के, ९)चेतन गुगळे,१०) अमोघ वाघ, ११)दिनेश कोयंडे,१२)विशाल कुलकर्णी,१३)रोहन चौधरी आणि १४) प्रमोद देव


मित्रांनो आणि मैत्रिणीनोही...
हा अंक तसा काही फार देखणा वगैरे नाहीये. जालनिशीच्या एकाच पानावर एकाच ठिकाणी सगळी ध्वनीमुद्रण ऐकण्यासाठी केलेली एक सोय....इतकेच ह्याचे दर्शनी स्वरूप आहे. तेव्हा पहिल्या प्रथम कदाचित आपला भ्रमनिरास झाला असे वाटू शकेल. :)
पण मंडळी, विश्वास ठेवा..जेव्हा आपण एकेक अभिवाचन ऐकू लागाल, तेव्हा आपले आधीचे मत नक्कीच बदललेले असेल...आपण निश्चितच तृप्त झालेले असाल...ह्याची मला खात्री आहे.

ह्या अंकाच्या निमित्ताने काही तांत्रिक गोष्टी मला शिकायला मिळाल्या हा माझ्यासाठीचा एक वैयक्तिक फायदा. ह्यापुढेही अशाच प्रकारचे अंक आम्ही काढत राहू, तंत्रज्ञान जेवढे आम्ही आत्मसात करू तेवढी त्यात अजून जास्त सफाई, देखणेपणा, आकर्षकपणा इत्यादि येईल ह्याबाबत माझ्या मनात शंका नाही.

जाता जाता एक सांगतो की अंकाला मिळणारा लेखक-अभिवाचकांचा प्रतिसाद सुरुवातीला अतिशय क्षीण असा होता...आणि नंतर हळूहळू वाढत आत्ता शेवटच्या क्षणी मात्र तो अचानक ढगफुटी व्हावा तसा येऊन आदळला. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की पुढच्या अंकाच्या वेळी कृपया असे होऊ देऊ नका. शेवटी आलेली अनेक ध्वनीमुद्रणं वेळेअभावी मी ह्यात समाविष्ट करू शकलेलो नाहीये ह्याबद्दल क्षमस्व...मात्र ही ध्वनीमुद्रण पुढच्या अंकात जरूर प्रकाशित होतील ह्याची खात्री बाळगा.

अजून एक जाता जाता सांगतो की...आमच्या दिवाळी अंकाच्या घोषणेकडे लक्ष ठेवून असा....लवकरच त्याबाबतचे निवेदन निघणार आहे.

मीनल गद्रे, कांचन कराई,विद्याधर भिसे ह्यांचे विशेष आभार एवढ्याचसाठी की त्यांनी...इतरांनाही आपला आवाज दिला.

संपादनाच्या छोट्यामोठ्या गोष्टीत साहाय्य केल्याबद्दल श्रेया रत्नपारखी ह्यांचेही विशेष आभार.

कळावे,

आता भेटूया...दिवाळी अंकासोबत.

६ टिप्पण्या:

महेंद्र म्हणाले...

प्रमोदजी
मनःपुर्वक अभिनंदन!
कथा डाउनलोड करता येत नाहीत. काहीतरी करायला हवे.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

देका संपादक, लेखक, अभिवाचक मंडळी अभिनंदन आणि धन्यवाद दोनही!

tanvi म्हणाले...

स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा.....
अंक आत्ताच पाहिला... सुंदर झाला आहे!!!

देवकाका आभार आणि कौतूक आहेच...

Anuja म्हणाले...

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !!! अंक खूप छान झाला आहे. अभिनंदन!!!!

प्रमोद देव म्हणाले...

महेंद्रजी,अपर्णा,तन्वी आणि अनुजा...आपणा सगळ्यांना धन्यवाद.
महेंद्रजी....प्रत्येक विजेटवर उजवीकडे जिथे divshare असं लिहिलंय...त्यावर टिचकी मारा म्हणजे जो दुवा उघडेल तिथून ते संबंधित अभिवाचन तुम्ही तुमच्या संगणकावर उतरवून घेऊ शकता.

अनामित म्हणाले...

देका आज सकाळी कामावर जायच असल्याने काल रात्री फ़क्त पहिल अभिवाचन वाचल (सैनिकहो) एकदम भारी झाल आहे ते...आता हळुहळु वाचुन कमेंटतोच तिथे ...तसाही एकदाच ऐकुन संपवायचा नाहिये मला तो अंक...तुमच अभिनंदन.. तुम्ही सशक्त पुढाकार घेउन असे वेगवेगळे प्रयोग करता ही खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे...