माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ ऑगस्ट, २०१०

छोटेखानी कट्टा.















मंडळी आपले सगळ्यांचे स्नेही , पुण्यनगरी निवासी श्री. सुरेश पेठेसाहेबांचे मुंबईत आगमन झालेले आहे. आज त्यांचे माझ्या घरी येण्याचे नक्की झाल्यावर आपले तरूण मित्र सुहास झेले आणि सचिन उथळे-पाटील ह्यांनाही त्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले गेले.

आज दुपारी दोनच्या सुमारास पेठेसाहेबांचे माझ्या घरी आगमन झाले; थोड्याच वेळात  सचिन आणि सुहासही येऊन दाखल झाले.














थोडा वेळ नमस्कार चमत्कार आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग विषय साहजिकच आपल्या बझ आणि बझकरांकडे वळला. बझकरांबद्दल बोलतांना साहजिकच बोलणे खादाडीवर येऊन ठेपले आणि मग काय खानपानाला सुरुवात झाली. आधी पेठेसाहेबांनी खास पुण्याहून आणलेल्या चितळ्यांच्या बाकरवडीचा समाचार घेणे सुरु झाले....त्या पाठोपाठ कांद्याचा खाकरा(मालाडमध्ये फक्त एकाच दुकानात मिळतो बरं का!), मग बेसन लाडू,पातळ पोह्यांचा















चिवडा असे एकामागून एक पदार्थ येत राहिले आणि गप्पांची मैफलही उत्तरोत्तर रंगत गेली. त्यानंतर शेवटी मसाले-चहाने खादंती यज्ञ समाप्त झाला. गप्पांच्या नादात सुहासने आणलेले श्रीखंड मात्र खायचे राहूनच गेले.  :(

त्यानंतर माझ्या लग्नाचा छायाचित्रसंग्रह दाखवण्याचा/पाहण्याचा कार्यक्रम झाला. छायाचित्रं पाहतांना सगळ्यांमध्ये विशेष औत्सुक्य जाणवत होतं...विशेष करून तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी ह्यातला लक्षणीय बदल पाहतांना.  :D

ह्या दरम्यान मधून मधून बझकडे पाहणे सुरु होते. कोण काय बोलतंय,कोण काय म्हणतंय ह्यावर सुहास आणि सचिन बारीक लक्ष ठेवून होते.  ;)

साधारण पाचच्या सुमारास मग गप्पांचा भर ओसरल्यावर आम्ही सगळे बाहेर गेलो...खास सुहास आणि सचिनसाठी कांदा खाकरा खरेदी साठी. सुदैवाने त्यांना दोघांना प्रत्येकी एकेक पुडा मिळाला आणि दोघांचे चेहरे एकदम प्रफुल्लित झाले.  :)

त्यानंतर सचिन आणि सुहास मालाड रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले...पुढे बोरिवलीला जाऊन तिथून एसटी पकडून सचिनला आपल्या बहिणीकडे ठाण्याला रक्षाबंधनाचाठी जायचे  होते...त्याला एसटीत व्यवस्थित बसवून देण्याची जबाबदारी सुहासवर सोपवली गेली होती.    ;)                                                                                                                                 













त्यानंतर मी आणि पेठेसाहेब पुन्हा माझ्या घरी आलो. पेठेसाहेबांना  जालनिशीबद्दलच्या काही बाबी माहिती करून घ्यायच्या होत्या...मला जितकी माहिती होती ती मी त्यांना दिली. त्यानंतर साधारण साडेसहाला पेठेसाहेब गमनकर्ते झाले. अशा तर्‍हेने आमचा एक छोटेखानी कट्टा अतिशय मनमोकळ्या वातावरणात पार पडला.













      
सर्व छायाचित्रं पेठेसाहेबांच्या प्रग्राने(प्रतिमा ग्राहकाने) काढलेली आहेत.


अवांतर: कॅमेरासाठी प्रतिशब्द प्रतिमा ग्राहक...आपले मित्र विनायक रानडे ह्यांनी अतिशय नेमका शब्द मराठीत रुजवल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

७ टिप्पण्या:

सागर म्हणाले...

सुझे पुण्याला येताना तो कांदा खाकरा घेवून येणे

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

काका, खुर्च्या पाहायच्या राहूनच गेल्या कि. :(

tanvi म्हणाले...

मस्त देवाच्या दरबारी हजेरी.... देवकाका पुढच्या वेळेस भारतात आले की आपण सगळे पुन्हा एक गप्पा महफिल करू या... पेठे काकांशी पण बोलायला हवेय....

प्रमोद देव म्हणाले...

कांदा खाकर्‍यासाठी सागराचा प्राण तळमळला. ;)
सचिन, पुन्हा केव्हातरी करू ते.
तन्वी,जरूर करूया तसा कट्टा.मलाही आवडेल त्यात सहभागी व्हायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

वृत्तांताबद्दल धन्यु........!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

तुम्ही मला श्रीखंडाचं सांगितलं नव्हतंत. :-|

अचानक माहिती मिळाल्यामुळे येऊ शकले नाही. पुढच्या वेळी जमवण्याचा अवश्य प्रयत्न करेन. मला पण तुमच्या लग्नाचा छायाचित्रसंग्रह दाखवा.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद बिरुटेसाहेब आणि कांचन.
कांचन श्रीखंड सुहासने आणले येतांना...त्यामुळे ते मलाही आधी माहीत नव्हते.
केव्हाही ये...तुलाही दाखवेन माझा लग्नाचा छाचिसंग्रह.