माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ मे, २०११

नक्की कोण मेलं?


ओसामा की ओबामा?
काही वृत्तवाहिन्यांवरील मोडक्या बातम्या(ब्रेकिंग न्यूज)....म्हणजे मोडून तोडून टाकलेल्या बातम्या पाहिल्या/वाचल्या की खरंच प्रश्न पडतोय की नेमकं कोण मेलं? ओबामा की ओसामा? की ह्यांच्यापैकी कुणीच नाही...केवळ दुसर्‍यांदा ओबामांनी अध्यक्ष म्हणून निवडून यावं आणि आपली घटणारी लोकप्रियता सावरावी इतकाच उद्देश आहे ह्या बातमीचा?
ओसामा बिन लादेन मेला..ह्या नुसत्या बातमीनेही भल्याभल्यांची बोबडी वळलेली दिसतेय....अक्षरशः बोबडे झालेत वृत्त-निवेदक! ओसामा-ओबामा,ओबामा-ओसामा...हे 'कच्चा पापड-पक्का पापड' सारखे पुनःपुन्हा बोलून पाहा . काय होतंय? जीभ चाचरते ना? अगदी तसंच झालंय ह्या वृत्त-निवेदकांचं....म्हणूनच बहुधा बातम्यांमध्ये नावं देखील उलटसुलट झाली असावीत.

मारा गया ओसामा....ओबामाके सिरपर गोली लगी!
ओबामा बिन लादेन डेड!
कल ऑपरेशनमें मारा गया लादेन; ओबामा की मौतसे राहत-ब्रिटेन!


ह्या बातम्या काय दर्शवतात?

इतक्या वेळ डोळ्यांनी पाहिले...आता इथे आपल्या कानांनीही ऐका....आणि सांगा..नक्की कोण मेलं? ओबामा की ओसामा?


२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

After 18th March almost 2 months no updates on your blog. I hope you are doing well and please do not keep your readers waiting for so long.

Unknown म्हणाले...

डोळस देव! कानस शब्द असेल का हो? तुमच्या दृक श्राव्य क्षमतेने योग्य परिक्षण केले आहे. पूर्वानुभवाने सध्या अनुभवलेल्या परीक्षण केलेल्या तुमच्या आवडीच्या मधुराने काढलेल्या प्रतिमा इथे डकवा की हो जरा!