मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे दुसरा होळी विशेषांक २०११.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं/विनोदी स्वरूपाचं अभिवाचन/प्रहसन वगैरे पद्धतीचे लेखन/ध्वनीमुद्रण अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.एखाद्याने पाठवलेल्या साहित्यात काही आक्षेपार्ह/संदर्भहीन मजकूर असल्यास त्याच्याशी वैयक्तिक संपर्क साधून साहित्यात योग्य तो बदल करून देण्याची विनंती करण्यात येईल.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही बदल करण्यास नकार दिल्यास नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... १२ मार्च २०११ (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता attyanand@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले साहित्य.
खास आकर्षण:ह्या अंकाचं संपादकीय आपले सगळ्यांचे मित्र श्री जयंत कुलकर्णी हे लिहिणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा