माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० जानेवारी, २०१०

होळी विशेषांक!

मित्र-मैत्रिणींनो लक्ष देवून वाचा.
शद्बगाऽऽऽरवा ह्या हिवाळी विशेषांकानंतर आम्ही आणत आहोत होळी विशेषांक.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं वगैरे पद्धतीचे लेखन अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... १९फेब्रुवारी २०१० (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता attyanand@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले सहित्य.

६ टिप्पण्या:

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

श्री. प्रमोद देव जी,
बहुत अच्छे। होळीच्या दिवशीचा भांगेचा प्रताप लिहियला सुरसुरी आली आहे. नाडी ग्रंथावरील कार्यशाळेच्या कामात गुंतलो आहे.
पाठवीन सवडीने.

शशिकांत ओक

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

लेखन पाठवते. काका, कुठे आहात?

Unknown म्हणाले...

नमस्कार श्री. प्रमोद,
आपणास "ब्लॉग माझा" प्रमाणपत्र मिलाल्याबध्दल अभिनंदन.
होळी माझा आवडीचा सण. लेखन पाठवून होळी जरूर साजरी करेन.
धन्यवाद,
रेमी डिसोजा

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद ओकसाहेब,कांचन कराई आणि रेमी.
आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा होतीच.

Datta Kale म्हणाले...

Blog Mazya 2009-10 che Paaritoshik milalyabaddal aaple Abhinandan. Mi Holi Visheshankasathi sahitya pathvinar aahe.

datta kale

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद दत्ताजी.
मी वाट पाहतो.