माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२० नोव्हेंबर, २००९

’स्टार माझा’चे आभार!

मित्रहो गेल्यावर्षीप्रमाणे ह्या वर्षीही ’स्टार माझा’ ह्या वाहिनीने घेतलेल्या ’ब्लॉग माझा’ ह्या स्पर्धेत मी भाग घेतला होता.
आज सकाळी जीमेल मधील पत्रव्यवहार पाहताना एक वेगळेच पत्र दिसले. ते होते श्रीयुत प्रसन्न जोशी ह्यांचे. त्यात त्यांनी स्पर्धेचा निकाल पाठवलेला होता.

निकालात बरीच परिचित नावं दिसत होती. स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवणारी नीरजा पटवर्धन(नीधप).
विशेष उल्लेखनीय म्हणून ज्यांना पारितोषिकं मिळाली आहेत त्यातले हरिप्रसाद भालेराव(छोटा डॉन),देवदत्त गाणार(देवदत्त), राजकुमार जैन(राजे), दीपक कुलकर्णी(कुलदीप) आणि आनंद घारे(आनंदघन).
ही सगळी नावं आणि एकूणच पत्रातला सगळा मजकूर इंग्लीशमध्ये असल्यामुळे वरील सगळी नावं एकदोनदा वाचल्यावरच कळली. :)
पण त्यात अजून एक नाव दिसत होते....जे मला कुठे तरी ऐकल्यासारखे वाटत होते...पण ती व्यक्ती नेमकी डोळ्यासमोर येत नव्हती. इंग्लीशमध्ये स्पेलिंग लिहिलेले होते...पीआरएएमओडी डीइव्ही.
बराच वेळानंतर प्रकाश पडला की ते नाव....माझेच होते. ;)
मी माझ्या देव आडनावाचे डीइओ असे स्पेलिंग करतो त्यामुळे कुणी त्याचे डीइव्ही असे केले तर ते मला नेहमीच अनोळखी वाटत असते.

ह्यातला विनोदाचा भाग सोडला तर एक सांगेन ते म्हणजे ह्यावर्षी मला पारितोषिक मिळेल असे मी अजिबात गृहित धरलेले नव्हते...गेल्या वर्षी मात्र का कुणास ठाऊक पण ठाम खात्री होती. :D आणि गंमत म्हणजे गेल्या वर्षी न मिळता पारितोषिक अचानक ह्यावर्षी मिळाले...हे देखिल थोडे धक्कादायक वाटले. :D
मध्यंतरी ही स्पर्धाच रद्द झाली अशी माहिती एका मित्राकडून मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर तर आज आलेला निकालाचा मेल अजून जास्त धक्कादायक वाटला. असो. तरी देखिल आपला समावेश पारितोषिक पात्रांमध्ये झाला हे वाचून इतके दिवस जे काही वेडेवाकुडे लिहिले त्याची कुणीतरी दखल घेतंय ह्याची जाणीव झाली आणि बरंही वाटलं.
मराठीतून,तेही देवनागरीतून लिहीणार्‍या....लिहू शकणार्‍या ब्लॉगर्सना इंग्लीशमधून...म्हणजे लिपीही रोमन आणि मजकूरही इंग्लीशमध्ये... हा निकाल पाठवण्याचे कारणच काय?
तर, खुलाशात असं लिहिलेलं आढळलं....की एखाद्याच्या संगणकात देवनागरी फॉंट न दिसण्याची अडचण असू शकते. मला काही हे पटलं नाही. देवनागरीतून अट्टाहासाने लिहीणार्‍यांकडे अशी अडचण असणारच नाही असे माझे मत आहे. अर्थात....कुणी सांगावं ते म्हणतात तसे काही लोक असतीलही.....पण ते तसे असतील तर माझी त्यांना नम्र विनंती की...आपल्या संगणकाला काँप्लेक्स स्क्रीप्ट्सचा पाठिंबा आहे की नाही ते तपासून पाहावे आणि तो तसा नसल्यास सर्वप्रथम तो स्थापित करून घ्यावा.
अधिक काय सांगू?

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मला पारितोषिक ’पात्र’ ;) ठरवल्याबद्दल स्टार माझाचे मन:पूर्वक आभार.

१७ टिप्पण्या:

नानाशास्त्री म्हणाले...

अभिनंदन. तुमचा ब्लॉग फार्च छान आहे. तुम्ही हे असं इत्कं छान कसं करू शकता? हेव वाटतो तुमचा. त असो. तुम्हाल अशी उदंड पारितोषके मिळोत आणि त्यासाठी उदंड आयुष्य लाभो.उदंड उत्साह लाभो आणि, आपलं ते हे, जे काय असेल ते उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड लाभो अशी या देवासाठी त्या देवाकडे प्रार्थना.

प्रमोद देव म्हणाले...

:)
धन्यवाद नानाशास्त्री.

Dk म्हणाले...

स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक अभिनंदन!!!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद दीपक.
ह्याच स्पर्धेतल्या यशाबद्दल तुझंही सहर्ष अभिनंदन!

माझी दुनिया म्हणाले...

अभिनंदन देवबाप्पा !

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद मादु!

Harsha म्हणाले...

Congrats!!
Its always a delight to read your blog. No wonder you won the prize.

BTW, long time since your last posting.

To quote Oliver Twist, 'Please, sir, I want some more!!'

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद हर्ष!
आपल्या प्रतिक्रियेने नक्कीच हुरूप आला.
लवकरच नवीन काही वाचायला मिळेल असे आश्वासन देतो.

paps sapa म्हणाले...

Abhinandan...
Aapla blog faar chan aahe..
keep posting..:)

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद तारकरांच्या पप्या! :)

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

अभिनंदन. आपल्या यशाची झळाळी उत्तरोत्तर वाढत जावो.

सुधीर कांदळकर

vivek म्हणाले...

देवसाहेब,

बातमी वाचून अत्यानंद जाहला. तुमच्या लेखणीच्या सामर्थ्यावर आमचा पहिल्यापासूनच विश्वास होता. असेच लिहित रहा.

विवेक काजरेकर

प्रमोद देव म्हणाले...

कांदळकरसाहेब आणि काजरेकरसाहेब आपल्या दोघांचेही मन:पूर्वक आभार.
आपल्या दोघांच्या सततच्या प्रोत्साहनानेच मी लिहिता राहतो. तेव्हा ह्यात तुमचाही वाटा आहेच.

विजयसिंह होलम म्हणाले...

देवसाहेब, तुमचा ब्लॉग फार्च छान आहे.स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक अभिनंदन!!!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद विजयराव!

नरेंद्र गोळे म्हणाले...

आपल्या अनुदिनीस "स्टार माझा"चा बहुचर्चित सन्मान मिळाल्याखातर आपले मन:पूर्वक अभिनंदन. अर्थात, त्यापूर्वीही आपली अनुदिनी अनुकरणीयच राहिलेली आहे.

जाता जाता:
आपण म्हणता की "आपल्या संगणकास आशियाई भाषांचा पाठिंबा आहे का" मात्र आपल्याला "आपल्या संगणकास काँप्लेक्स फाँटस चा पाठिंबा आहे का", असे वास्तविक म्हणण्याची गरज आहे.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद गोळेसाहेब.
"कॉम्प्लेक्स स्क्रीप्ट्स" असा बदल केलाय.
चूक दाखवल्याबद्दल मन:पूर्वक आभार.