माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१२ मे, २०१०

आम्ही, बझकर !


   मुंबईतल्या पहिल्या मराठी ब्लॉगर स्नेह मेळाव्याला आलेले काही बझकर. अजून बरेच आहेत बरं का...ही आपली एक झलक दाखवली...अनायासे छायाचित्र मिळालंय...तर दाखवतोय.  ;)


गुगलने बझचा समावेश जीमेलमध्ये केल्याला आता बरेच महिने झाले. पहिले एकदोन दिवस हे बझ प्रकरण काय आहे हे कळण्यातच वेळ गेला. आपल्या जीमेल खात्यात जे लोक आहेत ते साधारणपणे आपल्याशी बझमध्येही जोडले गेलेले दिसतात..पण आणखी पुढची गंमत म्हणजे आपल्या खात्यातल्या प्रत्येक सभासदाशी जोडली गेलेली माणसं आपल्या बझमध्ये डोकावू शकतात...ह्याचा अर्थ हे बझ प्रकरण म्हणजे एक खूप मोठी साखळी आहे....उदा. मी म्हटलं की...नमस्कार मंडळी,या गप्पा मारायला.... की हे अशा तर्‍हेने जोडलेल्या सगळ्यांना माझ्या कळत/नकळत पाहता येते.

सुरुवातीला एक गंमत म्हणून ह्या बझवर ज्या गप्पा मारायला मी सुरुवात केली ती माझ्या माहितीतल्या सदस्यांशी...हळूहळू एकेक सभासद वाढायला लागला. ह्याचा/हिचा त्याचा/तिचा मित्र/मैत्रीण असे करत करत ओळख काढत काढत  माझ्या खात्यातले लोक वाढायला लागले...अगदी पारावर गप्पा मारायला आपण बसतो तसे व्हायला लागले . बोलतांना विषयाचे,वेळेचे वगैरे फारसे बंधन राहिले नाही.

आता सदस्यसंख्या इतकी वाढलेय की कैक वेळा एकमेकांच्या खरडींना उत्तर देतांना असंबद्धता निर्माण होतेय...तरीही विषय कुठून  आणि कसा सुरु होतो  हे मात्र कळत नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या बझचं...धाग्याचं वाचन केलं तर अतिशय मनोरंजक असा मजकूर वाचायला मिळतो.

आजमितीला माझ्या बझमध्ये...किती बझकर आहेत हे मोजायचे ठरवले तर मोजता मोजता चूक होते..अशा तर्‍हेने रोज एकदोन नवी मंडळी हजेरी लावत असतात...तरीही ह्या घडीला...नियमित आणि क्वचित प्रसंगी हजेरी लावणारे असे बझकर मिळून जवळपास ४० जण हजेरी लावत असतात.

बझच्या एका धाग्यात ५०० खरडींची मर्यादा गुगलने घातली असावी असा अंदाज आहे....कारण गेले कैक दिवस आमच्या बझचा किमान एक  धागा तरी ५००च्या आसपास जाऊन बंद पडतो. ज्या दिवशी भरपूर हजेरी असते तेव्हा तर दोन दोन धागेही गप्पा मारायला आम्हाला कमी पडतात....इतकं काय बरं बोलतो आम्ही?
अहो सांगितलं ना ...विषयाला बंधन नाही त्यामुळे सुरुवातीला कोणता विषय असतो आणि धागा बंद पडेपर्यंत तो कुठवर गेलेला असतो ह्याचा काहीही हिशोब लावता येणार नाही...सापासारखी नागमोडी वळणं घेत आमच्या बझमधले विषय सारखे बदलत जातात....उत्सुकता असेल तर पाहा डोकावून....पण सावधान...ह्या आमच्या गप्पा वाचता वाचता तुम्ही कधी आमच्यात सामील झालात हे तुम्हालाही कळणार नाही....मग तुमचे रोजचे काम,लिखाण,वाचन, छंद वगैरेकडे दूर्लक्ष झालं तर आम्हाला दोष देऊ नका.  ;)

१३ टिप्पण्या:

davbindu म्हणाले...

बझकरांच्या छायाचित्रात मी सुदधा आलो आहे...
खरतर बझ या प्रकरणाकडे तस जास्त लक्ष दिल नाही पण आता याव लागेल वाटते तुमच्या बझवर...

प्रमोद देव म्हणाले...

देवेंद्रा, तू इथे येणारच होतास...ह्याची खात्री होती. :)

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

मस्तच देवकाका.

प्रमोद देव म्हणाले...

अपर्णा, खरंतर अजून खूप छान पद्धतीने मला लिहिता आलं असतं...गेले एकदोन दिवस ते मनात तयारही होतं...पण संधी मिळत नव्हती....आज लिहितांना मात्र खूप अडखळलो...नेहमीचा मजा नाही आला. :(

हेरंब म्हणाले...

काका, शेवटच्या वाक्यात दिलेला सावधानतेचा इशारा अगदी योग्य आहे.. एकदा तुमच्या बझमठात हजेरी लावली की मग बाकी कशाचंच भान रहात नाही :)

THE PROPHET म्हणाले...

बेभान होतात माणसं बझबझाट करताना...
काका...ते सिगारेटच्या पाकिटावर कसा वैधानिक इशारा देतात ना..तसाच तुम्हीही तुमच्या प्रत्येक बझमध्ये देत चला...;)

अनामित म्हणाले...

देव काका, मी नेमकी ह्याच विषयावर पोस्ट लिहाली आहे..अर्धवट झालीय लिहून :)

krishnakumar pradhan म्हणाले...

देवकाकांना ९ मेला दा.सा.वा.सभागृहात भेटलो तेव्हां अस वाटलं हे आपल्या चांगले ओळखीचे आहेत,कारण मला वाटते त्यांचा चेहराच खूप बोलका आहे,आणि सर्वांशीच ते मोकळेपणाने बोलत असावेत,संगीताची
आवड तर उघड दिसतेच आहे.माझ्या एखाद्या कवितेला चाल लावाल का हो देवकाका? मी भाषाभारती नावाचा ब्लोघी चालवीतो.खविता कोणत्या पत्यावर पाठवू? आपला नम्र

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

काका, हेरंब लाच कॉपी-पेस्ट करतोय.
काका, शेवटच्या वाक्यात दिलेला सावधानतेचा इशारा अगदी योग्य आहे.. एकदा तुमच्या बझमठात हजेरी लावली की मग बाकी कशाचंच भान रहात नाही

आनंद पत्रे म्हणाले...

बझोबांनी वेड लावलंय आम्हाला...

प्रमोद देव म्हणाले...

हेरंब,विद्याधर,कृष्णकुमार,सचिन आणि आनंद धन्यवाद.
कृष्णकुमार...जरूर पाठवा आपल्या कविता...मी त्यांना चाल लावू शकलो तर नक्कीच लावीने.

मदनबाण म्हणाले...

बझ करण्यासारखी दुसरी मजा नाही...सतत चालणारा मनमोकळ्या गप्पांचा हा कट्टा झाला आहे.अनेक लोकांशी चालणार्‍या धमाल गप्पा.मला अनेक उत्तम मित्र बझवर मिळाले आहेत ...
सुंदर लेख मठाधिपती... :)

प्रमोद देव म्हणाले...

मदनबुवा, तुमच्यासारख्या अशा सर्व सभासदामुळेच तर हा कट्टा इतका लोकप्रिय होतोय...दिवसेंदिवस.
तेव्हा हे सर्व श्रेय तुम्हा भक्तांचेच आहे.